आणखी अपहरणे

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
16 Mar 2018 - 1:19 pm

'ती'ही त्याचा फुटबॉल करते
कधी कधी किंवा बर्‍ञाचदाही,
पण अपहरणांना, 'ती'च्या तर्‍हा अधिक

कधी जन्माला येण्यापुर्वीच अपहरण झालेले असते
आलीच तर 'ती' हा शब्दच अपहरण करतो पहिले
'ती' चे अपहरण करण्याची सवय
आधीच्या 'ती'लाही सोडवत नाही

काही अपहरणांची सोय 'ती'च्या
रूप रंगाने करुन ठेवली असते
'ती'ने आधी निवडलेल्या गुणसूत्रांमुळे
'ती'च्यातील 'ती'ला 'ती'च्याशी
स्पर्धा करण्याच्या इच्छेमुळे
'ती'ने बाळगलेल्या न्युनगंडामूळे
आणि त्यांच्या अंहगंडामुळे
'ती'च्यातील मालमत्तेच्या लालसेने
कि कथित ममतेच्या स्वार्थाने, कि..
त्यांच्यातील मार्केटच्या लालसेने
कधी त्यांच्यातील असुरक्षीततेने
शुचितेच्या शिक्क्याने
कुणाच्यातरी कथित स्वाभिमानाने
कुणाच्या अपमानाच्या बदल्याच्या इच्छेने
असंख्य नात्यातून
तीच्या पदराचे अपहरण होत रहाते
कधी पदरच मिळत नाही
तर कधी पदर करकचून बांधले जातात
बुंध्यापासून शेंट्यापर्यंत
कधी FGM ने सुरवात होते
आपलेच अपहरण करताना
हलाल होत
बुरख्यातच शेवट होतो,

सुखी असतील नाही ते
प्राणी ज्यांचे ईश्वर
पदराच्या छायेत
बुरख्याच्या आड
त्यांच्यातल्या 'ती'चे
अपहरण करत नाहीत

पदर असो वा नसो
ओरबाडली जाते
कधी नुसतेच नजरेने
कधी कातडी सॉलून
अमुक धर्मांच्या
तमुक प्रमुखाकडून
धर्मांच्या गंडस्थळातून
ओघळत रहाते

तिच्या ओघळण्याचेही
अपहरण झालेले

स्वतःचे स्वतःच
अपहरण करण्याचा
मार्गही शोधत असते
स्वतःच्या अभिनयातून
अपहरण कर्त्या दिग्दर्शकांशी
जुळवून घेत 'वाट'चाल
'ती'ची बहुधा सुरू असते

* प्रेर्ना ठाऊक असेलच

काहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीफ्री स्टाइलभूछत्रीमुक्त कवितारतीबाच्या कविताकरुणकविता

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Mar 2018 - 9:37 am | ज्ञानोबाचे पैजार

हे ही अपहरण भावले
आता तुम्ही काही सोडणार नाही असे दिसतेय
लगे रहो मुन्ना भाई....
पैजारबुवा,

माहितगार's picture

17 Mar 2018 - 10:49 am | माहितगार

चला तुमच्यामुळे एक एक प्रतिक्रीया तरी लाभली आमच्या भूछत्रीला तेवढेच समाधान , अनेक आभार.