साहित्य
१ कप चणे, रात्रभर भिजत घालून
१ लसूण गड्डा, सोलून, बारीक चिरून
१ मोठा कांदा, मोठे काप करून
२ मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या,मोठे तुकडे करून
४ ते ५ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
२ कांद्याच्या पाती, कांदा आणि पात वेगवेगळ्या चिरून
३ ते ४ चमचे टोमॅटो सॉस
३ ते ४ चमचे रेड चिली सॉस
३ चमचे सोया सॉस
३ चमचे व्हिनेगर
२ चमचे काळीमिरी पावडर
४ ते ५ चमचे कॉर्नफ्लार
मीठ चवीनुसार
तळणी साठी तेल
कृती
चणे बुडतील एवढं पाणी घेऊन, चणे शिजवून घ्यावेत (कुकर मध्ये २ शिट्ट्या, किंवा मी मायक्रोवेव्ह मध्ये १५ मिनिटे फुल्ल पॉवर वर वाफवून घेतले). [चणे अगदी मऊसूद शिजवून न घेता, थोडेसे कमी शिजवून घ्यायचे आहेत]
चणे शिजवून गार करुन, निथळून, कोरडे करून घ्यावे. ह्यात एक चमचा काळीमिरी पावडर, एक चमचा मीठ घालून ते हलवून घ्यावेत.
आता ह्यात कॉर्न फ्लावर घालून, ते चण्यांना सगळीकडून लागेल असे हलवून घ्यावे.
तळणी साठी कढईत तेल गरम करून, थोडे थोडे करून हे चणे तळून घ्यावेत (आच मध्यम ठेवावी, आणि काळजी घेणे, अधून मधून काही चणे फुटण्याची शक्यता असते). सगळे तळून झाले की बाजूला गार करत ठेवावेत
वॉक किंवा कढईत, ३ ते ४ चमचे तेल गरम करून, त्यात बारीक चिरलेला लसूण परतून घ्यावा. ह्यात आता कांद्याचे काप टाकून ते एक तो दोन मिनिटे परतून घ्यावेत.
आता ह्यात शिमला मिरचीचे काप टाकून ते २ ते ३ मिनिटे परतून घ्या. नंतर ह्यात कांदेपातीचा पांढरा आणि हिरवा भाग घालून ते अजून थोडे परतून घायचे आहे.
उभ्या चिरलेल्या मिरच्या घालून अजून थोडा परतून घ्या. ह्यात आता सोया, टोमॅटो, आणि रेड चिली सॉस आणि व्हिनेगर घालून थोडा वेळ परतून घ्या. ह्यात उरलेली काळीमिरी पावडर घालून थोडं परतून घ्या.
तळून घेतलेले चणे शेवटी घालून, मिश्रण परतून घ्या. चवीनुसार मीठ घालून, झाकण ठेवून, गॅस बंद करून, एक ते दोन मिनिटे ठेऊन द्या.
गरम गरम खायला घ्या (चखणा म्हणून उत्तम)! [भाता बरोबर / व्हेज फ्राईड राईस सोबत खायचे झाल्यास, शेवटी, एक कप पाण्यात २ चमचे कॉर्नफ्लॉवर घालून, ते पाणी ह्यात घालून, मंद आचेवर ढवळून घ्या. ह्याने एक जाडसर ग्रेव्ही तयार होईल. असा ग्रेव्ही वाला चिली चना गरम भाता सोबत छान लागतो]
मिसळपाव
प्रतिक्रिया
यम्मी
नेहमीप्रमाणे सुंदर प्रेझेन्टेशन !
अवांतर : ही रेसिपी मक्याचे दाणे घालून करता येईल का
हो, सॉल्ट अँड पेप्पर कॉर्न
In reply to यम्मी by कपिलमुनी
हो, सॉल्ट अँड पेप्पर कॉर्न अशी मिळते देखील काही हॉटेल्स मध्ये....
क्रमवार सचित्र कृती आवडली.
क्रमवार सचित्र कृती आवडली.
