रानवारा...
माझ्या प्रीतीचा उबारा...!!
मन माझं सारखं कलकल करतंय,
चूक करून म्हणतंय सलतंय
फुंकर घालतो त्याच्यावर,
रानवारा...
माझ्या प्रीतीचा उबारा...!!
तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे,
धडपड जशी आत तशी बाहेर आहे,
आधार देतो त्याच्यासाठी,
रानवारा...
माझ्या प्रीतीचा उबारा...!!
अवघड किती मिलन तुझं आणि माझं,
आड येती दुनियेची रीति रिवाज,
जात धर्म मानत नाही,
रानवारा...
माझ्या प्रीतीचा उबारा...!!
प्रतिक्रिया
3 Apr 2018 - 5:33 pm | अभ्या..
मस्तच हो पाटील.
3 Apr 2018 - 6:07 pm | पगला गजोधर
गुड वन