मुलाला डब्यात देण्यासाठी एखैदा पौष्टीक पाककृती शोधत होते. घरात सोयाबीन चंक्सचे पीठ व खजूर शिल्लक होते. त्याचा वापर करायचे ठरविले .
साहित्य -
1 मोठी वाटी सोया चंक्स चे पीठ (मी हे चक्कीतून दळून आणते)
1 नेहमीची वाटी कणीक
1 वाटी तूप (फोटोमध्ये कमी दिसत असले तरी मी नंतर वरुन घातले आहे.)
12-15 खजूर बीया काढून
1 वाटी चिरलेला गूळ
अर्धी वाटी पीठीसाखर
10-12 काजू पाकळ्या
10-12 बदाम
अर्धा चमचा वेलची पावडर
प्रथम खजूर, काजू, बदाम व गूळ मिक्सर मधून फिरवून घ्यावे थोडे भरडसर राहिले तरी चालेल. निम्मे तप घालून कढईत घालून पीठे खरपूस भाजून घ्यावीत. पीठ मध्यम आचेवर भाजावे. साधारण 15-20 मि. नंतर पीठाचा रंग गडद होईल व खरपूस वास सुटला की बंद करावे. गरम असतानाच त्यात खजूराचे मिश्रण, पीठी साखर व वेलची पावडर घालावी. उरलेले निम्मे तूप घालून कालवून घ्यावे. कोमटसर असतानाच लाडू वळायला घ्यावेत. या मिश्रणात माझे छोट्या आकाराचे 30 लाडू झाले. हे लाडू चवीलाही खमंग लागतात व पौष्टीकही आहेत.
प्रतिक्रिया
23 Mar 2018 - 5:30 pm | श्वेता२४
हे फोटो पोस्ट करता येतील का
23 Mar 2018 - 5:35 pm | जेम्स वांड
कसली रिच पाककृती आहे,
थोडं टायमिंग हुकले, हिवाळ्याच्या तोंडावर टाकली असती तर डबाभर करूनच ठेवले असते! उन्हाळ्यात इतकं रिच खायची हिम्मत नाही होणार, पण तरी बुकमार्क आहेच!
23 Mar 2018 - 6:42 pm | manguu@mail.com
छान. सुंदर
25 Mar 2018 - 10:07 pm | manguu@mail.com
सोया चंक्सच्या पिठाऐवजी फुटाणे डाळीचे पीठ आणि नाचणीचे पीठ घेतले.
लाडू फारसे बांधता आले नाहीत. पीठदेखील चमच्याने खाता येइल.
26 Mar 2018 - 6:30 am | manguu@mail.com
थोडे पीनट बटरही घातले आहे. पीठ भाजताना तेल - तूप थोडेच घातले. त्यामुळे लाडू बांधता येत नाही आहेत. पण चव मस्त आहे.
हाच ऐवज पाण्यात शिजवला तर सांजा होईल का ?
26 Mar 2018 - 10:40 am | श्वेता२४
हा पण प्रयोग भारी आहे. खरं म्हणजे वेगवेगळी पीठे घालून अशाप्रकारे लाडवाच्या कीतीही पाककृती बनवता येतील
26 Mar 2018 - 11:13 am | केडी
छान! करून पाहीन एकदा...
26 Mar 2018 - 12:47 pm | एस
मला वाटते बदाम आणि काजू वाटण्याआधी थोडेसे भाजून घ्यावेत. त्याने चव अधिकच छान लागेल. बाकी लाडू भारी दिसत आहेत. तोंपासु.
26 Mar 2018 - 3:17 pm | श्वेता२४
सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद
26 Mar 2018 - 9:19 pm | पद्मावति
मस्तच.
14 Apr 2018 - 10:14 pm | पैसा
लै भारी