स्विकार्यता, आणि स्विकार्यतेसाठी लेजिटीमसी/योग्यतेचे चित्र उभे करणे ही सर्वकालीन राज्यकर्त्यांची गरज असते म्ग काळ कोणताही असो, अकबराचा , टिपूचा , ब्रिटीशांचा
,महात्मा गांधीचा , की आता मोदी आणि राहुल गांधीचा .
जयंती कुणाचीही साजरी करता येते. - आपली संस्कृती उदार आहे, विघ्नकर्त्यांच्या पुजेसही मान्यता देते - आपण कुणाच्या जयंत्या साजर्या करत आहोत त्या बद्दल इतरांना काही प्रश्नचिन्हे आहेत का या बद्दल सोईस्कर दुर्लक्ष करता येते (किंवा संशयही निर्माण करता येतात) किंवा झाकपाक करता येते पण झाकलेली प्रश्नचिन्हे परत फिरुन येणारच नाहीत असे ही नसावे. महात्मा गांधींची जयंती सगळे जग उत्साहात साजरे करेल पण आफ्रीकेतून प्रश्नचिन्ह येत असते.
सर्वधर्मसमभाव असणे आणि सर्वधर्मसमभावाच्या प्रतिकांचा आदर्श म्हणून स्विकार करणे चांगली गोष्ट आहे. प्रत्येक परधर्मीय धर्मांध असतोच असे नाही, किंवा प्रत्येक आक्रमण धार्मिक उद्देशाने झालेले असते असेही नसावे. व्यापारी समुदायास सर्वकाळी स्रोतांवर नियंत्रण हवे असते आणि आक्रमक राज्यकर्त्यांच्या मागे बर्याचदा व्यापार हीतसंबंधही लपलेले असू शकतात , व्यापारी मदती शिवाय युद्धाचे खर्च अवघड असावेत. पैसे खर्च करुन सैन्य उभे करता येते पण निष्ठा ही गोष्ट केवळ पैसे टाकून मिळत नाही निष्ठा मिळवण्यासाठी अधिक काही वापरावे लागू शकते . ज्या गोष्टी निष्ठा मिळवण्यासाठी वापरता येतात त्यात इतर गोष्टी समवेत धर्माचाही समावेश असतो. पण धर्माचा प्रत्येक वापर लेजिटीमेट/योग्य असतो असे म्हणता येते का ?
टिपू सुल्तान अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील कर्नाटकातील एक शासनकर्ता जो एकाच वेळी ब्रिटीश वसाहतवाद तर स्थनिक राजकिय चढाओढीत निजाम आणि पेशव्यांना तोंड देत होता. (टिपूच्या वेळेस तत्कालीन पेशवा अजाण बालवयात असल्यामुळे सुत्रे खर्या अर्थाने नाना फडणवीस आणि मराठा सरदारांच्या हाती होती) . सविस्तर इतिहास संशोधनासाठी टिपूच्या बाबतीतील ऐतिहासिक दस्तएवजांची उपलब्धता मुबलक आहे. तेवढाच वादही कारण टिपूने एकीकडे वसाहत वादी ब्रिटीशांशी झूंज दिली त्यामुळे त्याच्या या बाजूच्या उदात्तीकरणात फारही गैर नाही. वादाचा मुख्य विषय येतो ती त्याच्या परधर्मीयांसोबतच्या वागण्या बद्दल . त्याचे काही वागणे कमालीचे धर्मांध असहिष्णू होते तर काही वागणे अत्यंत सहिष्णू परधर्म समभावी होते या टिपूकडे पहायचे कसे याचा सहाजिकच संभ्रम होतो. (राजकीय पोळ्या भाजल्या जातात त्या वेगळ्या)
एखाद्या व्यक्तीचे वया सोबत दृष्टीकोण बदलते असू शकतात. आफ्रिकेत असताना वर्णवादी असलेले गांधी उत्तर काळात अधिक मानवतावादी होतात. पुर्वायुष्यात तौलनीक उदार असलेला औरंगजेब उत्तर आयुष्यात अधिक कर्मठ होत जातो. पुर्वायुष्यात कमी उदार असलेला अकबर उत्तर आयुष्यात अधिकच उदार होतो. असे होत असते. अकबरा प्रमाणे उपरती झाली त्याला त्याचे आकलन करु पहाणाराही सहाजिक उदार होऊ पहातो ते सहाजिक आहे.
