आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञ

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
11 Aug 2017 - 12:04 pm

गेल्या काही दिवसांत मला अनेक ग्रामीण व निमशहरी भागातील लोकांनी शहरांत उपलब्ध असणार्‍या वैद्यकीय तज्ञांबद्दल शंका विचारल्या. तेव्हा असे लक्षात आले की सामान्यजनांमध्ये ‘विशेष वैद्यकीय तज्ञ’ शोधण्याबाबत काही गैरसमज आहेत. तेव्हा असे वाटले, की आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञांची माहिती या लेखाद्वारे करून द्यावी. पदव्यांच्या चढत्या श्रेणीनुसार भारतातील माहिती पुढे देत आहे:

१. मूलभूत पदवी : MBBS. हे कुटुंबवैद्य असतात.

२. पदव्युत्तर शिक्षणाच्या दोन प्रमुख शाखा : MD & MS

३. MD मध्ये जवळपास ५० उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे डॉ.( Consultant / Specialist) खालील शाखांचे असतात:

• मेडिसिन : हे डॉ. हृदय, फुफ्फुस, पोटातील अवयव, मेंदू , मधुमेह, रक्तदाब इ. चा एकत्रित अभ्यास केलेले असतात.
• फुफ्फुसरोग तज्ञ
• बालरोगतज्ञ
• स्त्री रोग व प्रसूती तज्ञ
• त्वचा व गुप्तरोग तज्ञ
• मनोविकार तज्ञ
. Pathology ( laboratory medicine)
• Radiology ( X ray, sonography, CT scan, MRI इ.) तज्ञ
• भूलतज्ञ

४. MS मध्येही खूप उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे तज्ञ असे :

• जनरल सर्जन
• हाड व सांधे विकारतज्ञ ( Orthopedics)
• डोळ्यांचे विकार तज्ञ
• कान, नाक व घसा तज्ञ
• Plastic surgeon

५. DM ही MD च्या पुढील Superspeciality आहे. यात सुमारे ३० उपशाखा आहेत. त्यातील नेहमीच्या अश्या :
• हृदयविकार तज्ञ
• मेंदूविकार तज्ञ
• कर्करोग तज्ञ
• पोट व यकृत विकार तज्ञ
• रक्तविकार तज्ञ
• हॉरमोन विकार तज्ञ
• मूत्रपिंड विकार तज्ञ
• सांधे विकार तज्ञ (Rheumatologist)
• संसर्गजन्य विकार तज्ञ
• अतिदक्षताविभाग तज्ञ ( Critical Care Medicine)
• Immunologist

६. MCh ही MS च्या पुढील Superspeciality आहे. त्यातील प्रमुख उपशाखा :

• हृदय शस्रक्रिया तज्ञ
• मेंदू शस्रक्रिया तज्ञ
• पोट, यकृत इ. चा शस्रक्रिया तज्ञ
• बालक शस्रक्रिया तज्ञ
• कर्करोग शस्रक्रिया तज्ञ
• मूत्रमार्ग व प्रोस्टेट शस्रक्रिया तज्ञ
• हात शस्रक्रिया तज्ञ

MD & MS ना समकक्ष असणारा अजून एक अभ्यासक्रम म्हणजे Diplomate of National Board (DNB). ही पदवी राष्ट्रीय पातळीवर परिक्षा घेऊन दिली जाते. या अंतर्गतही वर उल्लेखिलेल्या अनेक उपशाखा असतात. सर्वसामान्य लोकांना DNB हे नेमके काय हे फारसे माहित नसते. तेव्हा अशी पदवी असणारा डॉ. हा स्पेशालिस्टच असतो हे ध्यानात घ्यावे.
तर, थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. अतिविशिष्ट तज्ञांची माहिती दिलेली नाही. लेख उपयोगी पडावा ही अपेक्षा. काही शंका असल्यास त्यांचे स्वागत.

समाजआरोग्य

प्रतिक्रिया

याखेरीज इतर पदव्या क्वॅक मानाव्यात का?

