ते हायेत आपलेचं
असं समजुनं वागलो
केला इस्वासं म्हनून
असे भिकीले लागलो
फोळं ये लोक हाताले
असं दयन दयलं
पिठं भरुन नेतानी
आमी त्याईले पायलं
ताट आमच्या नावाचं
सफा त्याईनच केलं
खाली सांडलं खर्कटं
तेई सावळूनं नेलं
तेल घालून डोयात
केलं पीकाच राखन
देठा लांबोला त्याईनं
ठुली आमाले आकन
शिसी बसले ते आता
जीव काताऊनं गेला
हेला पखाली चा शेवटी
पानी वाहू वाहू मेला
प्रतिक्रिया
28 Nov 2017 - 9:10 am | प्रचेतस
सुरेख रचना.
28 Nov 2017 - 10:07 am | अनन्त्_यात्री
वास्तववादी.
28 Nov 2017 - 3:45 pm | चांदणे संदीप
बेक्कार!
Sandy
4 Dec 2017 - 9:12 pm | पैसा
हम्म..
4 Dec 2017 - 9:27 pm | सतिश गावडे
कविता आवडली.
ठुली म्हणजे ओरडा का? पीक त्यांनी कापून नेलं, ओरडा आम्हाला ऐकावा लागला अशा अर्थी?
5 Dec 2017 - 1:55 am | श्रीरंग_जोशी
बहुधा ठुली म्हणजे ठेवली.
आकन म्हणजे काय ते कळले नाही.
कविता भावली.
5 Dec 2017 - 3:01 pm | समाधान राऊत
आकन म्हणजे शेतातील पिकांचे बुडके असा अर्थ प्रेरित असावा
4 Dec 2017 - 9:29 pm | ज्योति अळवणी
आवडली
5 Dec 2017 - 3:10 pm | सस्नेह
मार्मिक !
6 Dec 2017 - 8:48 am | ऊध्दव गावंडे
ज्वारी ची कणसे खुडून आणल्या नंतर, शेण,पाण्याने लेपून तयार केलेल्या गोलाकार खळ्यात टाकतात. त्यानंतर त्यावर बैलांना फिरवून त्या कणसांतील दाणे बाहेर पडले की ती कणसे बाजूला काढली जातात.(यांनाही काही प्रमाणात दाणे लगडलेले असतात ) व उरलेले कुटार मिस्रीत ज्वारी उफनून जी ज्वारी ची रास तयार होते ते म्हणजे "देठा" माल (सुपर ग्रेड )
यानंतर बाजूला काढलेली कणसे पुन्हा खळ्यात टाकून त्यावर बैल फिरवून उरले सुरले दाणे काढून वरील प्रमाणे तयार झालेल्या ज्वारी ला "आकन" (फेअर ग्रेड ) म्हणतात .
7 Dec 2017 - 12:44 am | एस
छान कविता.
7 Dec 2017 - 12:55 am | सौन्दर्य
कविता छान आहे, कमी शब्दांत सर्व काही सांगून जाते. 'शिसी बसले'चा अर्थ सांगू शकाल का ?
7 Dec 2017 - 8:15 am | ऊध्दव गावंडे
शिसारी येणे
7 Dec 2017 - 8:33 am | नाखु
भेदक कविता
अशा एका अर्थवाही कवितेसाठी वाट पाहत होतो
इतरेजन दहा रतीब कविता टाकून या विभागात फिरकु नये अशीच तजवीज करून ठेवली आहे
7 Dec 2017 - 8:33 am | नाखु
भेदक कविता
अशा एका अर्थवाही कवितेसाठी वाट पाहत होतो
इतरेजन दहा रतीब कविता टाकून या विभागात फिरकु नये अशीच तजवीज करून ठेवली आहे