e-learning कोर्सेस आयआयटी

मोहनराव's picture
मोहनराव in काथ्याकूट
12 Jan 2015 - 4:10 pm
गाभा: 

भारतातील अग्रगण्य आयआयटी संस्थांनी मिळून आंतरजालावर मोफत कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. आपल्यामधील खुप जणांना याची माहिती असेलच.
यामधील काही कोर्स विडियो स्वरुपात सुद्धा उपलब्ध आहेत. येथे आपल्याला अनेक मान्यवर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळू शकेल. जगभरातील कुणीही त्यांचा लाभ मोफत घेऊ शकतो. जिथे अनुभवी शिक्षकांची कमतरता आहे अश्या ठिकाणी या उपक्रमाचा फायदा करून घेत येईल. तसेच ज्यांना आपला अभ्यास वाढवायचा असेल त्यांच्यासाठीही उपयुक्त.
http://nptel.ac.in/
सध्या काही कोर्सेस ऑनलाईन प्रमाणपत्रक साठी उपलब्ध केलेले आहेत. तुम्ही gmail account वरून नोंदणी करू शकता.
https://onlinecourses.nptel.ac.in/explorer

पुढील विषयावरील अभ्यासक्रम:
एअरोस्पेस, ऑटोमोबाइल, केमिकल, बायोकेमिस्ट्री, सिव्हील, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, खाणकाम, समुद्रीविज्ञान, वस्त्रोद्योग यासारख्या इंजिनीअरिंगमधील शाखा तसेच केमिस्ट्री, फिजिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, पर्यावरण या विज्ञान शाखांशिवाय व्यवस्थापन, मानसशास्त्र, साहित्य, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, संभाषण कौशल्य यासारख्या विषयांवरील लेक्चर सध्या उपलब्ध आहेत.

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

12 Jan 2015 - 4:18 pm | क्लिंटन

माहितीबद्दल धन्यवाद.

अशाच प्रकारची www.saylor.org ही एक साईट आहे. त्यावर अनेक विषयांवर ऑनलाईन कोर्सेस मोफत उपलब्ध आहेत. कोणत्याही अमेरिकन विद्यापीठात एखाद्या पदवीचा अभ्यासक्रम असावा त्याप्रमाणे हे कोर्सेस डिझाईन केले आहेत. मला स्वतःला ही साईट अगदी प्रचंड आवडते. त्याव्यतिरिक्त एम.आय.टी आणि हावर्ड ओपनचे कोर्सेसही चांगले असतात.

मोहनराव's picture

12 Jan 2015 - 4:23 pm | मोहनराव

तुम्ही दिलेल्या लिंकबद्दल धन्यवाद!

भुमन्यु's picture

12 Jan 2015 - 6:46 pm | भुमन्यु

https://www.coursera.org/

इथे पण ऑनलाईन कोर्सेस मोफत उपलब्ध आहेत.

एम आय टी, हार्वर्ड, बर्कली सारख्या अग्रगण्य विद्यापिठांचे अनेक कोर्सेस https://www.edx.org या संस्थळावरून मोफत घेता येतात. आता त्यांनी कोर्सचे (म्हणजे एका विषयाचे) सर्टीफिकेट हवे असल्यास मला वाटते $५० देण्याची सुविधापण उपलब्ध केली आहे.

क्लिंटन's picture

12 Jan 2015 - 4:23 pm | क्लिंटन

http://www.openculture.com/freeonlinecourses या वेबसाईटवर तर खजिनाच मिळाला. जगातील अनेक अग्रगण्य विद्यापीठांमधील कोर्सेस यावर आहेत. आय.आय.टी नेही यात उडी घेतली हे चांगलेच झाले.

यातल्या सगळ्या लिंक चालत असल्या तर अती उत्तम. या धाग्याच्या निमित्ताने थोडी शोधाशोध केली :)

टवाळ कार्टा's picture

12 Jan 2015 - 4:29 pm | टवाळ कार्टा
मुक्त विहारि's picture

12 Jan 2015 - 5:45 pm | मुक्त विहारि

आवडला...

