मिठी

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
14 Sep 2017 - 3:48 am

समोरंच एका मुलीनी मुलाला मारलेली निर्व्याज मिठी बघून वाटलं
"सालं, आपल्यावेळी नव्हतं असं काही"

आताही ती असती अन तिन हे बघितलं असतं तर
हळूच हसंत म्हणाली असती
"आपल्यावेळी नव्हतं बाई असं काही"

मी उगाचंच आठवणींच्या गर्तेत..
दूर उडून चाललेल्या सावरीच्या कापसाच्या म्हातार्‍या पकडू पाहतोय मनांत
पूर्वीच्याच अल्लडपणे.

मुक्तक

प्रतिक्रिया

आदिजोशी's picture

14 Sep 2017 - 12:43 pm | आदिजोशी

मिठी नदी बद्दल कविता आहे. असो.

चांदणे संदीप's picture

14 Sep 2017 - 5:29 pm | चांदणे संदीप

असो, लिहिलंय छान!

Sandy

विशुमित's picture

14 Sep 2017 - 6:07 pm | विशुमित

दूर उडून चाललेल्या सावरीच्या कापसाच्या म्हातार्‍या पकडू पाहतोय मनांत>>>
==>> वाह! क्या बात है ?

ज्योति अळवणी's picture

15 Sep 2017 - 4:33 pm | ज्योति अळवणी

छान लिहिली आहे

जव्हेरगंज's picture

15 Sep 2017 - 7:03 pm | जव्हेरगंज

मस्त!

चित्रगुप्त's picture

17 Oct 2021 - 8:49 pm | चित्रगुप्त

निर्व्याज, अल्लड कविता आवडली.