वस्त्र ढगांचे धुवून सागरी वाळत घालीन व्योमी
धग सूर्याची परिटघडीला येईल माझ्या कामी
कधि चंद्राचा घेउनी चेंडू करेन क्रीडा गगनी
चांदणमेवा थोडा थोडा चाखिन अधुनी मधुनी
प्रकाशवर्षांचे अंतर मी तोडिन प्रकाश वेगे
अंतरिक्ष लंघून संपता कशास येईन मागे?
भव्य स्वप्न हे माझे कधितरी येईल का सत्यात?
ठाऊक नाही, पण तोवर मी झोपून पाहीन वाट!
प्रतिक्रिया
13 Sep 2017 - 6:02 pm | पद्मावति
वाह!
चांदणमेवा
:) खुप मस्तं कल्पना.13 Sep 2017 - 11:40 pm | रुपी
सुरेख!
शीर्षक मात्र कवितेला तेवढा न्याय देणारे नाही असे वाटले..
14 Sep 2017 - 11:11 am | पुंबा
मस्त!!!
हे आमचे ब्रिद असल्याने अधिक आवडले..
:))
15 Sep 2017 - 9:22 am | अनन्त्_यात्री
पद्मावति, रुपी, सौरा - आपल्या प्रतिसादांबद्दल.
15 Sep 2017 - 4:20 pm | लाल गेंडा
छान . मस्त
शार्दूलविक्रीडित का हा अलंकार?
15 Sep 2017 - 7:47 pm | अनन्त्_यात्री
शार्दूलविक्रीडित हा अलंकार नसून ते वृत्त आहे. ' आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक" ही आचार्य अत्र्यांची कविता या वृत्तात आहे. माझे बडबडगीत लयबद्ध आहे (असे वाटते) पण वृत्तबद्ध नाही.
15 Sep 2017 - 8:43 pm | लाल गेंडा
15 Sep 2017 - 8:43 pm | लाल गेंडा
15 Sep 2017 - 8:43 pm | लाल गेंडा
15 Sep 2017 - 8:43 pm | लाल गेंडा
मी मराठीकडे परत येतोय, डोक्यात जरा गोंधळ आहे. त्यामुळे अस घडतंय.
मी माझी कविता शार्दूलविक्रीडीत मध्ये लिहायचा प्रयत्न केला म्हणून तेच डोक्यात.
18 Sep 2017 - 10:40 pm | नाखु
कवीची वृत्ती बघायची, वृत्त शल्यचिकित्सक वाचकांच्या बसकी बात नाही
मिपा आद्य चारोळी कार आत्मुदा यांच्या "कवि-काकवी" या समिक्षा ग्रंथातुन साभार