काही जुन्या पदव्या धारण करणारे डॉक्टरही अद्याप प्रॅक्टिस करताना दिसतात.

एफआरसीएस, एलसीपीएच, डीसीएच वगैरे अनेक. काहींच्या पदवीपुढे (Lon. ) म्हणजे बहुधा लंडन असंही लिहीलेलं असतं.

माहितगार लोकांनी फसव्या पदव्यांविषयीही लिहावं.

कुमार१'s picture

11 Aug 2017 - 1:17 pm | कुमार१

गवि,
1. LCPS हा MBBS पूर्व अभ्यासक्रम होता.
2. MBBS नंतर 2 वर्षांचे diploma असतात. उदा
DCH, DGO
3. MRCP, FRCS या UK च्या fellowships आहेत.

सुबोध खरे's picture

11 Aug 2017 - 1:45 pm | सुबोध खरे

लोक MRSH किंवा ARSH लंडन लिहितात. हे म्हणजे मेम्बर ऑफ रॉयल सोसायटी ऑफ हेल्थ आणि असोसिएट मेम्बर( जर आपण होमियोपॅथ किंवा तासांपडवी असेल तर. हे सदस्यत्व (मेम्बरशिप) कोणत्याही व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरला पैसे भरून मिळू शकते. बरेच डॉक्टर एम बी बी एस नंतर हे सदस्यत्व घेऊन पाटीवर आणि आपल्या पत्रकावर आपली पदवी भारदस्त करण्यासाठी एम बी बी एस, एम आर एस एच ( लंडन) असे लिहितात.
बाकी पदवी भारदस्त करण्याचे अनेक प्रकार आपण पाहतो. उदा MBBS RPMC ( यात RPMC हे राजेंद्र प्रसाद मेडिकल कॉलेज पाटणा असे आहे.)
BHMS CCH CGO यात CCH आणि CGO हे BHMS किंवा BAMS नंतर एक एक महिन्याचे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत
CERTIFICATE IN CHILD HEALTH आणि CERTIFICATE IN GYNECOLOGY AND OBSTE TRICS
किंवा DNB च्या पुढे MNAMS लिहितात( दोन्ही एकच आहे).

अभिजीत अवलिया's picture

11 Aug 2017 - 2:13 pm | अभिजीत अवलिया

अस असतयं होय हे. धन्यवाद ह्या माहितीबद्दल.

RPMC हे राजेंद्र प्रसाद मेडिकल कॉलेज पाटणा असे आहे.

हायला.. हद्दच आहे.

बादवे. पूर्वी गावाकडे पदवीपुढे कंसात (BOM) म्हणजे मुंबई असं लिहूनही भारदस्तपणा आणला गेलेला पाहिला आहे.

साधा मुलगा's picture

12 Aug 2017 - 2:43 pm | साधा मुलगा

CGO-CERTIFICATE IN GYNECOLOGY AND OBSTE TRICS या लोकांना कायद्याने प्रसुती करण्याचा अधिकार आहे का?

कुमार१'s picture

12 Aug 2017 - 3:12 pm | कुमार१

कायद्या चे माहीत नाही पण शेवटी हे लोक डॉ च्या तुलनेत दुय्यमच असतात. जर मूल अडले तर त्यांची भंबेरी उडते.वर रुग्णाला धोका.

मनिमौ's picture

11 Aug 2017 - 2:57 pm | मनिमौ

बर्याच गोष्टी माहित नवत्या

IT hamal's picture

11 Aug 2017 - 3:48 pm | IT hamal

आजकाल आयुर्वेदाचा MD नाही हे लोकांना कळावे म्हणून ऍलोपॅथी डॉक्टर MBBS , MD असे लिहितात.. LCEH काय प्रकार आहे/होता? ...आम्ही शाळेत जातांना एका डॉक्टर च्या पाटीवर DHB पदवी लिहिलेली रोज बघायचो...आम्ही शाळकरी मुलांनी त्याचा फुलफॉर्म " डॉक्टर हा x x ला बसले " असा बनवला होता !!!

धन्यवाद. प्रत्येक शब्दाचे इंग्रजी भाषांतर दिले तर बरे होईल.

कुमार१'s picture

11 Aug 2017 - 4:20 pm | कुमार१

LCEH = Licenciate Of College of Electro Homeopathy. हा BHMS पूर्व डिप्लोमा होता.

एका डॉक्टर च्या पाटीवर DHB पदवी लिहिलेली रोज बघायचो...आम्ही शाळकरी मुलांनी त्याचा फुलफॉर्म " डॉक्टर हा x x ला बसले " असा बनवला होता !!! >>> सही !
तसा आम्ही पी. एच. डी. चा बनवला होता : पा** हा** धु** !! (ओळखा)

सुबोध खरे's picture

12 Aug 2017 - 9:50 am | सुबोध खरे

LCEH म्हणजे Licentiate of C ourt of Examiners of Homeopathic and biochemic system of medicine
GCEH म्हणजे Graduate of Court of Examiners of Homeopathic and biochemic system of medicine
पूर्वी DHMS ,डिप्लोमा इन होमिओपॅथिक मेडिसिन
DSAC डिप्लोमा इन शुद्ध आयुर्वेदिक कोर्स
MFAM मास्टर इन फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन
GFAM ग्रॅज्युएट इन फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन
DHB डिप्लोमा इन होमिओपॅथिक बोर्ड होत्या
अशा सर्व तर्हेच्या वेगवेगळ्या पदव्या पदविका बंद करून प्रमाणीकरण(STANDARDIZATION) करण्याच्या दृष्टीने सरकारने
BAMS बॅचलर इन आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी
BHMS बॅचलर इन होमीयोपॅथीक मेडिसिन अँड सर्जरी
BUMS बॅचलर इन युनानी मेडिसिन अँड सर्जरी
अशा प्रमाणित पदव्या देणे सुरु केले जेणे करून पदव्युत्तर शिक्षणाचा मार्ग खुला झाला. पूर्वी या इतर पदविकांना पदव्युत्तर पदवी किंवा व्यवस्थापनातील पदवी उदा. हॉस्पिटल मॅनेजमेंट मधील एम बी ए सारखी पदवी घेणे शक्य होत नसे.
आता सर्व पदव्याचे आणि अभ्यासक्रमांचे प्रमाणीकरण झाल्याने हे मार्ग खुले झाले आहेत.

कुमार१'s picture

12 Aug 2017 - 12:07 pm | कुमार१

सुबोध, आभार.

कुमार१'s picture

11 Aug 2017 - 4:29 pm | कुमार१

@Atre:
• फुफ्फुसरोग तज्ञ Pulmonologist / chest physician
• बालरोगतज्ञ Pediatrician

• स्त्री रोग व प्रसूती तज्ञ Gynecologist & Obstetrician

• त्वचा व गुप्तरोग तज्ञ Dermatologist & Venereologist

• मनोविकार तज्ञ Psychiatrist
• भूलतज्ञ Anesthesiologist

हृदयविकार तज्ञ Cardiologist

• मेंदूविकार तज्ञ Neuro ....

• कर्करोग तज्ञ Onco.....

• पोट व यकृत विकार तज्ञ :Gastroentero......

• रक्तविकार तज्ञ Hemato.....

• हॉरमोन विकार तज्ञ Endocrino....

• मूत्रपिंड विकार तज्ञ Nephro.....

हृदय शस्रक्रिया तज्ञ Cardiothoracic surgeon

• मेंदू शस्रक्रिया तज्ञ Neuro....

• पोट, यकृत इ. चा शस्रक्रिया तज्ञGastroentero....

• बालक शस्रक्रिया तज्ञ Pediatric S....

• कर्करोग शस्रक्रिया तज्ञ Onco S....

• मूत्रमार्ग व प्रोस्टेट शस्रक्रिया तज्ञ Uro S...

• हात शस्रक्रिया तज्ञ Hand S...