मान्यवर मिपाकरांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत...

धर्मराजमुटके's picture

12 Jan 2015 - 6:21 pm | धर्मराजमुटके

www.khanacademy.org हा ही दुवा तपासा.

विशाखा पाटील's picture

12 Jan 2015 - 6:30 pm | विशाखा पाटील

सर्वांनाच लिंक्ससाठी धन्यवाद!

बोका-ए-आझम's picture

12 Jan 2015 - 11:54 pm | बोका-ए-आझम

धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2015 - 12:34 am | डॉ सुहास म्हात्रे

अत्यंत उपयोगी धागा. प्रतिसादांनी त्याच्यात अधिक भर टाकली आहेच. अजूनही कोणाला काही माहिती असल्यास दुव्यांसकट टाकावी. म्हणजे हा धागा एक प्रभावी संदर्भ धागा होईल. मी वाखू साठवली आहे.

खटपट्या's picture

13 Jan 2015 - 1:14 am | खटपट्या

खूप मस्त धागा !! वाकू साठवली आहे.

शिद's picture

13 Jan 2015 - 8:31 pm | शिद

+१.

विशालभारति's picture

13 Jan 2015 - 11:11 am | विशालभारति

खुप खुप धन्यवाद!

श्रीरंग_जोशी's picture

13 Jan 2015 - 11:29 am | श्रीरंग_जोशी

उपयुक्त धागा व प्रतिसाद. वरील दुवे सवडीने वाचतो / बघतो.

माझ्या भावाने त्याच्या विद्यार्थ्यांच्या सोबत मिळून व्हिडिओ ट्युटोरिअल्स अपलोड केले आहेत.

त्याचे युट्युब चॅनेल.

विकास's picture

13 Jan 2015 - 11:23 pm | विकास

चांगली कल्पना! नंतर पाहतो.

त्याच संदर्भात सलमान खान ("हा", "तो" नाही!) ची https://www.khanacademy.org/ पण अवश्य वापरण्यासारखा (मुलांना आणि काहीवेळेस मोठ्यांना पण) आणि मोफत स्त्रोत आहे. त्याची मोबाईल अ‍ॅप्स पण आहेत.

जे.पी.मॉर्गन's picture

13 Jan 2015 - 12:18 pm | जे.पी.मॉर्गन

MOOC म करोति वाचालम प्रकार आहे हा. MOOC म्हणजे Massive Open Online Courses. बर्‍याच विद्यापीठांकडे वेगवेगळ्या कोर्सेसचा खजिना असतो. कोर्सेरा, खान अ‍ॅकॅडमी, एड एक्स वगैरे कंपन्या हे कोर्सेस आपल्या Learning Management System (LMS) वरून हे कोर्सेस लोकांपर्यंत पोचवतात. LMS विद्यार्थ्याची प्रगती, त्यांचे स्कोर्स ट्रॅक करते. ह्यात विद्द्यापीठांना त्यांच्या कोर्स बद्दल रॉयल्टी मिळते तर सर्टिफिकेशन्स आणि मेंटर च्या माध्यमातून ह्या कंपन्या पैसा कमावतात. वर उल्लेखिलेल्या साइट्स प्रमाणेच अनेक विद्यापीठांचे स्वतःचे सुद्धा MOOC उपलब्ध आहेत. क्वांटम मेकॅनिक्सपासून ते आफ्रिकेतल्या लोकसंगीतापर्यंत अक्षरशः लाखो विषयांवरचे कोर्सेस आपण घेऊ शकतो.