(पूर्ण आयुष्य मानवता बाळगलेल्यां ना सर्व जन प्रथम क्रमामका देतील पण किमान पूर्वायुष्यत नाही उत्तर आयुष्यात सकारात्मक बदलला म्हणून दुसर्या क्रमांकावर वाल्मिकी अशोक अकबर इत्यादी मंडळींना मान दिला जातो . पण ज्यांचे व्यक्तित्व उत्तर आयुष्यात नकारात्मक दिशेने जाते त्यांना नेमका काय न्याय देणार ? आणि याच कारणाने वयाच्या उत्तरार्धात कर्मठ होत गेलेल्या औरंगजेबाचे आकलन करताना उदारता दाखवणे बर्याच अभ्यासकांना सहाजिक कठीण जाते. )
अमुक धर्मीय राजाकडे तमुक धर्मीय माणूस कामास असणे बऱ्याचदा त्या राजाच्य उदारतेचा निकष मानला जातो , हा निकष परिपूर्ण असतो का ? अशा भूमिका प्रॅक्टिकल तडजोडीचा भाग असू शकतात का ? मुस्लिम राज्यकर्त्यांची दोन - तीन बाबतीत अडचण होत असण्याची शक्यता राहते. स्वकीयांकडूनच बंड होऊन सत्तेस निर्माण होऊ शकणारे अंतर्गत धोके टाळण्याच्या दृष्टीने समतोल साधणे , दुसरे रेव्हेन्यू महसूल गोळा करण्यास लागणारा साक्षर आणि विश्वासार्ह कर्मचारी वर्ग म्हणून हिंदू खासकरून ब्राह्मण वर्गाशी मुस्लिम राज्यकर्त्यांनी अंशतः जुळवून घेतल्याची शक्यता असू शकते का ? आणि अशी केवळ कातडी बचावण्यातून आलेली उदारता सच्ची उदारता म्हणवले जाऊ शकते का ? औरंगजेबाने अमुक ब्राह्मण अथवा मंदिरास दान दिले हे म्हणताना तो दान घेणारा औरंगजेबास तुमच्या घराण्याचेच राज्य राहिला यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी म्हणून दाणा मागतो आणि मग ते दिले जाते असे अटी असलेले दान तडजोडीचे असते कि उत्तर आयुष्यातील अकबरा प्रमाणे सच्ची परधर्म सहिष्णुता असते ?
हीच बाब टिपू सुलतानाचे आकलन करतानाही लक्षात घ्यावी लागते . त्याच्याकडे असलेल्या हिंदू कर्मचारी वर्ग एकतर त्याच्या तडजोडीच्या गरजेतुन अथवा त्याच्या ज्योतिषा वरील विश्वासातून त्याच्या सोबत टिकून होता . इ.स. १७९० पर्यंतचा टिपू सुलतान जबरदस्तीने धर्मान्तरे करणारा च नव्हे तर प्रसंगी परधर्मीयांसोबत क्रौर्याची पराकाष्ठा करणारा व्हिलन म्हणून दिसत राहातो. १७९१ मध्ये ब्रिटिश निजाम आणि पेशवे अशा तिघांनी मिळून शह दिल्या नंतरचा टिपू सुलतान नरमलेला आपली सत्ता वाचवण्यासाठी गरज म्हणून आपल्या बहुसंख्य हिंदू जनतेच्या श्रद्धांशी जमवून घेणारा शासक म्हणून पुढे येतो. पण त्याचे अकबराप्रमाणे विचार बदलले म्हणून नव्हे .
