||तुलसी विवाह ||

वैभवदातार's picture
वैभवदातार in जे न देखे रवी...
1 Nov 2017 - 1:10 pm

आजपासून सुरू झालेल्या तुलसी विवाहासाठी मी खालील कविता लिहिली आहे...

||तुलसी विवाह ||
चला चला रे आता होऊया
सोहळ्यात रे मग्न
वाद्ये वाजवू नाचू गाऊ
असे हे तुळशीचे लग्न ||धृ ||

जालंदर दैत्य मातला
सुरगण करिती त्यासवे युद्ध
वृंदा भार्या त्याची असे ही
पतिव्रता अन् शरीरशुद्ध ||१ ||

जालंधर रूप घेऊनी श्रीहरी
नष्ट करी तिच्या पातिव्रत्यासी
दैत्य संहारी हरी वदे वृंदे
होशील तू पृथ्वीवरी तुळशी ||२ ||

अर्पिती भक्त मज विविध पुष्पे तरी
तुळशी आवडे मज सर्वांहूनी
कार्तिक मासे लग्न होई आपुले
अजून काय हवे तुला याहूनी ||३ ||

अन्न शुद्ध होई तुझा स्पर्श होता
प्राणवायू सदा देसी जीवांसी
अंगणी वृंदावनी स्थापिती तुजला
करिती तुझिया पूजनासी ||४||

आयुर्वेदामध्ये अग्रस्थान तुझे
तुलसी सेवने रोग नष्ट होती
देसी आरोग्य 'वैभव' मानवा
'तुलसी विवाह' साजरा करिती ||५||

--शब्दांकित (वैभव दातार )
कार्तिक शुद्ध द्वादशी
तुलसी विवाह

कविता

प्रतिक्रिया

तुळशीच्या लग्नात कविता लिहिण्यासारखे काही तरी आहे असे कधी वाटले?
तुळशीला तुमची कविता आवडली का?
तुम्ही तुळशीच्या लग्नाच्या पत्रिका छापता का?
तुळशीच्या लग्नासाठी होलसेलमध्ये मंगलाष्टके लिहिता का?(ही ऑफर नाही..)

अनन्त्_यात्री's picture

1 Nov 2017 - 4:18 pm | अनन्त्_यात्री

...आशय किती मोठा (?) कवीला (?) दिसे... असं म्हटलंच आहे कुणीतरी :)

प्रचेतस's picture

1 Nov 2017 - 4:25 pm | प्रचेतस

उत्कृष्ट कविता

अत्रुप्त आत्मा's picture

2 Nov 2017 - 7:24 am | अत्रुप्त आत्मा

+१ आगोबाोशी सहमत. आगोबा अश्या नवकवींच्या बाबतीत अट्यंट खरे खरे प्रतिसाद देतो!
.
.
.
हुर्र्र्र्र्र्र्र्र... उठा.. नवकवींना प्रतिसाद देत सुटा! =))

वैभवदातार's picture

1 Nov 2017 - 4:50 pm | वैभवदातार

आदरणीय पुंबा

तुळशीला तुमची कविता आवडली का? -- तुम्ही तुळशीला विचारा
तुम्ही तुळशीच्या लग्नाच्या पत्रिका छापता का? -- माझा छापखाना नाही
तुळशीच्या लग्नासाठी होलसेलमध्ये मंगलाष्टके लिहिता का?(ही ऑफर नाही..) -- मी होलसेलमध्ये काही लिहीत नाही

चौथा कोनाडा's picture

4 Nov 2017 - 1:17 pm | चौथा कोनाडा

सडेतोड प्रतिवाद !
हा सदेतोडपणा आवडला गेला आहे !

मिपाकरांच्या खट्याळ प्रतिसादांना जास्त मनावर घेवू नका, मिपाकर असेच टप्पलमारू आहेत. मनामध्ये निगेटिव्हपणा येऊ देऊ नकात.

तुमची कविता गीताकडे झुकते, एकदा तुमचा पोएटिक अनलिसिस करून घ्या की तुम्ही कवि आहात का गीतकार आहात.

तुमच्यातल्या प्रतिभेला नाटक, सिनेमा अशी क्षेत्रे नक्की न्याय देतील याची खात्री बाळगा.

हे वरचं लतोंमोघा वाटत असेल तर क्षमस्व !

पद्मावति's picture

1 Nov 2017 - 5:18 pm | पद्मावति

कविता आवडली.

वाह, आम्हाला तर बुवा चतुर चाणक्यच आठवला. लिहीत राहा असंच. त्रिपुरारी पौर्णिमेचीही अशी एखादी दणकट कविता होऊन जाऊ दे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Nov 2017 - 12:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

तुळशीविवाहाची गोष्ट माहित नव्हती....
वर सूडकाका म्हणतात तसे, होउन जाऔदे त्रिपुरी पोर्णिमेवर पण एक फर्मास कविता.
पैजारबुवा,

नाखु's picture

4 Nov 2017 - 2:25 pm | नाखु

पुढील त्रैमासिक "दीन"विशेष सांगून टाका ना ✋ सरशी

सक्रीय सदस्य
अखिल मिपा नवकवी प्रोत्साहन, संवर्धन, पुनर्वसन, संगोपन व वृध्दींगत काव्यकाजवे दिपोत्सव समिती महासंघ

अत्रुप्त आत्मा's picture

4 Nov 2017 - 11:15 pm | अत्रुप्त आत्मा

वारलो हो नाखू(न) अंकल. =))

माम्लेदारचा पन्खा's picture

4 Nov 2017 - 5:47 pm | माम्लेदारचा पन्खा

वैकुंठ चतुर्दशी राहून गेली आहे की . . .

तिच्यावर नको काय काव्य ?

तुमचे कवितेचे विषय अगदी वेगळे असतात. मराठी भाषेत तुळशी विवाह वर लिहिलेली हि पहिलीच कविता असावी.
मागच्या दहा हजार वर्षात असं लिखाण झालेलं नाही.
कविता खूप आवडली.
कवितेत तुम्ही तुळशी विवाहाचा इतिहास सांगितला आणि तुळशीचे महत्वही सांगितले.
"कार्तिक मासे लग्न होई आपुले
अजून काय हवे तुला याहूनी" या ओळी विशेष आवडल्या.