काही कविता अशा..तर काही तशा...भाग १
काही कविता स्वप्नात जगतात, हलकेच हसतात, प्रेमात पडतात...
काही कविता पटकन समजतात, चालीत बसतात आणि लयीत गातात!
काही कविता शब्दांचे पोकळ डोलारे, बिन मूर्त्यांचे देव्हारे असतात
भावनांचे उगाच कढ आणि ढसढसा ग्लिसरिनचे अश्रू सांडतात!
काही कविता उन्मुक्त अवखळ आपल्याच मस्तीत
तर काही नाकासमोर चालणार्या.. यमकाच्या शिस्तीत!
काही कविता मात्र हटके असतात, वन ऑफ इट्स काइंड असतात.
शब्दांच्या समर्थ कुंचल्यातून नेमके चित्र उभे करतात...
आणि फाफटपसारा न मांडता थेट मुद्द्यावर येतात.
या कविता आपल्याशी गप्पा मारतात, अगदी मनमोकळ्या बोलतात..
मोठेपणाचा आव न आणताही फार मोठी शिकवण देतात.
लाखमोलाची गोष्ट काही ओळीत सांगतात..
विचारांना दिशा आणि मनाला अंतर्मुख करतात!
अशीच एक कविता "स्थितप्रज्ञ"!
या सुंदर शब्दशिल्पाचे शिल्पकार आहेत आपले लाडके मिपाकर 'एस'
काळाच्या दोरीला बांधत
अजून एका शतकाची गाठ
स्वतःशीच हसला तो पाषाणाचा पुतळा
पाषाणाचीच दाढी कुरवाळत मनातल्या मनात
अजून किती जगशील तू?
तुझी ही स्तब्ध पावले थकतील आधी
की काळाची?
अन् मग संवेदना बधीर करत
भिनेल ते विष हळूहळू
सर्वांगात?
जीर्ण देहावरच्या कातळी सुरकुत्या
साक्ष देती कशा आजही
कैक पावसाळ्यांच्या
अन् तख्तपालटांच्या!
त्याच्या नश्वर देहाची ही भव्य आठवण
पेरते का रे आजही तेच विचार
तुझ्याकडे कधीकधी वळणार्या
नजरांमध्ये?
की विझते आजही धुमसती
संघर्षाची धुनी
तुझ्या स्फूर्तीने?
आलाय वाटतं जवळ
तुझ्या निष्प्राण अस्तित्त्वाचा शेवट
ते पहा,
मदांध विजयोन्मादानं भरून गेलंय
कधीच ओसाड पडलेलं हे शहर
येताहेत तुझ्याच दिशेने
काही पावले ओळखीची
हो, तुलाच संपवायला
पुन्हा एकदा
अरे, हे काय?
का रे बाळांनो असे थबकलात किंचितसे?
की तुमच्याही दृष्टीत
नकळत जन्मलेत विचार?
बरं, जरा जपून घाला हं घाव
लागेल एखादा अवचित उडालेला टवका
दगडी ओठांवर उमललं
एक प्रेमळ स्मितहास्य.
पायांवर पडू लागलेले
घणांचे घाव
त्याला जाणवत नव्हते आज
बधीर मनांचे खेळ पाहत
तो पुन्हा गढून गेला
अखेरच्या तत्त्वचिंतनात
त्या स्थितप्रज्ञासारखाच...
या जबरदस्त कवितेचा कवितेचा हिंदीमधे स्वैर अनुवाद करण्याचा मी प्रयत्न केलाय...
समय की माला फेर रहा था, सदियों के मनके लांघ रहा था
प्राचीन बूत पत्थर का था, वह मन ही मन मुसुकुरा रहा था
वक़्त के साथ दौड़ लगाने का जोश उसका अब टूट रहा था
खामोश बेबसियोँ का जहर जैसें नसों में घुल रहा था
प्राचीन पथरीले शरीर पर अब पथरीली झुर्रियाँ बसती हैं
बदलते तख़्तों ताज और सियासतों की कहानियाँ सुनाती है
जीर्ण नश्वर अस्तित्व के अंतिम लम्हे गिनती हैं
अपनी खामोश नज़रोंसे मौसम के पन्ने पलटती हैं..