छत्रपती शिवाजी महाराजांची परधर्म सहिष्णुता अकबराप्रमाणे फिलॉसॉफिकल होती असे सांगणारे पुरावे नसावेत पण व्यवहारात होती ती संस्कारजन्य म्हणून पुढे येते . टिपूची उत्तरकालीन व्यवहारातील परधर्म साठी काही करणे हे अंधश्रद्धा मूलक स्वतः:ची सत्ता टिकवण्याच्या गरजेतून येत नाहीना अशी काही अभ्यासकांची शंका प्रस्तुत वाटते . टिपूची जयंती सहज साजरी करून धकवून नेता येईल पण अभ्यासकांची प्रश्न चिन्हे महात्मा गांधींच्या वर्ण वादाच्या समर्थाना विषयी वापस येणार तशी वापस येत राहू शकतात . काही तथाकथित पुरोगामी टिपू सुलतानाचे क्रौर्याकडे त्याची राजकीय गरज म्हणून पहा अशी भलावण करतात या न्यायाने हिटलरचे क्रौर्यही दुर्लक्षावें लागेल जे या पुरोगाम्यांना अवघड जाणारे असू शकावे किंवा कसे.
या धागा लेखाचा उद्देश इस्लामोफोबियाचे समर्थन करणे असा नाही . पण इराक मध्ये याझिदीवर धर्मान्धतेने झालेले अत्याचार हे हि एका वस्तुनिष्ठ वास्तव आहे त्याकडे डोळे झाकूनही चालत नाही . सर्वधर्मसमभावी व्यक्तींचा उदो उदो आवश्य करावा त्यासाठी अकबरा सारखी नि:शंक असलेली अनेक उदाहरणे निवडता येतील किंवा इतर अनेक सुफी संत भारत भर मिळतील; त्यासाठी प्रश्न चिन्हांना वापस आणण्याची क्षमता असलेले (तात्पुरत्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी ठीक ( ?)) औरंगजेबाचे किंवा टिपूचे व्हाईटवोशिंग किती कामास येऊ शकेल या बाबत शंका वाटते. असो .
प्रतिक्रिया
24 Mar 2018 - 1:25 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
वाचते आहे.
आणी हा वाद हल्लीच चालू करण्यात आला आहे हे नमूद करावेसे वाटते. तत्कालीन मैसुरु राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंदू देवळे होती व अजूनही आहेत.किंबहूना दक्षिण कर्नाटकात प्राचिन देवळांची संख्या(घनता) भारतातील अनेक राज्यातील देवळांपेक्षा अधिक भरेल.
युद्ध म्हंटले की वित्तहानी/जीवीतहानी ठरलेली. अशावेळी धर्म पाहिला जात नव्हता.
टिपू सुल्तान्/हैदर अली ह्यांचा दिवाण पुर्णैय्या हा ब्राम्हण होता.
.
.
24 Mar 2018 - 1:35 pm | manguu@mail.com
छान
24 Mar 2018 - 10:22 pm | गामा पैलवान
माईसाहेब,
देवळांची घनता जास्त आहे हे काही टिपूच्या औदार्याचं प्रतीक नव्हे. टिपूने हजारो हिंदूंच्या कत्तली केल्या आणि स्त्रियांवर अत्याचार केले त्याचं काय? हिंदूंच्या जीवाला काहीच किंमत नाही का?
पण तुमचं निरीक्षण बरोबर आहे. हे असे अडचणीत आणणारे प्रश्न हल्लीच विचारले जाऊ लागलेत. हिंदू सजग होतोय हे सुचिन्ह आहे.
आ.न.,
-गा.पै.
24 Mar 2018 - 10:26 pm | गामा पैलवान
माईसाहेब,
ते ब्राह्मण कशाला नेमले होते? हिंदूंचा विश्वासघात करायलाच ना? इथे संदर्भ आहे : https://en.wikipedia.org/wiki/Mysorean_invasion_of_Kerala#Ethnic_cleansing
आ.न.,
-गा.पै.
