खुणावतील तुला जटिल गणिते-
विश्वाच्या महास्फोटी प्रसववेणांची
हाकारतील तुला कोडी-
* विस्कळखाईत क्षणोकणी होणार्या
विश्वाच्या अटळ अंताची#
या अपार भूतभविष्यादरम्यान
लीलया झेपावणारा तुझ्या प्रज्ञेचा झोका
कुठे खिळवलाय, हे सव्यसाची?
तो इथेय बघ,
निळ्या पाखरपंखावर
अथक थिरकणार्या
क्षणभंगूर वर्तमानात
(*entropic end of the universe#)
प्रतिक्रिया
23 Oct 2017 - 2:35 pm | पुंबा
वाह!!!
मस्त!!
सव्यसाची का(कुठला पुराणातला संदर्भ आहे का?)?
23 Oct 2017 - 3:45 pm | अनन्त्_यात्री