ही नवनिर्मितीची अदभुत प्रयोजनकता
ही उध्वस्ततेच्या दुख-या पाऊलवाटा
ही हैवानाची क्रुर वासना
ही मनोमिलनाची हळुवार संवेदना
ही नग्न सत्यातील गुप्तता
ही गुप्ततेतील गलिच्छ नग्नता
ही आनंदपुर्तीचा हळुवार हुंकार
ही बुजबुजलेल्या बाजारांचा भडिमार
ही पुजनिय लिंगरुपी अवतार
ही ब्रह्मचर्याचा अनोखा अविष्कार
प्रतिक्रिया
28 Aug 2017 - 7:44 pm | धर्मराजमुटके
काय कळले नाही ब्वॉ !
28 Aug 2017 - 9:55 pm | शब्दानुज
ही म्हणजे प्रणय भावना
आता वाचा
29 Aug 2017 - 3:22 pm | अत्रुप्त आत्मा
जिल्ब्यानुज..
ही शब्दप्रसवतेची कुंबट कुंधकता
अर्थास सोडुनी आशयास करिते टाटा!
... ऊंबबब... होत नै .. जरा ब्रेक घेतो
29 Aug 2017 - 4:09 pm | माम्लेदारचा पन्खा
दिव्य दर्शन !
29 Aug 2017 - 4:41 pm | शब्दानुज
आपला टोमणा आम्ही कौतुकाच्या रुपात स्विकारत आहोत.
29 Aug 2017 - 6:17 pm | माम्लेदारचा पन्खा
माझा प्रतिसाद अ आ यांना होता . . . . .
29 Aug 2017 - 4:39 pm | शब्दानुज
प्रत्येक कडव्यात एकाच प्रणय भावनेतिल विरोधाभास आहे.
ही नवनिर्मितीची अदभुत प्रयोजनकता
ही उध्वस्ततेच्या दुख-या पाऊलवाटा
पहिली अोळ प्रणय ही निर्मितीचे कारण असल्याचे सांगते
दुसरी अोळ बलात्कार झालेल्या स्त्र्ीवर आहे.
एकच भावना पण निर्मिती आणि उध्वस्त या दोन अवस्था
ही हैवानाची क्रुर वासना
ही मनोमिलनाची हळुवार संवेदना
प्रयण भावनेतील दोन वेगळ्या नजरा या कडव्यात आहेत. एक नजर वासनेची तर दुसरी नजर प्रयणाची हळुवार इशारा देणारी आहे
ही नग्न सत्यातील गुप्तता
ही गुप्ततेतील गलिच्छ नग्नता
एकीकडे विषय चर्चिला ही न जावा इतका भिडस्तपणा तर दुसरीकडे कोणतेही बंधन न पाळणारा उद्दामणा
ही आनंदपुर्तीचा हळुवार हुंकार
ही बुजबुजलेल्या बाजारांचा भडिमार
एकीकडे विवाहबंधनातील रसपुर्ण प्रणय आहे तर दुसरीकडे बाजारु प्रणयही उपलब्ध आहे
ही पुजनिय लिंगरुपी अवतार
ही ब्रह्मचर्याचा अनोखा अविष्कार
धार्मिक विश्वासांवरील विरोधाभास या कडव्यात आहे. एकीकडे लिंगपुजा मान्य करण्याएवढा मोठेपणा आहे तर दुसरीकडे ब्रह्मचर्यासारखे काहीसे संकुचित प्रवाहही आहे.
लहान लोकांना सांभाळुन घ्यावे ही विनंती. २१ वर्षी जगाची चिंता करण्याएवढे माझे विचार प्रगल्भ नाहित..
29 Aug 2017 - 3:22 pm | अत्रुप्त आत्मा
जिल्ब्यानुज..
ही शब्दप्रसवतेची कुंबट कुंथकता
अर्थास सोडुनी आशयास करिते टाटा!
... ऊंबबब... होत नै .. जरा ब्रेक घेतो
29 Aug 2017 - 5:09 pm | शब्दानुज
ब-याचवेळा जेवण न पचणे हा माणसाच्या कमकुवत पचनशक्तीचा दोष असतो , जेवणाचा नाही.
दोषारोपण जरुर करा पण असल्या आडवाटा नकोत_/\_
30 Aug 2017 - 1:03 am | ज्योति अळवणी
नाही जमलं बुवा