साहित्य
१ कप चणे, रात्रभर भिजत घालून
१ लसूण गड्डा, सोलून, बारीक चिरून
१ मोठा कांदा, मोठे काप करून
२ मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या,मोठे तुकडे करून
४ ते ५ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
२ कांद्याच्या पाती, कांदा आणि पात वेगवेगळ्या चिरून
३ ते ४ चमचे टोमॅटो सॉस
३ ते ४ चमचे रेड चिली सॉस
३ चमचे सोया सॉस
३ चमचे व्हिनेगर
२ चमचे काळीमिरी पावडर
४ ते ५ चमचे कॉर्नफ्लार
मीठ चवीनुसार
तळणी साठी तेल
कृती
चणे बुडतील एवढं पाणी घेऊन, चणे शिजवून घ्यावेत (कुकर मध्ये २ शिट्ट्या, किंवा मी मायक्रोवेव्ह मध्ये १५ मिनिटे फुल्ल पॉवर वर वाफवून घेतले). [चणे अगदी मऊसूद शिजवून न घेता, थोडेसे कमी शिजवून घ्यायचे आहेत]
चणे शिजवून गार करुन, निथळून, कोरडे करून घ्यावे. ह्यात एक चमचा काळीमिरी पावडर, एक चमचा मीठ घालून ते हलवून घ्यावेत.
आता ह्यात कॉर्न फ्लावर घालून, ते चण्यांना सगळीकडून लागेल असे हलवून घ्यावे.
तळणी साठी कढईत तेल गरम करून, थोडे थोडे करून हे चणे तळून घ्यावेत (आच मध्यम ठेवावी, आणि काळजी घेणे, अधून मधून काही चणे फुटण्याची शक्यता असते). सगळे तळून झाले की बाजूला गार करत ठेवावेत
वॉक किंवा कढईत, ३ ते ४ चमचे तेल गरम करून, त्यात बारीक चिरलेला लसूण परतून घ्यावा. ह्यात आता कांद्याचे काप टाकून ते एक तो दोन मिनिटे परतून घ्यावेत.
आता ह्यात शिमला मिरचीचे काप टाकून ते २ ते ३ मिनिटे परतून घ्या. नंतर ह्यात कांदेपातीचा पांढरा आणि हिरवा भाग घालून ते अजून थोडे परतून घायचे आहे.
उभ्या चिरलेल्या मिरच्या घालून अजून थोडा परतून घ्या. ह्यात आता सोया, टोमॅटो, आणि रेड चिली सॉस आणि व्हिनेगर घालून थोडा वेळ परतून घ्या. ह्यात उरलेली काळीमिरी पावडर घालून थोडं परतून घ्या.
तळून घेतलेले चणे शेवटी घालून, मिश्रण परतून घ्या. चवीनुसार मीठ घालून, झाकण ठेवून, गॅस बंद करून, एक ते दोन मिनिटे ठेऊन द्या.
गरम गरम खायला घ्या (चखणा म्हणून उत्तम)! [भाता बरोबर / व्हेज फ्राईड राईस सोबत खायचे झाल्यास, शेवटी, एक कप पाण्यात २ चमचे कॉर्नफ्लॉवर घालून, ते पाणी ह्यात घालून, मंद आचेवर ढवळून घ्या. ह्याने एक जाडसर ग्रेव्ही तयार होईल. असा ग्रेव्ही वाला चिली चना गरम भाता सोबत छान लागतो]
प्रतिक्रिया
13 Nov 2017 - 11:38 am | कपिलमुनी
नेहमीप्रमाणे सुंदर प्रेझेन्टेशन !
अवांतर : ही रेसिपी मक्याचे दाणे घालून करता येईल का
13 Nov 2017 - 2:24 pm | केडी
हो, सॉल्ट अँड पेप्पर कॉर्न अशी मिळते देखील काही हॉटेल्स मध्ये....
13 Nov 2017 - 12:07 pm | अनिंद्य
क्रमवार सचित्र कृती आवडली.
असेच पनीर, टोफू, मका, राजमा, बेबी पोटॅटो यांचेही करता येईल असे वाटले - पण ते असे क्रनची / कुरकुरीत नाही होणार बहुतेक.