असेच पनीर, टोफू, मका, राजमा, बेबी पोटॅटो यांचेही करता येईल असे वाटले - पण ते असे क्रनची / कुरकुरीत नाही होणार बहुतेक.
सुंदर मांडणी आणि छान रेसिपी.
सुंदर मांडणी आणि छान रेसिपी.
ब्येक्कार!
तोंपासु!
Sandy
वाह.. भारी प्रेझेंटेशन.
वाह.. भारी प्रेझेंटेशन.
फोटो पाहूनच भूक खवळते !
फोटो पाहूनच भूक खवळते ! तुम्ही रेस्तराँ काढाच... आधीच काढले असल्यास पत्ता द्या.
डॉक्टर, आभारी आहे...
In reply to फोटो पाहूनच भूक खवळते ! by डॉ सुहास म्हात्रे
....इच्छा तर आहे, बघू कस जमते ते... :-)
छान
छान
अरे वा..
छान दिसतय चना चिली..
स्वाती
तोंडाला
पाणी सुटले हे चटकदार चणे पाहून
वा! छान पाकृ आणि फोटो!
वा! छान पाकृ आणि फोटो!
देशी चन्याला चायनीज वस्त्रे
देशी चन्याला चायनीज वस्त्रे सुरेख घातली आहेत..
तोंपासु...
न्हेम्मी परमाने...केडी विथ
न्हेम्मी परमाने...केडी विथ येडी पा.कृती.
चखना
थंडीमधे चखना म्हणून छान लागेल !
चना चिली
मस्त
मस्तं!
मस्तं!
झकास पाककृती,चिनी पण वेडे
झकास पाककृती,चिनी पण वेडे होतील या पाककृतीने
तळून न
घेता दुसऱ्या कोणत्या प्रकारे करता येतील ?
चणे वापरून केलेली पाश्चात्यांची चिली आहे कि काय ?
व्वा केडी सर, सुरेख पाकृ. चखना म्हणून तर ब्येस्टच !
मात्र शिर्षक वाचून वाटले चणे वापरून केलेली पाश्चात्यांची चिली आहे कि काय.
चणे वापरून केलेली पाश्चात्यांची चिली आहे कि काय ?
व्वा केडी सर, सुरेख पाकृ. चखना म्हणून तर ब्येस्टच !
मात्र शिर्षक वाचून वाटले चणे वापरून केलेली पाश्चात्यांची चिली आहे कि काय.
धन्यवाद!
In reply to चणे वापरून केलेली पाश्चात्यांची चिली आहे कि काय ? by चामुंडराय
पनीर चिली, चिकन चिली तसे चना चिली.. :-)
अरे वा!!!
अरे वा!!!
आहा! फोटो कसला कातिल आलाय!!
आहा! फोटो कसला कातिल आलाय!!
जब्रा पाकृ..
चखणा म्हणून खरोखर अप्रतिम होईल..
मस्त !
प्रेझेंटेशन सुरेख ! फोटो तोंपासु
(No subject)
ग्रेव्ही केली. मस्त झालेली.
ग्रेव्ही केली. मस्त झालेली. ठ्यांकु.
क्या बात है! मस्त!
In reply to ग्रेव्ही केली. मस्त झालेली. by प्राची अश्विनी
क्या बात है! मस्त!
सुरेख
मस्त पाकृ.
नक्की करेन
धन्यवाद
केडी धन्यवाद.
मि सेम मक्याचे दाने वाप्रुन केल. होटेल पेक्शा भारि झाल होत. फोटो काढायला काही उरलच नाही
सही, पुढल्या वेळी फोटो नक्की
In reply to धन्यवाद by पंतश्री
सही, पुढल्या वेळी फोटो नक्की काढून टाका...
लयं भारी !
लयं भारी !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]
कल्पना करू तितक्या अशा
कल्पना करू तितक्या अशा प्रकारच्या पाकृ मिपाकरांनी प्रतिसादात दिल्यात पण तुमची पाकृ पाहूनच म्हणून तुमचे खास अभिनंदन.