त्यांचं प्रेम दुधासारखे सफेद होते
मस्त पैकी उतू जात होते
आनंदाची साय जाऊन जाऊन
भांडण एवढे वाढते
कि त्याचे घट्ट दही होते
विचारांची पकड सैल होतं जाते
रंगवलेलं काय वेगळंच पण घडत मात्र दुसरंच असते
आता प्रेम, प्रेम नसते , तर त्याच ताक झालेलं असते
हेवेदावे मांडले जातात ,
वादावर वाद घातले जातात
भावना घुसळून घुसळून वर येतात
" शिल्लक राहिलेल्या आठवणी "
प्रेम आता प्रेम नसतं, तर बनतं त्याचं लोणी
असंच काही काळ साठवलं जातं
"मी कशाला जाऊ ? ती येईल हवंतर "
असं काहीसं लिहून पाठवलं जातं
वाट बघून बघून हळूहळू लोणीपण चामट होत जातं
इतकं कि नंतर त्याचं मेण बनत जातं
आजकालच प्रेम हे असं पहिलं दुधावानी असतं
नंतर नंतर त्याचं शेण बनत जातं
सिद्धेश्वर विलास पाटणकर
प्रतिक्रिया
28 Feb 2018 - 6:02 pm | अभ्या..
एकच लंबर.
मस्त रंगलीय प्रेमाची डेअरी.
1 Mar 2018 - 1:25 pm | सस्नेह
डेअरीत शेण आणि मेण पण मिळतं का अभ्याभौ ?
1 Mar 2018 - 3:05 pm | अभ्या..
ते उपपदार्थ आहेत.
सब्सिडेअरी ;)
1 Mar 2018 - 3:20 pm | सस्नेह
:D
1 Mar 2018 - 8:05 pm | खिलजि
खरंय , उपपदार्थ तेही प्रेमातल्या डेअरीतले :D
सिद्धेश्वर विलास पाटणकर
28 Feb 2018 - 6:27 pm | पैसा
लीलाधराची साय ही अजरामर कविता आठवली.
1 Mar 2018 - 1:13 pm | खिलजि
अभ्या शेट आणि पैसा ताई .. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद