रिमझिम पाऊस पडतो ..!!

विशुमित's picture
विशुमित in जे न देखे रवी...
16 Aug 2017 - 11:44 pm

रिमझिम पाऊस पडतो
सुन्नं सुन्नं मन भिजवतो ..!!

हा वारा निवारा मनाचा
चिंब झाला पिसारा झाडांचा
धुंध ही निशा
आली नशा
भिजली आकाशा
सखी रे तुझी...
रिमझिम पाऊस पडतो ..!!

चालविला धिंगाणा विजांनी
मोकळे केस सोडले मेघांनी
माझिया या सख्या
रात्री अश्या
कवेत(मिठीत) तुझ्या
आवळून घे....
रिमझिम पाऊस पडतो...!!

रिमझिम पाऊस पडतो
सुन्नं सुन्नं मन भिजवतो ..!!

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

17 Aug 2017 - 8:33 am | धर्मराजमुटके

कवित च्या ऐवजी 'कवेत' असे हवे होते का ?

विशुमित's picture

17 Aug 2017 - 10:08 am | विशुमित

धन्यवाद धर्मराज जी ..!!

बोली भाषे वरून घेतला होता हा शब्द. पण "कवेत" हा शब्दच बरोबर वाटत आहे.
कृपया बदल करून देता का संपादक महोदय?

मराठातलं सुन्न आणि हिंदीतील सूनं (सुना सुना लाग राहा है आज मधला) यात फरक आहे ना? कवितेत दोघांचं एकत्रीकरण झालेला दिसतंय.

केवढे टायपो! एडिट ची सुविधा द्या हो..

विशुमित's picture

17 Aug 2017 - 10:22 am | विशुमित

हिंदीतील सुनं अपेक्षित आहे. "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या" मधले सुनं.

तृप्ति २३'s picture

18 Aug 2017 - 1:06 am | तृप्ति २३

खूप छान कविता केली आहे. मला हि कविता फार आवडली आहे.तुम्ही पण माझी कविता वाचा आणि तुमचा प्रतिसाद दया.
Marathi kavita

विशुमित's picture

19 Aug 2017 - 12:49 pm | विशुमित

धन्यवाद तृप्ती ताई..!!

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Aug 2017 - 1:06 am | अमरेंद्र बाहुबली

आवडली.

विशुमित's picture

19 Aug 2017 - 1:34 am | विशुमित

धन्यवाद..!!

जेम्स वांड's picture

19 Aug 2017 - 8:29 am | जेम्स वांड

ही पण कला आहे व्हय तुमच्यात!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Aug 2017 - 10:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोकळे केस सोडले मेघांनी

हे तर खासच.

-दिलीप बिरुटे

विशुमित's picture

19 Aug 2017 - 12:48 pm | विशुमित

बिरुटे सर खूप खूप आभारी आहे..!!
माझी कविता सार्थकी लागली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Aug 2017 - 11:58 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली,
पैजारबुवा,

अभ्या..'s picture

19 Aug 2017 - 12:04 pm | अभ्या..

अरे वा विशुपाटील, तुम्ही कविता पण करता का?
भारीच ओ, आवडली

पैसा's picture

19 Aug 2017 - 12:54 pm | पैसा

काही कल्पना खूप चांगल्या आहेत.

विशुमित's picture

19 Aug 2017 - 1:02 pm | विशुमित

जेम्स जी, पैजार जी , अभेंद्र जी... खूप आभारी आहे.

करत असतो थोडा थोडा प्रयत्न. पण भाषा आणि व्याकरण कच्च आहे. माझ्या लेखी मिपामुळे बरीच सुधारणा झाली आहे लेखनात. भविष्यात चांगले प्रयत्न चालू राहतील.
---------------
मी काही मराठी गाणी पण कंपोज केली आहेत (चालीसकट). रिमझिम पण त्या पैकी एक आहे.
रेकॉर्डिंग करण्याचा मानस आहे. त्यासाठी मागे डांगेंनी "वेल्लाभट" यांचे नाव सुचवले होते. कामाच्या व्यापामुळे बारगळले आहे.