25 Mar 2018 - 7:26 am | manguu@mail.com
तुम्हीही स्वताला राणीच्या देशात नेमून घेतले आहे , ते इतरांचा घात करायला का ?
26 Mar 2018 - 5:56 pm | गामा पैलवान
मंगूश्री,
कित्ती विसराळू हो तुम्ही! कित्तीदा सांगितलंय की हिंदू धर्माची पताका जगात फडकती ठेवण्यासाठी मी इथे इंग्लंडात आलो आहे.
आ.न.,
-गा.पै.
26 Mar 2018 - 8:19 pm | टवाळ कार्टा
म्हणजे नक्की काय करता आपण :)
27 Mar 2018 - 1:39 am | गामा पैलवान
टवाळ कार्टा,
मी धर्म पाळतो. नी नीतिमत्तेचा महामेरू असून स्वयंघोषित धर्ममार्तंड आहे. भारत स्वतंत्र झाला आहे असा काही लोकांचा समज आहे. तो खोटा आहे. भारताचा कारभार आजूनही इंग्रजी जमान्याप्रमाणेच चालवला जातोय. हे दिव्यज्ञान मला इथे इंग्लंडात आल्यावरच झालं. हे ज्ञान परिपूर्ण करण्याकडे माझा कल आहे. तोवर मी हिंदू धर्माची महती जगाला ओरडून सांगायचं व्रत घेतलं आहे.
आ.न.,
-गा.पै.
27 Mar 2018 - 2:56 pm | टवाळ कार्टा
इतकी लांबण लावाचेच कशाला....पैसे छापायला आणि चांगले सोशल लाईफ मिळते म्हणून गेलात असे स्वच्छ + स्पष्ट बोला की (आणि हे कारण अजिबात वाईट नाही)
27 Mar 2018 - 5:21 pm | गामा पैलवान
टवाळ कार्टा,
पैसे भारतातही भरपूर मिळायचे. सोशल लाईफ भारतात इथल्यापेक्षा अधिक चांगलं होतं.
मी इंग्लंडमध्ये काय करतो याचं ते उत्तर आहे. मी इंग्लंडमध्ये का राहतो याचं ते उत्तर नाही.
आ.न.,
-गा.पै.
27 Mar 2018 - 7:36 pm | टवाळ कार्टा
मग मीसुध्धा विश्वशांतीसाठी काम करतो
=))
27 Mar 2018 - 8:02 pm | पगला गजोधर
मग मीसुध्धा शांती मिळण्यासाठीच काम करतो
=))
विश्वकडे मात्र आपण काही लक्ष देत नाही ....
27 Mar 2018 - 9:31 pm | सतिश गावडे
मी भारतात सोन्याचा धूर निघण्याचा काळ परत आणण्यासाठी प्रोग्रामिंग करतो.
3 Apr 2018 - 12:31 pm | गामा पैलवान
स.गा. आणि ट.का.,
हेच तर मी केव्हापासनं सांगतोय. असेच आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.
आ.न.,
-गा.पै.
24 Mar 2018 - 10:40 pm | श्रीगुरुजी
आदित्यनाथांच्या तुलनेत मोदी मवाळ, मोदींच्या तुलनेत अडवाऩी मवाळ, अडवानींच्या वाजपेयी मवाळ . . . टिप्याच्या तुलनेत अकबर मवाळ . . .
25 Mar 2018 - 6:22 am | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राम अष्टकम... :- Sooryagayathri & Kuldeep M Pai
25 Mar 2018 - 6:44 am | manguu@mail.com
हे वांगमय इतिहास , संदर्भ , कादंबरी ...नेमके कोणत्या गटात येते ?
