अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे खूप पाऊस पडतो आहे. अवकाळी पावसाचा पिकांवर वाईट परिणाम होईन खूप नुकसान होते आहे. बळीराजाच्या मनातील व्यथा मी शब्दबद्ध केली आहे...
नको नको रे पावसा घालू अवेळी धिंगाणा
नको हिरावून नेऊ माझा मोतियाचा दाणा
कष्ट करुनि शनिवारी येते मातीतून पीक
थांब थांब रे पावसा माझी हाक तू ऐक
छोटी छोटी माझी पिल्ले उभी भुकेली माझ्या दारी
पोट भरीन मी त्यांचे दाणे विकून बाजारी
वर्ष भर मी राबून सोने शेतात उगले
तुझ्या अवेळी येण्याने कोळसे त्याचे झाले
तुझ्या अवेळी येण्याला माणूस कारण आहे
निसर्ग संपत्तीचा ऱ्हास त्याने केला आहे
आता येतील शेतात समाजावण्या मंत्रीगण
दाखविती जागा सारे कसा नाही शिल्लक कण
कोटी कोटी उड्डाणे होती आता पैशाची
दाखविती मंत्री सारे किती काळजी शेताची
त्यांचे पैसे आश्वासने हवेत विरून जाती
रिकामी माझी झोळी नाही दमडी माझ्या हाती
विनवितो मी बळीराजा थांबव वर्षांबाण
पुन्हा उठून उभा राही भरून काढण्या नुकसान
--शब्दांकित (वैभव दातार )
५ डिसेंबर २०१७
प्रतिक्रिया
5 Dec 2017 - 2:10 pm | कपिलमुनी
सध्या द्राक्षाबाग मालकांची अवस्था अशीच आहे .
बाकी ही कविता वाचून
||नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली ||
या इंदिरा संतांच्या कवितेची आठवण झाली
5 Dec 2017 - 2:20 pm | खेडूत
ती शनिवारी कष्ट करण्याची काय भानगड आहे?
अन् ते मीटरचं तेवढं मनावर घ्या राजे..!
6 Dec 2017 - 12:52 am | गबाळ्या
केवळ हे वाचल्या वाचल्या मनात आले म्हणून लिहितोय. मूळ कवी आणि कवितेवर कोणत्याही प्रकारची टीका करण्याचा उद्देश नाही.
"अन् ते मीटरचं तेवढं मनावर घ्या राजे..!" हेच कोणी कोणी कशा शब्दात सांगितले असते?
निळू फुले : "भाई, मीटरवर या!"
कवी वा. भा. पाठक : "खबरदार जर चाल सोडुनी ल्ह्याल पुढे 'मुखड्या' वाचीन कधी कधीच थोड्या"
आणखी कोणी ?
5 Dec 2017 - 3:32 pm | अनन्त्_यात्री
||कधी तरी रे पावसा घाल धिंगाणा अवेळी ||
ईक्षुदंडातुनी बघ झाली प्रतिभा मोकळी..........
5 Dec 2017 - 5:06 pm | सूड
शनवारी कष्ट करुन पीक येण्याचं जरा बैजवार सांगा राव!!
5 Dec 2017 - 5:48 pm | प्रचेतस
त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असावा की शनि म्हणजे दि. २ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी पीक बाहेर काढून ठेवले आणि रविवारी म्हणजे दि. ३ डिसेंबर रोजी ते पीक ओखी चक्रीवादळाच्या कचाट्यात सापडून होत्याचे नव्हते झाले.
5 Dec 2017 - 6:50 pm | चांदणे संदीप
.....ते दिसे वल्लीला.
=))
Sandy
5 Dec 2017 - 10:24 pm | नाखु
तुझी माझी निव्वळ धूरदृष्टी, यांची (सर्व) दूर....
पिटातल्या प्रेक्षकांना साक्षीदार नाखु
6 Dec 2017 - 12:33 pm | सूड
असंय होय. आज तर मला चतुर चाणक्य यांची उणीव अगदीच प्रकर्षाने जाणवत्ये.