अत्रे's picture

12 Aug 2017 - 6:10 am | अत्रे

धन्यवाद

कंजूस's picture

11 Aug 2017 - 9:56 pm | कंजूस

एका शाखेच्या पदवीधराने दुसय्राच्या कक्षेतील रुग्णास औषधोपचार केले तर चालतात का?
शरीरशास्त्र प्रत्येकालाच शिकावे लागते.

सुबोध खरे's picture

11 Aug 2017 - 10:32 pm | सुबोध खरे

कायद्याप्रमाणे "नाही"

कुमार१'s picture

12 Aug 2017 - 11:02 am | कुमार१

आणि कायदा फक्त पुस्तकात च राहत असल्याने देशात काय चालले आहे ते आपण पाहतोच.

धन्यवाद, सुबोध आणि कुमार१

साधा मुलगा's picture

12 Aug 2017 - 2:40 pm | साधा मुलगा

उत्तम माहिती कुमार साहेब, डॉक खरे यांचीही छान माहिती.

बीडीएस वाले ह्या डॉक्टरात मोडत नसतात का? मेडीकल कॉलेजात ही फॅकल्टी नसते का? किंबहुना डेंटल कॉलेजेस सेपरेट का असतात?

कुमार१'s picture

12 Aug 2017 - 6:03 pm | कुमार१

वरील प्रश्न Dental Council. ला विचारायला हवा !

कुमार१'s picture

12 Aug 2017 - 6:03 pm | कुमार१

वरील प्रश्न Dental Council. ला विचारायला हवा !

या विषयात रस दाखवून चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार.

या धाग्याच्या निमित्ताने सर्वांना एक विनंती, की 'allopathy' हा कालबाह्य आणि अशास्त्रीय शब्द न वापरता त्याला ' Modern Medicine' च म्हणावे .

दशानन's picture

13 Aug 2017 - 8:02 pm | दशानन

का?

विवेकपटाईत's picture

9 Aug 2021 - 11:51 am | विवेकपटाईत

allopathy' साठी Modern Medicine' शब्द वापरणे केंव्हाही उचित नाही. कारण या शब्दाचा अर्थ "आधुनिक मान्य तंत्राने विकसित औषधी". जगात अनेक चिकित्सा प्रणाली आहेत त्या हि Modern Medicine आहे. आज आयुर्वेदात हि आधुनिक मान्य तंत्राने औषधी बनविल्या जात आहे. करोना काळात हे स्पष्ट झाले आहे.

सुबोध खरे's picture

13 Aug 2017 - 8:52 pm | सुबोध खरे

The practice of medicine in both Europe and North America during the early 19th century is sometimes referred to as heroic medicine because of the extreme measures (such as bloodletting) sometimes employed in an effort to treat diseases.[7] The term allopath was used by Hahnemann and other early homeopaths to highlight the difference they perceived between homeopathy and the medicine of that time.

With the term allopathy (meaning "other than the disease"), Hahnemann intended to point out how physicians with conventional training employed therapeutic approaches that, in his view, merely treated symptoms and failed to address the disharmony produced by the underlying disease.[clarification needed] Homeopaths saw such symptomatic treatments as "opposites treating opposites" and believed these conventional methods were harmful to patients.

अत्रे's picture

15 Aug 2017 - 8:30 am | अत्रे

The term allopath was used by Hahnemann and other early homeopaths to highlight the difference they perceived between homeopathy and the medicine of that time.

हे माहिती नव्हते! मग ऍलोपॅथीला पर्यायी शब्द कोणता? एक शब्द असला तर उत्तम. (मॉडर्न मेडिसिन फार उथळ शब्द वाटतो)

कुमार१'s picture

15 Aug 2017 - 10:43 am | कुमार१

सोपे नाव Medicine
अवघड नाव Evidence based Medicine

सुबोध खरे's picture

15 Aug 2017 - 12:30 pm | सुबोध खरे

आधुनिक वैद्यकशास्त्र (modern medicine) हाच शब्द योग्य आहे. या वैद्यक शास्त्रातील बहुसंख्य गोष्टी गेल्या 100 वर्षातच उगम पावलेल्या आहेत.

