II तिने पेन मागितलं, मी हात दिला II

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
3 Apr 2018 - 6:20 pm

तिने पेन मागितलं

मी हात दिला

तिने शिवी घातली

मी स्माईल दिली

ती धावून आली

मी मिठीत घेतली

ती शांत झाली

हळूच प्रेमात पडली

आधी मी वेडा होतो

आता ती पण झाली

माझी गांधीगिरी

प्रेमात कामी आली

आता ती हात मागते

मी पेन देतो

मी शिवी घालतो

ती स्माईल देते

मी धावून जातो

ती मिठीत घेते

प्रेम हे असं गड्या

हळूहळू होते

सिद्धेश्वर विलास पाटणकर

काहीच्या काही कविताकविता

प्रतिक्रिया

विडंबन पोटेन्शियल अ‍ॅलर्ट!

सूड's picture

4 Apr 2018 - 8:13 pm | सूड

काही विशिष्ट आयडीच याला न्याय देऊ शकतील.

पगला गजोधर's picture

3 Apr 2018 - 7:10 pm | पगला गजोधर

II तिने पेन मागितलं, मी हात दिला II

.
नशीब 'हातंच' दिला ...

गामा पैलवान's picture

3 Apr 2018 - 7:32 pm | गामा पैलवान

---------------------------
कुणीतरी पेन मागितलं
मी हात दिला
कुणीतरी लेखणी मागितली
मी लेख दिला
---------------------------
हाय रे कर्मा!

-गा.पै.

प्रसाद गोडबोले's picture

3 Apr 2018 - 10:27 pm | प्रसाद गोडबोले

सुंदर कच्चा माल !

दुर्गविहारी's picture

3 Apr 2018 - 10:54 pm | दुर्गविहारी

कविता टाकायची घाई करू नका. चांगले लिहाल.

चला दिवस सार्थकी लागला .... मस्त मजेशीर अभिप्राय आलेले आहेत ... धन्यवाद मित्रानो .. मार्कस तुलापण धन्यवाद मित्रा ... या गरीबाची कविता वाचल्याबद्दल ... तू उगी उगी बोललास आणि गाढ झोपलो होतो बघ ... छान
वाटलं ... अजून अभिप्राय आले तर अजून बरं वाटेल ... हे असे येणारे अभिप्राय मला माझ्या पुढील लेखनास सदैव उद्युक्त करत आले आहेत ... मित्रानो या गरिबाला जर शिरीमंत करायचे असेल तर अजून कशाची नाही पण अभिप्रायांची ( विखारी असले तरीही ) नितांत गरज आहे .. मला वाटत प्रत्येक कवीला ,, त्याने केलेल्या कल्पनेला तो दिलेला पुरस्कारच असतो ... धन्यवाद ....

सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रसाद गोडबोले's picture

5 Apr 2018 - 2:05 am | प्रसाद गोडबोले

ढण्यवाड ढण्यवाड !!

सूर म्हणतो साथ दे |
दिवा म्हणतो वात दे |
मिपावरच्या कवीराजांना|
रोज नवा प्रतिसाद दे ||

=))))

ती म्हणते पेन दे |
मी म्हणतो हात घे |
देवा महाराजा सिद्धेश्वरा |
रोज नवीन कविता दे ||

नाखु's picture

5 Apr 2018 - 10:00 am | नाखु

घडवलेल्या शिष्याला ( तिथी पेष्षल) बोलाविले पहिजे, याचं महाकाव्य निर्माण करण्यासाठी.

कवी का काकवी या अनियतकालिकाच्या "रतीबाच्या सुरनळ्या" या अग्रलेखातून साभार

अनन्त्_यात्री's picture

5 Apr 2018 - 10:40 am | अनन्त्_यात्री

कोण हे मी (बि)घडवलेले शिष्य?
तिथी पेष्पल?

नाखु's picture

5 Apr 2018 - 2:02 pm | नाखु

योग्य, सगळ्या तिथी, वार लावूनच हजर असायच्या त्यांचे समोर

मिपा वारकरी नाखु वाचकांची पत्रेवाला

पगला गजोधर's picture

5 Apr 2018 - 8:00 am | पगला गजोधर

तिने डिंक मागितले, मी भात दिला
तिने कामटी तासली, माझा ताव खुला
तिने सुत्तर बांधली, मी लेपटी लावली
तिनं काच कुटली, मी सरस मुठीत घेतली
ती गोत मारू लागली, मी रीळ सोडला
लफ्फुगिरीचा लप, तिला पाहून मी हापसला
ती मछली झाली, हळूच मौज दिली
आधी गिड्डा होतो, नंतर माझी कंन्नी ढपला
भोवऱ्यासारखं गिरक्या मारत, पतंग माझा कटला

अनन्त्_यात्री's picture

5 Apr 2018 - 10:59 am | अनन्त्_यात्री

मस्त बदवलात तुमचा पतंग :)

खिलजि's picture

5 Apr 2018 - 1:41 pm | खिलजि

जबर्दस्त अभिप्राय ... धन्यवाद मित्रानो .....

खिलजि's picture

5 Apr 2018 - 1:44 pm | खिलजि

कवी कोण म्हणाले ?

दिसत नाही का तुमाले

मी तर हात आधीच दिले ,,उडविण्यास पतंग

ओंगळ भोंगळ दिसे तुम्हांसी

कल्पनाच आम्ही करतो ऐसी

दुसर्याची भावना चाळावयासी

जेणे राहावे अभिप्रायांत सारे दंग

लिहावे ऐसे कि वाचल्यावाचून कुणी न राहावे

जे जे घडते,, ते रोज बघावे , रोज लिहावे

का लिहावे वृत्तांतुनी ,, घेऊनि अलंकार सारे ?

जाहलो गुणवंत ( मार्कस ) आम्ही ,, तुम्ही बिचारे... तुम्ही बिचारे

घडवतो आम्ही ,, नाही शिष्य कुणाचे

गुरु तोच बैसला एक, वर झळाळणारा , दास्यत्व फक्त त्या रामाचे

कुणा रोम प्यारा,, तर कुणा अभिप्राय

कुणी दास विडंबनाचा

तर कुणी करे उद्युक्त ओढण्यास पाय

हा सूड असे कि अजुन दुसरे काय ?

सिद्धेश्वर विलास पाटणकर

गामा पैलवान's picture

6 Apr 2018 - 2:02 am | गामा पैलवान

खिलजी,

बाकी कायपण म्हणा, अखेरीस येणारं तुमचं नाव कवितेचाच एक भाग वाटतं.

आ.न.,
-गा.पै.

खिलजि's picture

6 Apr 2018 - 6:27 pm | खिलजि

आ न

गा पै ''' हे सोडा आत्ता,, नावासहित दुसरी कविता वाचा ... अभिप्रायाची वाट बघतोय .... बादवे चैत्र पौर्णिमेला काय केलेत ? हनुमंताचे दर्शन घेतलेत कि नाही ....

सिद्धेश्वर विलास पाटणकर

गामा पैलवान's picture

6 Apr 2018 - 8:37 pm | गामा पैलवान

अहो, मी नम्र माणूस आहे. कळायला नको का लोकांना? ;-)
आ.न.,
-गा.पै.