जगण्यासाठी पुरेसे

RDK's picture
RDK in जे न देखे रवी...
21 Sep 2017 - 6:56 pm

भूतकाळाला निरोप देवून ,भविष्याकडे वाटचाल कर
सारे कटू अनुभव सोडून, प्रकाशाची वाट धार
विषारी अशा भूतकाळाला, पाण्यामध्ये बुडवून टाक
दंश करण्या भविष्याला, संधी त्याला देवू नको
भूतकाळ चांगल असो वा वाईट, त्याला परत आणता येत नाही
भविष्य असते आपल्या हातात, ही संधी गमवू नको

लोकांना दे सोडून नि, सोड त्यांच्या विचारांना
ते काय विचार करतात, याशी तुझे कर्तव्य नाही
तुझ्याबद्दल कितीही चुकीचे विचार असतील त्यांचे
पण स्वतःला चांगले ओळखणारा, तुझ्याशिवाय दुसरा कोण
लोकांच्या मनाचा ताबा घेण, अवघड निश्चितच असेल
पण स्वतःच्या मनाशी संवाद साधण, किती बर कठीण असेल

वेळ ही दवा आहे , प्रत्येक दु:खासाठी प्रत्येकाच्या
घडाळ्याच्या गतीसोबत येथे, हमखास उपचार आहे
फक्त वेळेला वेळ देण, आपण थोड शिकलं पाहिजे
भूतकाळास विराम जिथे , आणि भविष्याची पहाट आहे
वेळेआधी कोण बरे, जाणून हे सारे आहे

आपला प्रवास सुखाचा करा , इतरांशी ओढ नको
कोणी म्हंटले Everest वर, पोहचू केवळ एकाच शकलाय
प्रत्येकाचा चेहरा वेगळा, आणि बोटांचे ठसेही निराळे
मग आयुष्य तरी सारखे, कसे असेल सगळ्यांचे ??
त्यांचा संघर्ष , त्यांचा प्रवास, त्यांची परिस्थिती वेगळी असेल
मग स्पर्धा करून स्वतःच्या, डोक्याचा भुगा का करताय??
प्रवास कार्य एन्जोय तुम्ही, लक्ष्याकडे चालत जा
"Safe journey " नाही तर "Happy Journey" असत तिकिटावर

अष्टपैलू व्हायचय, त्यासाठीच प्रयत्न का
पण स्वतःवर इतके कठोर , होऊ नकोस मित्रा रे
विचार फार करतोस का रे, गती थोडी धीमी कर
गठ्ठा गठ्ठा रद्दीपेक्षा, दोन तीन पुस्तके भर
ठीक आहे कि तुला, माहिती नाही सारे
पण सगळीच उत्तरे हवीत, अशी सक्ती केलीय का कोणी??

सगळ्या वातावरणाला बदलण्याची, ताकत एका हास्यात आहे.
बघाना करून एक स्मितहास्य, किती गोड दिसता तुम्ही
अडचणी असतील पुढ्यात भरपूर, पण लढण्यासाठी बळ हवे
एका स्मितहास्याने नक्कीच मिळेल, एक किलो बळ मोफत
तुमच्या समस्या काहीच नाहीत,जगात पुष्कळ समस्या आहेत
तुम्हाला या सगळ्या नाहीत, हेच हसण्याचे कारण आहे
हसा जरा जोरात हसा, किंवा द्या केवळ स्मितहास्य
अडचणी पळतील घाबरून, बघून हिंमत तुमची
=============================> RDK

कविता

प्रतिक्रिया

ज्या कशास बळ देण्यासाठी कविता लिहीलीत त्यास बळ मिळो . मिपावरच्या आपल्या सर्वच कविता वरुन नजर टाकली. पुढील लेखनास शुभेच्छा.

नक्कीच भाषांतर देइन

RDK's picture

21 Sep 2017 - 9:53 pm | RDK

वरची भाषांतराची comment चूकीची असून ती माझ्या आहीराणी कवितेसाठी होती