13 Nov 2017 - 12:38 pm | जागु
सुंदर मांडणी आणि छान रेसिपी.
13 Nov 2017 - 1:26 pm | चांदणे संदीप
तोंपासु!
Sandy
13 Nov 2017 - 1:43 pm | मोदक
वाह.. भारी प्रेझेंटेशन.
13 Nov 2017 - 2:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
फोटो पाहूनच भूक खवळते ! तुम्ही रेस्तराँ काढाच... आधीच काढले असल्यास पत्ता द्या.
13 Nov 2017 - 2:22 pm | केडी
....इच्छा तर आहे, बघू कस जमते ते... :-)
13 Nov 2017 - 7:48 pm | babu b
छान
13 Nov 2017 - 10:17 pm | स्वाती दिनेश
छान दिसतय चना चिली..
स्वाती
14 Nov 2017 - 1:26 pm | मनिमौ
पाणी सुटले हे चटकदार चणे पाहून
15 Nov 2017 - 5:29 am | रुपी
वा! छान पाकृ आणि फोटो!
15 Nov 2017 - 12:02 pm | पिंगू
देशी चन्याला चायनीज वस्त्रे सुरेख घातली आहेत..
तोंपासु...
15 Nov 2017 - 12:24 pm | अत्रुप्त आत्मा
न्हेम्मी परमाने...केडी विथ येडी पा.कृती.
15 Nov 2017 - 1:01 pm | कपिलमुनी
थंडीमधे चखना म्हणून छान लागेल !
15 Nov 2017 - 4:23 pm | मसाला महाराणी
मस्त
15 Nov 2017 - 5:42 pm | अनुप ढेरे
मस्तं!
15 Nov 2017 - 8:22 pm | नूतन सावंत
झकास पाककृती,चिनी पण वेडे होतील या पाककृतीने
16 Nov 2017 - 1:05 am | अभिदेश
घेता दुसऱ्या कोणत्या प्रकारे करता येतील ?
16 Nov 2017 - 7:45 am | चामुंडराय
व्वा केडी सर, सुरेख पाकृ. चखना म्हणून तर ब्येस्टच !
मात्र शिर्षक वाचून वाटले चणे वापरून केलेली पाश्चात्यांची चिली आहे कि काय.
16 Nov 2017 - 7:45 am | चामुंडराय
व्वा केडी सर, सुरेख पाकृ. चखना म्हणून तर ब्येस्टच !
मात्र शिर्षक वाचून वाटले चणे वापरून केलेली पाश्चात्यांची चिली आहे कि काय.
16 Nov 2017 - 12:42 pm | केडी
पनीर चिली, चिकन चिली तसे चना चिली.. :-)
16 Nov 2017 - 12:23 pm | कंजूस
अरे वा!!!
16 Nov 2017 - 5:16 pm | पुंबा
आहा! फोटो कसला कातिल आलाय!!
जब्रा पाकृ..
चखणा म्हणून खरोखर अप्रतिम होईल..
17 Nov 2017 - 12:48 pm | सस्नेह
प्रेझेंटेशन सुरेख ! फोटो तोंपासु
17 Nov 2017 - 1:04 pm | प्राची अश्विनी
17 Nov 2017 - 1:05 pm | प्राची अश्विनी
ग्रेव्ही केली. मस्त झालेली. ठ्यांकु.
17 Nov 2017 - 2:22 pm | केडी
क्या बात है! मस्त!
19 Nov 2017 - 6:54 pm | सविता००१
मस्त पाकृ.
नक्की करेन
19 Dec 2017 - 2:54 pm | पंतश्री
केडी धन्यवाद.
मि सेम मक्याचे दाने वाप्रुन केल. होटेल पेक्शा भारि झाल होत. फोटो काढायला काही उरलच नाही
20 Dec 2017 - 9:05 pm | केडी
सही, पुढल्या वेळी फोटो नक्की काढून टाका...
24 Dec 2017 - 11:51 am | मदनबाण
लयं भारी !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]
29 Dec 2017 - 4:15 am | दीपा माने
कल्पना करू तितक्या अशा प्रकारच्या पाकृ मिपाकरांनी प्रतिसादात दिल्यात पण तुमची पाकृ पाहूनच म्हणून तुमचे खास अभिनंदन.