तू पहाट ओली

परशुराम सोंडगे's picture
परशुराम सोंडगे in जे न देखे रवी...
2 Mar 2018 - 9:35 am

तू पहाट ओलीसांज कोवळी येते का
गंध अाठवांचा घेऊन

उमटीत जाते मनी वेडी
हळवी स्वप्नसुरांची धून

पदर हा रातीचा ढळता
सांडे उरात चंद्र नभीचा

ओठानीच कसा चूंबावा
प्राण विरता रातराणीचा

झरे अशी गात्रागात्रातूनी
तू थरथरती पहाट ओली

विरून क्षितिजाच्या रेषा
आभाळ चुंबते धरा गाली
परशुराम सोंडगे,पाटोदा
sahitygandha(साहित्यगंधा).blogspot.com
prshuramsondge.blogsopt.com

गाणेकविता

प्रतिक्रिया

एस's picture

2 Mar 2018 - 10:14 am | एस

ही कविता आवडली.

एस's picture

2 Mar 2018 - 10:14 am | एस

ही कविता आवडली.

अभिजीत अवलिया's picture

2 Mar 2018 - 10:26 am | अभिजीत अवलिया

कविता आणि हिरवीण (ती कोण आहे माहीत नाही) आवडली.

नाव आहे की चित्रात, रेजिना कसांद्रा आहे ती. तेलगू स्टार.
आता आंखे 2 मध्ये असणार आहे हिंदीत.

अभिजीत अवलिया's picture

24 Mar 2018 - 7:08 pm | अभिजीत अवलिया

धन्यवाद. मला वाटले होते ते असेच काहीतरी छापलेय.

शीर्षक वाचून भलतेच काही मनात आले होते, कविता वाचून भ्रमनिरास झाला.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2018 - 1:02 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggling.gif

सतिश गावडे's picture

22 Mar 2018 - 9:52 pm | सतिश गावडे

ही

कविता आवडली.