वाटते आज

shrivallabh Panchpor's picture
shrivallabh Panchpor in जे न देखे रवी...
19 Oct 2017 - 11:14 am

वाटते आज

वाटते आज नव्याने लिहावे
शब्दांशी स्वतःला गुरफुटून घ्यावे

शब्दांना नवे पंख असावे
आकाशी घेउनी मला उडावे

वाटते आज नव्याने लिहावे
शब्दांशी स्वतःला गुरफटून घ्यावे

शब्दांना नवे श्वास द्यावे
माझ्या श्वासांशी एकरूप व्हावे

वाटते आज नव्याने लिहावे
शब्दांशी स्वतःला गुरफटून घ्यावे

शब्दांशिवाय काव्य आज स्फुरावे
यमकाने मग स्वतःशीच हसावे

वाटते आज नव्याने लिहावे
शब्दांशी स्वतःला गुरफटून घ्यावे

कवितेला आज विषय नसावे
माझ्यातल्या मला मीच शोधावे

वाटते आज नव्याने लिहावे
शब्दांशी स्वतःला गुरफटून घ्यावे

शब्दांच्या कोषात कवितेने जन्मावे
फुलपाखरू होऊनी रंग उलगडावे

वाटते आज नव्याने लिहावे
शब्दांशी स्वतःला गुरफटून घ्यावे

श्रीवल्लभ पंचपोर

कविता

प्रतिक्रिया

निओ's picture

24 Oct 2017 - 12:34 am | निओ

कविता आवडली.

निओ's picture

24 Oct 2017 - 12:34 am | निओ

कविता आवडली.

निओ's picture

24 Oct 2017 - 12:35 am | निओ

कविता आवडली.

निओ's picture

24 Oct 2017 - 12:36 am | निओ

कविता आवडली.

चांदणे संदीप's picture

24 Oct 2017 - 11:19 am | चांदणे संदीप

मोठ्ठाच इको झाला... :P

Sandy