संधी मराठीबोलींच्या सर्वेक्षणात सहभागी होण्याची

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
27 Nov 2017 - 10:53 am

राज्य मराठी विकास संस्थेचे प्र. संचालक प्रा. श्री. आनंद काटिकर सरांनी सोशल मिडियावरुन फॉर्वर्ड केलेला संदेश त्यांच्याच शब्दात खालील प्रमाणे :

"भाषेत रस असलेल्या सर्वांना अर्ज करायला सांगा. उत्तम प्रशिक्षण विद्यावेतनासह आहे. त्यातील निवडकजणांना पुढील संशोधनासाठी ३ वर्षे निवडले जाण्याची शक्यता आहे. एम. ए. मराठीस विशेष प्राधान्य "

अधिक माहिती डेक्कन कॉलेजच्या मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण: प्रतिमांकन आणि आलेखन’ जाहिरात / दुव्यावर आहे.

भाषाबातमी

प्रतिक्रिया

हे काम आपली सद्य नोकरी/व्यवसाय सांभाळून करता येणार आहे की त्यांना पूर्णवेळ व्यक्ती हव्यात? त्याबद्द्ल काहीच माहिती दिलेली नाहीय.

माहितगार's picture

27 Nov 2017 - 5:23 pm | माहितगार

मलाही कल्पना नाही. पण प्रथमदर्शनी पूर्णवेळ असण्याची शक्यता अधिक वाटते, पण नेमकी माहिती डेक्कन कॉलेज अथवा राज्य मराठी विकास संस्थेकडून मिळू शकेल . डेक्कन कॉलेजच्या वेबसाईटचा पत्ता वर दिलेला आहेच.

राज्यमराठी विकास संस्थेच्या वेबसाईटचा हा दुवा देत आहे. त्यावर त्यांचे लँडलाईन नंबर दिसतात त्यांना फोन करून जिज्ञासूंना अधिक माहिती घेता येईल असे वाटते.

राज्य सरकारचं आहे म्हटल्यावर कितपत उत्तर मिळेल याची शंका आहे, तरी प्रयत्न करुन बघेन.