कुमार१'s picture

15 Aug 2017 - 2:12 pm | कुमार१

Medicine चे एक नवे नाव ह. वि. सरदेसाई यांच्या लेखात वाचले होते पण आता आठवत नाही

कुमार१'s picture

13 Aug 2017 - 9:08 pm | कुमार१

सुबोध यांचा प्र. +११

आता थोडे व्यवस्थित मांडतो:

१ .मुळात ‘अलोपथी’ हे नाव अन्य शास्त्राच्या व्यक्तीने दिले. केवळ ‘होमीओ’ पासून फरक करण्यासाठी.

२. कोशातील व्याख्येनुसार त्याचा अर्थ असा: रुग्णाच्या लक्षणाच्या विरुद्ध गुणधर्माची औषधे वापरून केलेले उपचार. ही व्याख्या आजच्या युगात फारच बाळबोध ठरेल कारण,

३.बऱ्याचदा हे औषध लक्षणाच्या विरुद्ध नसतेही. किबहुना ते रोगाच्या मूळ pathology वर क्रिया करते आणि त्यामुळे नंतर लक्षणे कमी होतात.

सुबोध खरे's picture

13 Aug 2017 - 9:38 pm | सुबोध खरे

कुमार साहेब
होमियोपथ आम्हीच रोगाचा मुळापासून नायनाट करतो आणि *ऍलॉपॅथी* वाले रोग तिथल्या तिथे रोग दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात असा दुष्प्रचार वर्षानुवर्षे करीत आले आहेत.

कुमार१'s picture

13 Aug 2017 - 10:04 pm | कुमार१

बरोब्बर. 'सप्रेस ' करणे हा त्यांचा लाडका शब्द आहे

पैसा's picture

13 Aug 2017 - 10:47 pm | पैसा

माहितीपूर्ण धागा आहे.

डॉ श्रीहास's picture

15 Aug 2017 - 8:13 am | डॉ श्रीहास

A rheumatologist is an internist or pediatrician who received further training in the diagnosis (detection) and treatment of musculoskeletal disease and systemic autoimmune conditions commonly referred to as rheumatic diseases.

Rheumatologist = ही सुपर स्पेशॅलिटी बरेचदा कन्फ्युझ करते , हे डॉक्टर्स फक्त सांधेविकार तज्ञ नाहीत तर autoimmune आजारांचे तज्ञ असतात , त्यामुळे सर्वसामान्य ह्यॅबद्दल बरेचदा अनभिज्ञ असतात (https://en.m.wikipedia.org/wiki/Rheumatology ) ही लिंक मुद्दामुन देत आहे कारण पेशंटना नेमकं rheumatologist का जायचं हेच माहिती नसतं ....

मी बरेचदा पेशंट रेफर करण्याअगोदर हे समजावून सांगून पाठवतो , जेणेकरून पुढच्या डॉक्टरचं काम सोप होतं आणि पेशंटच्या मनात धाकधुक राहत नाही.

कुमार१'s picture

15 Aug 2017 - 9:13 am | कुमार१

श्रीहास , सहमत. अलीकडे त्यांचे महत्व वाढले आहे.