सोचता है क़ि उसकी हस्ती क्या आज भी आशाएँ सींचती हैं
क्या अब भी उसकी नज़रों से बग़ावत की लौ सुलगती है
आँखे उसकी बदले राजपाट की बिसात बिछते देखती हैं
नज़रें उसकी बदलाव के तूफ़ान में पुरानी पहचाने ढूँढती हैं
इस उजड़े शहर मे अब तबाहियों के मेले है, सन्नाटे का शोर हैं
आँखों में सबकी आज जीत का उन्माद और नफ़रतोंका का बसेरा हैं
उथल पुथल के समुद्र में भी वो जज़ीरे सा खड़ा है
अचल, अटल है वह, 'स्थितप्रज्ञ' है....जैसे बरगद कोई पुराना है
वक़्त ने करवट बदली है, हवाओ ने रुख़ मोड़ा है
पत्थर का वह आदमी आज अंतिम घड़ियाँ गिन रहा है
हाथ में अवजार लिए कातिल कदम बढ़ा चुका है
हथौड़ी, छेनि और कुल्हाड़ी सें उसको खंडों में बाँट रहा है
दुख, पीड़ा संताप दिलसें ओस की भाँति पिघल रहा है
द्वेष और तिरस्कार का हलाहल वह नीलकंठ बनके पी रहा है
तटस्थता सें मुस्कुराकर विनाश का ये खेला देख रहा है
काल के रंगमंच पें अपनी अंतिम सलामी दे रहा हैं
इंद्रियोंकी दहलीज़ को पार करके अब स्वयं से मिल रहा हैं
आत्मचिंतन की गहराई में अपने आप को खो रहा हैं
कोलाहल के बीचोबीच ये बैरागी भावनाओं सें बेगाना हैं
अचल, अटल है वह, 'स्थितप्रज्ञ' है....जैसे बरगद कोई पुराना है……….
अचल, अटल है वह, 'स्थितप्रज्ञ' है....जैसे बरगद कोई पुराना है!!!
प्रतिक्रिया
1 Nov 2017 - 3:26 am | रुपी
वा! सुरेख!
मूळ कविता खूपच छान आणि हा अनुवादही आवडला..
एवढे हिंदी शब्द सुचतात कसे? :)
1 Nov 2017 - 9:23 am | अनन्त्_यात्री
आवडला..
एक अनाहूत सूचना.. कर्ता एकवचनी असेल तेव्हा "है" हे क्रियापद वापरावे व कर्ता बहुवचनी असेल तरच "हैं" (अनुस्वारयुक्त) असे वापरावे. हिंदी अनुवादात अनेक ठिकाणी वाक्यातील कर्ताएकवचनात असूनही (उदा. कातिल कदम बढ़ा चुका हैं) अनवधानाने "हैं" लिहिले आहे.
1 Nov 2017 - 10:43 am | पगला गजोधर
सहज व सुंदर....
1 Nov 2017 - 1:26 pm | पद्मावति
रुपी, अनन्त्_यात्री आणि गजोधर- मन:पूर्वक धन्यवाद __/\__
अनन्त्_यात्री - दुरुस्ती केली आहे. धन्यवाद.
1 Nov 2017 - 11:00 pm | प्राची अश्विनी
तिन्ही कविता सुंदर!
2 Nov 2017 - 12:32 am | जुइ
सगळ्या कविता आवडल्या. तुझे हिंदी भाषेवर चांगले प्रभुत्व दिसत आहे पद्मावति! इतक्या सहजपणे अगदी ओघवत्या शैलीत अनुवाद केला आहेस.
2 Nov 2017 - 3:00 pm | पद्मावति
प्राची अश्विनि आणि जुइ दोघींचे मनःपुर्वक अभार :)
2 Nov 2017 - 8:16 pm | Madhavi1992
फारच सुरेख ग ! आवडल
3 Nov 2017 - 10:02 am | ज्ञानोबाचे पैजार
एस यांची ही कविता वाचायची राहून गेली होती.
फारच सुरेख... आणि त्या खालील प्रतिक्रीयेत प्यारे सरांनी लिहिलेले मुक्तकही छान आहे.
आणि पद्मावती ताईंचा हिंदी अनुवादही अतिशय आवडला, एकदम अलगद आणि सहजसोपा.
पैजारबुवा,
3 Nov 2017 - 6:15 pm | दुर्गविहारी
मस्तच !! जबरी!! +१
4 Nov 2017 - 6:09 pm | पद्मावति
माधवी, पैजारबुवा आणि दुर्गविहारी अनेक धन्यवाद __/\__
4 Nov 2017 - 6:43 pm | बाजीप्रभू
मराठी माणसाचं कविता करण्याइतपत हिंदी चांगलं असू शकतं, नव्हे नव्हे हिंदी भाषिकानेही तोंडात बोटं घालावी इतकं चांगलं असतं हे आजच कळलं..
पद्माक्कांची हिंदीवर कमांड चांगली आहे.
अपुनको, तुपुनकोलाच हिंदी समजणारा, आणि भैया तेरे अंगपर मेरा दो लिटर दूध है अशी दुधवाल्याला आठवण करून देणारा-बाजीप्रभू
5 Nov 2017 - 4:50 pm | पद्मावति
=))