मिटलेल्या नयनांची ओलावते पापणी
आसवांनी सांगितले न दिसे तू मज या क्षणी
मग आठवणींचा पाऊस पडू लागला मनी
अन् अधरांवर हास्याची अलगद सुरु झाली पेरणी
चालले होते चार पाऊले, पावलांवर तुझ्या ठेऊनी
न उरले तुझे असे काही, मज तुझ्यात सामावुनी
मग वाटले, तुझ्या निश्चयी पाऊलखुणांना
साथ देत होती माझ्या पैंजणांची गाणी
न पाहता मज चालताना, काय पाहिले मागे वळूनी
न बोलताच तेव्हा, शब्दांचे काम केले भावनांनी
काय उमगले बोलणे तुझे, ना जानो मज त्यावेळी
पण वाटले हाती न घेता हात, जोडले भाग्यरेखांनी
पाहता हे सारे, पारव्याची कुजबुज वाऱ्याच्या कानी
कोणते नाते यांचे, विणले जात आहे रेशीमधाग्यांनी
समजावे सारे मज, एवढ्यात नाहीसे झाले असणे तुझे
गोडवा नकळत मग सोबतीचा साठविला त्या क्षणांनी
- प्रणया
प्रतिक्रिया
27 Feb 2018 - 9:00 pm | प्रचेतस
छान,
मला तुमचं सदस्यनामही फार आवडलं.
27 Feb 2018 - 9:23 pm | प्रणया
धन्यवाद...
27 Feb 2018 - 9:27 pm | शार्दुल_हातोळकर
मस्त !!
27 Feb 2018 - 9:37 pm | प्रणया
धन्यवाद
27 Feb 2018 - 9:37 pm | प्रणया
धन्यवाद
28 Feb 2018 - 7:22 am | प्राची अश्विनी
कविता आवडली .