सोड असले नाद सगळे

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
8 Feb 2008 - 4:32 pm

आमची प्रेरणा अदितीताईंची कविता काल सांगावा मिळाला....

घालते डोळा मला ती
दाबते ओठास दाती

काय रे येतोस का तू
सोबतीला सांग राती

पाहुनी घायाळ झालो
पण पुढे झाली न छाती

वेळ नुसता खर्च झाला
गवसले काही न हाती

सोड असले नाद सगळे
"केशवा" होईल माती

--केशवसुमार
(माघ शु.१ शके १९२९,
८ फेब्रु. २००८)

विडंबन

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

8 Feb 2008 - 4:53 pm | इनोबा म्हणे

केशवा सह्ह्ह्ह्हीच रे!

सोड असले नाद सगळे
"केशवा" होईल 'माँ' ती

(फाजील) -इनोबा

धमाल मुलगा's picture

8 Feb 2008 - 5:26 pm | धमाल मुलगा

लय भारी हो, केशवखुमार !!! बाकी तुमच्या विड॑बना॑चा खुमार चढत्या भाजणीतला आहे हा॑ !!!

इनोबा, हे तर च्यायला कडीवर वरकडी :))

-ध मा ल.

विसोबा खेचर's picture

8 Feb 2008 - 5:31 pm | विसोबा खेचर

सोड असले नाद सगळे
"केशवा" होईल माती

हा हा हा! मस्त रे केशवा..

तात्या.

वरदा's picture

8 Feb 2008 - 5:45 pm | वरदा

काही शब्दच नाहीत्..किती चपखल असतं तुमच विडंबन्...

प्राजु's picture

8 Feb 2008 - 6:43 pm | प्राजु

आदितीचि कविता न वाचताही खूप मजा आली केशवा तुझी कविता वाचताना...
सह्हि रे...
वेळ नुसता खर्च झाला
गवसले काही न हाती

लईच भारी..

- प्राजु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Feb 2008 - 6:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोड असले नाद सगळे
"केशवा" होईल माती

लै भारी विडंबन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश's picture

8 Feb 2008 - 7:34 pm | ऋषिकेश

सपूर्ण विडंबन आवडलं.. एकापेक्षा एक सरस द्वीपदी :)
अजून येउद्या :)

-ऋषिकेश

ब्रिटिश टिंग्या's picture

8 Feb 2008 - 9:06 pm | ब्रिटिश टिंग्या

१ नंबर झालय विडंबन....
बाकी काल एकही नवीन विडंबन नाही म्हणुन थाप का मारली?
- आपला,
(केशवाला खरं नांव माहिती असणारा) छोटी टिंगी

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Feb 2008 - 10:02 pm | llपुण्याचे पेशवेll

केशवराव विडंबन तर मस्तच.. आणि विनूची त्यावर वरकडी पण उत्तम..
पुण्याचे पेशवे

केशवसुमार's picture

10 Feb 2008 - 2:00 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार

केशवसुमार

सुधीर कांदळकर's picture

10 Feb 2008 - 6:56 pm | सुधीर कांदळकर

नाद मात्र सोडू नका केशवा. एकदम झकास.

त्यो तर वाढवाच. आणखी बक्कळ येऊ द्यात.