(सलमान भाई चे तुरुंगातील आज रात्रीचे गाणे)
केव्हा तरी पहाटे निसटून निज गेली
सुजले रडून डोळे रडवून रात गेली
कळले मला न केव्हा सुटली गोळी जराशी
कळले मला न तेंव्हा सोडोनी 'साथ' गेली
सांगू तरी कसे मी वय माझें झाले लग्नाचे
उसवून शर्ट माझा फसवून कैफ गेली
उरलें कर्णात काही ते नाद का ळविटाचे
आवाज काजव्याचे, डसून डांस गेली
दिसल्या मला न तेंव्हा माझ्याच दंत पंक्ति
मग आस जामीनाची सूचवून रात गेली
प्रतिक्रिया
6 Apr 2018 - 8:04 am | दुर्गविहारी
मस्त !
6 Apr 2018 - 9:12 am | ज्ञानोबाचे पैजार
चालीतही फिट बसते आहे
पैजारबुवा,
6 Apr 2018 - 3:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
6 Apr 2018 - 4:32 pm | manguu@mail.com
छान