तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब
ओघळून हळुवार हनुवटीपर्यंत आला
आधीच फिल्डिंग लागली होती
पण कॅच मी केला
कित्येकांनी हाय खाल्ली
बऱ्याच जणांनी माघार घेतली
सर्वांदेखत चाटून पार फस्त केला
गड्या , मी पहिला टप्पा पार केला ॥
दुसऱ्या टप्प्यात दाखल झालो
मैत्रिणींच्या कळपात आलो
दोन फारच जिवलग होत्या, तिच्या
नकळत त्यांचा लाडका भाऊराया झालो
बघता बघता सेमीला गेलो ॥
सेमीत गाठ होती तिच्या क्रूर भावांशी
नीट खेळलो नाही तर जाणार होतो जीवानिशी
एकुलती एक बहीण होती त्यांची
शोधत होते शालीन अन संस्कारी मेव्हणा
सुटाबुटात अस्साकाही सामोरा गेलो
जणू आलाय बाहेरगावचा पाव्हणा
अन अंतिम फेरीत दाखल झालो ॥
सर्व सैन्य आधीच झाले होते फितूर
तरी विश्वास नव्हता,
कारण तिचा बाप होता मोठा चतुर
सर्व बोलणी व्यवस्थित पार पडली
अचानक कुठेतरी एक माशी शिंकली
माझीच जुनी प्रेयसी, तिची चुलत बहीण निघाली
बापासमोरच माझी कुंडली मांडली
जुन्या आठवणींनी आकाशपाताळ एक केले
अंतिम फेरीत सैन्य पलटले
शिव्याश्राप देऊन भरपूर बुकलले
कप गेला मसनात , माझेच कंबरडे मोडले
पुरे पुरे म्हणून हंबरडे फोडले
डोळ्यासमोर साक्षात यमदेव आले
कसं सांगू गड्या , या मॅचने माझे कायमचे पारणे फिटले ॥
{{{{{{{{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}}}}}}}}}}
प्रतिक्रिया
20 Apr 2018 - 10:58 pm | टवाळ कार्टा
ख्या ख्या ख्या
21 Apr 2018 - 1:29 am | गामा पैलवान
हात्तिच्या! मला वाटलं की गाडीसोबत स्टेपनी पण लाभणार! पण हा हन्त हन्त .... !
-गा.पै.
21 Apr 2018 - 10:35 am | जेम्स वांड
घामाचा थेंब चाटून फस्त केलात?
21 Apr 2018 - 11:42 am | अभिजीत अवलिया
कपाळावरचा घामाचा थेम्ब ओघळून तिचे नाक तोंड पार करून हनुवटीपर्यंत आला म्हणजे केव्हडा मोठा थेम्ब म्हणावा हा.
बाय द वे,
येऊ द्या अजून अशी विविध विषयावरची काव्ये. तुमच्या कविता वाचून खूपच हसायला येते. नायतर नेहमी फारच सिरीयस लिखाण/चर्चा चालू असतात मिपावर.
21 Apr 2018 - 12:39 pm | श्वेता२४
तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब
ओघळून हळुवार हनुवटीपर्यंत आला
सर्वांदेखत चाटून पार फस्त केला
यावरुन प्रेम आंधळं, बहिरं(की मुकं माहित नाही) आणि अस्वच्छही असतं याची जाणीव झाली !
21 Apr 2018 - 1:43 pm | खिलजि
म्हणजे चार पावलं स्वर्गाकडे सरकलो . मित्रानो या धकाधकीच्या जीवनात निदान चार लोकांना जरी हसवलं ना तर मला वाटत आपण फार पुण्याचं काम करतोय . आजकाल लोक हसणेच विसरत चाललेयत. धन्यवाद माझ्या कल्पनेला अभिप्रायाचा प्रसाद दिल्याबद्दल.
सिद्धेश्वर विलास पाटणकर
21 Apr 2018 - 1:54 pm | खिलजि
अहो हि कल्पना आहे . आणि असं पण प्रेमात काहीही होतं . कुणी मार खातं तर कुणी थेम्ब पीतं . जेव्हा सगळं काही जुळून येतं तेव्हा आणि तेव्हाच प्रेम होतं
सिद्धेश्वर विलास पाटणकर
21 Apr 2018 - 2:06 pm | श्वेता२४
गंमतीने प्रतिसाद दिला . बाकी तुमच्या कविता व त्यवर दिलेले अभिप्राय वाचून नक्कीच हसायला येतं हे खरंय. लिहीत राहा आम्ही वाचत राहू. पुकप्र.
21 Apr 2018 - 2:10 pm | खिलजि
धन्यवाद
सिद्धेश्वर विलास पाटणकर
24 Apr 2018 - 9:09 am | दुर्गविहारी
हा हा हा !!! मज्जा आली. ;-)
फक्त घाम वगैरे चाटत जाउ नका. :-)
24 Apr 2018 - 1:17 pm | खिलजि
धन्यवाद दुर्गविहारी साहेब
सिद्धेश्वर विलास पाटणकर