या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला.. वेगळे सुचलेले--

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
17 Jan 2018 - 10:57 pm

विशालची ही रचना बघून वेगळ्याप्रकारे काही मांडणे झाले [विडंबन नाही].. गझल आहे की नाही हे मात्र माहित नाही.

सूर येथे होत बेसूर.. ऐकायचे नव्हते मला..
या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला..

श्वापदांनी फाडलेले पदर ज्यांना झाकती..
देहभूमीच्या चिरांना मोजायचे नव्हते मला..

ओथंबले आभाळ माझे.. मग सर्वकाही चांगले!
तीरापल्याडच्या भुकेला उमजायचे नव्हते मला..

पुन्हा वळती त्या दिशेला..पावले माझी.. कितीदा..
पावलांना त्या दिशेला न्यायचे नव्हते मला..

दुभंगल्या घरट्यात अजुनी अंकुराची आस होती..
रेशमाचे भाव-बंध जोडायचे नव्हते मला..

आयुष्य पेटून सांगते, अभिमान माझा कोरडा..
कातळही म्हणावा बरा.. [पा]झरायचे नव्हते मला..

करुणकविता

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

18 Jan 2018 - 10:07 am | विनिता००२

छान झालीये रचना!

दुभंगल्या घरट्यात अजुनी अंकुराची आस होती..
रेशमाचे भाव-बंध जोडायचे नव्हते मला..>> इथे 'तोडायचे' केलेत तर अर्थ नीट पोहोचेल असे वाटते.

प्राची अश्विनी's picture

18 Jan 2018 - 10:25 am | प्राची अश्विनी

कदाचित त्यांना "जोडायचे" असंच म्हणायचं असेल.
अंकुराची आस म्हणजे निव्वळ जगण्याची इच्छा, रेशमी भावबंध म्हणजे जणू frills attached.
कवीच खरा अर्थ सांगू शकेल.

राघव's picture

18 Jan 2018 - 11:16 am | राघव

खरंय.. पण शक्यता असूनही जोडायला टाळणे हा भाव अपेक्षीत असल्यानं, तोडायचे नाही म्हटले तर अर्थ बदलतो.
तसंच उर्वरीत रचनेशी विसंगत होतंय. जोडायचं नाही असंच बरोबर वाटतं.

प्राची अश्विनी's picture

18 Jan 2018 - 10:26 am | प्राची अश्विनी

रचना आवडली .

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jan 2018 - 10:54 am | ज्ञानोबाचे पैजार

हा ही दॄष्टीकोन आवडला.
मजा आली वाचताना...
पैजारबुवा,

विशाल कुलकर्णी's picture

23 Jan 2018 - 10:41 am | विशाल कुलकर्णी
विशाल कुलकर्णी's picture

23 Jan 2018 - 10:41 am | विशाल कुलकर्णी

वृत्त गडबडलेय काही ठिकाणी. पण छान झालीय !
देवप्रिया : गालगागा गालगागा गालगागा गालगा

गझल वृत्तातच हवी ना

अन्यथा गझल अन मुक्तछंद काय फरक उरणार नाही,

बिना वृत्ताचे 'नज्म' असतात बहुतेक

राघव's picture

2 Feb 2018 - 9:28 am | राघव

म्हणूनच मी या रचनेला गझल म्हटलेलं नाही. असो.