25 Mar 2018 - 7:07 am | मदनबाण
वरील ऑडियो सहा सोनेरी पाने या पुस्तकाचे वाचन असुन वरील दोन्ही भागांचा संदर्भ आपणास इथे पान नंबर १७८ हिंदुप्रपीडक क्रूरकर्मा टिपू सुलतान प्रकरण ७ वे मध्ये वाचावयास मिळेल.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राम अष्टकम... :- Sooryagayathri & Kuldeep M Pai
25 Mar 2018 - 9:10 pm | अर्धवटराव
इतीहासाचा अभ्यास करणे, त्यातुन भविष्याला आवष्यक असे सिद्धांत मांडणे हे देखील महत्वाचे. त्यादृष्टीने टिपुचा अभ्यास निश्चीत व्हावा. पण प्रॉब्लेम असा आहे कि बंगलोर शहर मरणाच्या उंबरठ्यावर पोचले असताना राजकारण्यांना गॅरंटी आहे कि लोकांना टिपुच्या मुद्यावरुन मतदान करायला भाग पाडता येतं, लिंगायतांच्या सेपरेट धर्माला मान्यता देऊन त्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न कमकुवत करता येतात. हे सुद्धा कदाचीत चेपु, गुगलोबाने सजेस्ट केलं असावं ;)
25 Mar 2018 - 10:01 pm | पगला गजोधर
राममंदिर मुद्दा कारसेवा, ट्रिपल तलाक, वंदेमाँतरंची सक्ती,
यानेसुद्धा पोटापाण्याचे प्रश्न कमकुवत करता येतात.
26 Mar 2018 - 2:38 am | अर्धवटराव
तसे ते केल्या गेले आहेतच.
26 Mar 2018 - 10:49 am | माईसाहेब कुरसूंदीकर
कर्नाटकात एक्मेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण चालू आहे. भाजपावाल्यानी टिपू व त्याचा ईतिहास 'अभ्यासाला' घेतला तर वेद नाकारणार्या बसवण्णांच्या लिंगायत पंथाला आपलेसे करण्याचा विडा कॉंग्रेसने उचलला. गंमत म्हणजे भाजपाचे नेते येड्ड्युरप्पा हे लिंगायत आहेत व भाजपाच्या ईतर नेते लिंगायत समाजाला 'अल्पसंख्य' करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत.!
27 Mar 2018 - 8:13 pm | मारवा
इंग्रज वि. टिपु
माहीतगार तुमच्याकडे काय माहीती आहे ?
28 Mar 2018 - 12:57 am | प्रसाद गोडबोले
अकबर विषयी उगाचच भलते गोइड गैरसमज आहेत आपल्या लोकांचे !
अकबर व्यवहारवादी होता . कोटिच्या कोटी असणार्या हिंदुना आपल्या हयातीत ना धर्मांतरित करता येईल ना मारता येईल हे लक्शात आल्यावर त्याने मध्यम मार्ग स्विकारला . दार अल हर्ब मध्ये दार अल ईस्लाम ची स्वप्ने पहात खडतर आयुष्य काढण्यापेक्षा दार अल सुलाह मध्ये चैनीचे आयुष्य काढया येईल असा साधा सोप्पा विचार आहे . काही सहिष्णुता वगैरे नाही .
दारा शिकोव्ह कदाचित सहिश्णु म्हणात येईल , पण तोवर दार अल इस्लामचे स्वप्न पुर्णकरता येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली असल्याने औरंग्या वरचढ ठरला !
दारा शिकोव्ह हा समस्त सर्वधरम्समभाव विचारसरणीच्या लोकांचा एक भोंगळ आशावाद आहे,
बाकी बाबर > अकबर > औरंगजेब अर्थात दार अल हर्ब > दार अल सुलाह > दार अल इस्लाम हेच खणखणीत सत्य आहे , जगभर हेच झाले आहे , हेच चालले आहे .
ह्या उपर अजुनही अकबर सर्वधर्म सम्भाव वगैरे मानत असाल तर म्हणा बापडे , आम्हाला काय , आम्ही तर डार्विनतात्यांचा धर्म मानतो , survival of the fittest... fight or flight !