ऐका ! ती सध्या काय करते
उठल्या उठल्या वाय- फाय करते
सकाळ पासून खाय खाय करते
तिखट खाऊन हाय हाय करते
बिल आले की नाय नाय करते
रोज नव्या मित्राला 'हाय' करते
संध्याकाळी त्याला 'बाय' करते
रोज नवा ड्रेस 'ट्राय' करते
वय लपावे म्ह्णून 'डाय' करते
खोटं खोटंच 'शाय' करते
दुसऱ्याचा भेजा 'फ्राय' करते
स्वतः मस्त 'एन्जॉय' करते
तीच जाणे कसे काय करते
कळलं ? ती सध्या काय करते ?
------ बाळ ठोम्बरे
प्रतिक्रिया
14 Aug 2017 - 8:26 pm | बाळ ठोंबरे - प्रकाश
अभिप्राय अपेक्षित आहे - धन्यवाद !
14 Aug 2017 - 8:39 pm | प्रचेतस
अप्रतिम कविता
15 Aug 2017 - 7:03 pm | तृप्ति २३
व्वा खूप छान कविता केली आहे. मला हि कविता फार आवडली आहे.तुम्ही पण माझी कविता वाचा आणि तुमचा प्रतिसाद दया.
Marathi kavita
15 Aug 2017 - 7:40 pm | अभ्या..
मस्तच कविता. एकच लंबर. प्रचंड प्रतिभा दडलीय तुमच्यात. येऊ द्या एकेक.
आणि ही प्रतिसादातली "इस हातसे लेव दुसरे हातसे घेव" सिस्टिम लै आवडली आहे.
15 Aug 2017 - 8:50 pm | आदूबाळ
कवितेचा बार्टरू | जैसे बक्कल नि गार्टरू | मिपा केले चार्टरू | काव्ययोगे ||
16 Aug 2017 - 3:10 am | गामा पैलवान
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय
माझ्या पिरतीची रानी तू व्हशील काय
-गा.पै.
16 Aug 2017 - 3:10 am | गामा पैलवान
गोमू संगतीला माझ्या तू येशील काय
माझ्या पिरतीची रानी तू व्हशील काय
-गा.पै.
16 Aug 2017 - 9:58 am | अभ्या..
आहाहाहा, अमृतानुभव अगदी
काव्याबाजाराची स्कीमु । जैसे सेल्सप्रमोशनु । बायवने गेटवनू । मिपाकौंटरे ।।
16 Aug 2017 - 9:25 am | अत्रे
टुकार.