पुष्कळ दूध शिल्लक आहे काय करावे सांगता काय?
पोस्ट पडताच धाग्याकडे मस्क-यांचे वळले पाय
"मांजर पाळा" मुनी म्हणाले, विंटुविं कुत्रा म्हणती
हसत सुटले गंमतजंमत, Ana पनीर सुचविती
आज्जी सांगे फुल्ल रेशिपी अन् युक्तीचे सहा धडे
कशास इतुके दूध आणावे अभिजिताला प्रश्न पडे
खवा सुचविती सूड , लेखकु, दही लावाया पैताई
उगा काहीतरी करून राहिले आंघोळीची लई घाई
दान करावे मदतनिसेला मनीमौ सुचवू जाई
मापं आणिक ज्ञानेशांना मुलांवरी करुणा येई
या सा-यातच दूध मसाला तेजसजींना आठवले
चहा पाजवा पुणेकरांना सौराअभ्याने चिडविले
दूध कुणाचे ,कपिलेचे की...? कळ काढिती मुनीवर्य
धसास नेती तोही मुद्दा अमुचे शहाणे गजोधर.
ओतून द्या हो ..नासून गेले... 'एसे' कोणी सांगितसे
सांगा काय दुधाचे केलं अभिदेशांना वाटतसे.
इतक्या सगळ्या सल्ल्यांनंतर श्रीखंड बनले फर्मास
ढवळत बसले इथे दमामि डोक्यामधल्या दह्यास.
प्रतिक्रिया
28 Sep 2017 - 3:00 pm | पद्मावति
:)
28 Sep 2017 - 3:08 pm | अभ्या..
अरे वा माझे नाव आले.
मस्त मस्त
28 Sep 2017 - 8:17 pm | उगा काहितरीच
+1
28 Sep 2017 - 3:12 pm | एस
खुखुखुखु!!! =))
28 Sep 2017 - 3:14 pm | पुंबा
ह्याह्याह्या...
28 Sep 2017 - 3:28 pm | अभिजीत अवलिया
वा वा. मस्त.
28 Sep 2017 - 3:36 pm | सूड
चान चान
28 Sep 2017 - 3:53 pm | अनन्त्_यात्री
"मार्मिक"धाग्यावर अशी कविता केली असती तर ती किती कडव्यांची झाली असती या विचाराने दिमाग का प्रथम दही हुवा व कालान्तराने त्या दह्याचा चक्का झाला!
28 Sep 2017 - 3:56 pm | विनिता००२
सुरेख जमलिये :)
दह्यासारखीच ;)
28 Sep 2017 - 4:00 pm | पगला गजोधर
ह्याह्याह्या...
मस्त..
बादवे
घुसळता दही, उडवीतत्यात भाजकी जिरे पूड , कोथंबीरीचे शिंतोडे...
निचरे उष्मा, पोसे थंडावा, हिरवळ भासे चहूकडे....
.
.
.
आदाब अर्ज है
29 Sep 2017 - 6:14 am | दमामि
कोथिंबीरीचे शिंतोडे .... कल्पना भारी आहे.
28 Sep 2017 - 4:10 pm | पाटीलभाऊ
हाहाहा...मस्तच
28 Sep 2017 - 4:22 pm | पैसा
=))
28 Sep 2017 - 4:24 pm | सस्नेह
=)) =))
'द' मामींचे पुनरागमनार्थ स्वागत !
28 Sep 2017 - 7:28 pm | पगला गजोधर
दमामी परत आले, म्हणजे फॉरेन ट्रिप वर गेलेले ४-५ मिपा आयड्या भारतात परत आल्या वाटतं...
28 Sep 2017 - 5:08 pm | एमी
हा हा हा =))
28 Sep 2017 - 5:43 pm | मिसळपाव
क्या बात है, व्वा! फाटलेल्या दूधाचे रसगुल्ले करून ते कारणी लावावं तद्वत झालं हे :-P
28 Sep 2017 - 6:35 pm | दुर्गविहारी
:-) वेड्यासारखा हसतोय. आधी प्रेरणा वाचली मग तुमचे विंड्बन. मस्तच लिहीलय. लई भारी.
28 Sep 2017 - 6:47 pm | सूड
किती जणींनी मिळून लिहीलीत?
28 Sep 2017 - 8:18 pm | टवाळ कार्टा
खि खि खि ख्या ख्या ख्या खु खु खु
28 Sep 2017 - 9:17 pm | पगला गजोधर
काहीजण स्वतःच्याच रचनेवर, स्वतःच खो खो खेळताना पाहून,
मला एक मिपाकर म्हणून शरम वै वै
28 Sep 2017 - 9:23 pm | अभ्या..
नै नै
दगा दगा वै वै
28 Sep 2017 - 11:44 pm | सूड
दमामि हा मिपावरच्या काही काकू मंडळींचा सामुहिक आयडी आहे असं माईसाहेबांनी नानासाहेबांना सांगताना ग्रेटथिंकरने ऐकलं असं टफि लुनावाल्या ब्रह्मेंना सांगत असल्याचं अकु एका कट्ट्याला बोलले.
29 Sep 2017 - 6:12 am | दमामि
चार पाच बायका किंवा काही काकू यांचं फक्त नवरात्रीच्या रंगांपुरतंच एक्मत जुळतं.
29 Sep 2017 - 9:24 am | पगला गजोधर
असं कसं, असं कसं....
आजूबाजू जर गोपिया,
तर् मधे असेल .....कान्हा कान्हा कान्हा ..
सगळ्या त्यांस छेडीती...
म्हणोन टक्कुमक्कु.... शोना शोना शोना....
29 Sep 2017 - 3:58 pm | टवाळ कार्टा
=))
29 Sep 2017 - 4:17 pm | दमामि
=))
28 Sep 2017 - 10:34 pm | रुपी
=)
28 Sep 2017 - 11:51 pm | माम्लेदारचा पन्खा
येलकम . . . .
29 Sep 2017 - 4:19 pm | दमामि
प्रतिभा अफाट की अवाढव्य याबाबत जरा माझं कन्फुजन आहे.;)
29 Sep 2017 - 3:36 pm | मनिमौ
हहपुवा
29 Sep 2017 - 4:18 pm | दमामि
सगळ्यांना दंडवत__/\__.