बरं हे फक्त व्हिडियो कोर्सेस नसतात. तुमची व्यवस्थित एक बॅच असते. तुम्ही तुमच्या "वर्गमित्रां" बरोबर ऑनलाईन चर्चा करू शकता, काही पैसे खर्च करून तुमच्या प्राध्यापकाकडून वैयक्तिक मार्गदर्शन सुद्ध मिळवू शकता. वर विकास ह्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्या कोर्सचं प्रमाणपत्र सुद्धा मिळतं. http://www.udemy.com/, हे सुद्धा एक लोकप्रिय MOOC संस्थळ आहे. एमआयटी, हार्वर्ड, बर्कले, स्टॅनफर्ड, यूसीएलए, येल. ड्यूक वगैरे जवळपास सगळ्याच प्रसिद्ध अमेरिकन विद्यापीठांचे MOOC आहेत.

ह्या सगळ्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा प्रकार येऊ घातलाय तो म्हणजे Tin Can अथवा xAPI ही application program interface. ह्याआधी ई-लर्निंगमध्ये वापरला जाणारा SCORM (Sharable Content Object Reference Model) हा API फक्त कोर्स सुरू / पूर्ण करणे, मिळवलेले गुण, प्रत्येक स्लाइडवर घेतलेला वेळ अशी मोजकीच माहिती मिळवायचा. पण टिन कॅन हा माऊस ची हालचाल ट्रॅक करत असल्याने प्रत्येकाची शिकण्याची पद्धत (वाचणे, ऐकणे अथवा व्हिडियोज पाहणे, इंटरअ‍ॅक्टिव्हिटी वगैरे) ओळखून त्याप्रमाणे प्रत्येकाला "आवडणार्‍या" पद्धतीचा कोर्स देण्यात मदत करणार आहे. जस्ट इन टाइम लर्निंग च्या जमान्यात "हवं तेव्हा हवं तसं आणि हवं ते" शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. येत्या काही वर्षात अश्या ऑनलाईन प्रमाणपत्रांना सुद्धा उद्योगक्षेत्रात महत्त्व मिळायला लागलं तर आश्चर्य वाटायला नको.

एकंदर ई-लर्निंग एक वेगळ्या वळणावर आहे..... आपण एकच करायचं.... सब्ब जगह ग्यान बट रहा है... जहा से मिलता है - लपेट लो!

जे.पी.मॉर्गन

मुक्त विहारि's picture

13 Jan 2015 - 11:29 pm | मुक्त विहारि

"एकंदर ई-लर्निंग एक वेगळ्या वळणावर आहे..... आपण एकच करायचं.... सब्ब जगह ग्यान बट रहा है... जहा से मिलता है - लपेट लो!"

+ १

मिपाकरांनी अनेक लिंक्स दिल्या आहेत. माझ्याही माहितीत भर पडली. सर्वांचे आभार!!

धन्यवाद.नविनच माहितीचा खजिना मिळाला.

पिंगू's picture

13 Jan 2015 - 8:05 pm | पिंगू

वाचनखूण साठवण्याजोगा माहितीपूर्ण धागा. या अगोदर मी कोर्सेरिया वरचे अभ्यासक्रम मी वापरुन बघितले आहेत. खूप छान असतात. पण वेळेच्या अभावामुळे ते मला पूर्ण करता आले नाहीत..

मोहनराव's picture

20 Apr 2018 - 12:52 pm | मोहनराव

NPTEL (National Programme on Technology Enhanced Learning) is a joint initiative of the IITs and IISc. Through this initiative, we offer online courses and certification in various topics.

Online course: Free for all, Certification exam: For a nominal fee. Learn anytime, anywhere! Only requirement: Interest and enthusiasm to learn :)

July-Dec 2018 Semester NPTEL Online Certification courses:

We will be offering around 260+ courses for certification during July-Dec 2018 Semester.

Tentative course list for July-Dec 2018 have been published : Click here to view

Enrollments will open shortly.

https://onlinecourses.nptel.ac.in/explorer

अतिशय उपयुक्त धागा आहे. धन्यवाद!