इंटर्निस्ट म्हणजे फिजिशियन(एम डी मेडिसिन). आपल्या बोली भाषेप्रमाणे. करण बरेच लोक इंटर्निस्ट म्हणजे इंटर्नशिप करणारा डॉक्टर समजतात.
असाच एक किस्सा-- कमांड रुग्णालयात असताना सेरेमोनिअल परेड (विधिवत कवायत) यासाठी मी जवळच्या केश कर्तना लयात गेलो असताना आमचे दोन वरिष्ठ तेथे बसले होते. नाभिक कारागिराने आपण काय करता हे विचारले? आम्ही सर्व डॉक्टर आहोत हे त्याला माहित होते. मी म्हणालो रेडियोलॉजिस्ट आहे . म्हणजे काय?
मी म्हणालो एक्स रे सोनोग्राफी करणारे डॉक्टर
त्याने आमच्या अस्थीव्यांगोपचार तज्ञाला विचारले सर आपण काय करता तुपावर तो म्हणाला हाड मोडल्यावर उपचार करतो ऑपरेशन वगैरे. त्याने समजल्याची मान हलवली. शेवटी सर्वात वरिष्ठ अशा gastroenterologist ला विचारले. सर आपण काय करता? त्यांनी सांगितले पोटाच्या विकाराचे तज्ञ. म्हणजे तुम्ही ऑपरेशन करता का? सर म्हणाले नाही. तर तो म्हणाला मग तुम्ही काय करता?
सर हताश चेहरा करून म्हणाले आता याला काय सांगणार? एवढा सुपर स्पेशालिस्ट झालो पण याला मी काय करतो ते काही सांगता येत नाही.
मग मी त्या कारागिराला समजावले की सर ओपॅरॅशन न करता पोटात दुर्बीण टाकून बाहेर काही जखम न करता पोटातील आजाराचा उपचार करतात. हे ऐकून त्याला सर "बरंच काही करतात" असं वाटल्याचं दिसलं. सरांनी सुस्कारा सोडला आणि आम्ही हसू लागलो.

ओपॅरॅशन न करता पोटात दुर्बीण टाकून बाहेर काही जखम न करता पोटातील आजाराचा उपचार करतात

यालाच "पोटाचे ऑपरेशन" का नाही म्हणता येणार? की "ऑपरेशन" या शब्दात कापाकापी गृहीत धरलेली असते?

सुबोध खरे's picture

15 Aug 2017 - 9:50 am | सुबोध खरे

शब्दच्छल न करता कारागिराला समजेल अशा भाषेत अजून काय सांगायला हवं होतं?

मला वाटलं "पोटाचे ऑपरेशन करता का" याचे उत्तर "हो" असे देता आले असते. पण ऑपरेशन मध्ये कापाकापी गृहीत शहारली असेल तर मग त्यांनी डिटेलमध्ये सांगितले ते बरोबर आहे.

समाजातील मधुमेहाचे झपाट्याने वाढणारे प्रमाण पाहता आता त्या आजारासाठी वैद्यकाची स्वतंत्र शाखा करण्यावर विचार चालू आहे. त्यासंबंधीची बातमी :
http://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=5

तेव्हा येत्या काही वर्षांत "एम. डी. (मधुमेह)" अशी पदवी वास्तवात येउ शकेल.

Rajesh188's picture

27 Dec 2020 - 10:20 pm | Rajesh188

सर्व महत्वाच्या अवयव चे तज्ञ आहेतच.
आता मधुमेह ‌तज्ञ,मलेरिया तज्ञ,सर्दी तज्ञ,फक्त डोकेदुखी तज्ञ आणि असेच प्रतेक आजाराचे तज्ञ निर्माण च होणार आहेत.
मार्केटिंग साठी ते गरजेचे आहे.
आताच आहार तज्ञ आहेतच की.

मराठी_माणूस's picture

28 Dec 2020 - 10:30 am | मराठी_माणूस

जे diabetologist असतात त्यांची डीग्री काय असते ?

कुमार१'s picture

28 Dec 2020 - 10:59 am | कुमार१

सध्या तरी एम डी (मेडिसिन)

असे काही जण मधुमेहाचे विशेष प्रशिक्षण / पदविका प्राप्त करतात . काही विद्यापीठांत तशी सोय आहे

कुमार१'s picture

28 Dec 2020 - 11:08 am | कुमार१

तसेच D M (endocrino) या अतिविशेष डॉ चाही मधुमेहाचा अधिक अभ्यास असतो

गुल्लू दादा's picture

9 Aug 2021 - 12:48 pm | गुल्लू दादा

डिप्लोमा सुद्धा आहे याचा 2 वर्षे कालावधी.

मुंबईत नुकत्याच झालेल्या तुफान पावसाने जो हाहाकार उडवला त्यात ख्यातनाम पोटविकारतज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर, एम. डी. (मेडि). , डी. एम.( पोटविकार) यांचे निधन झाले.
ते या विषयातील भारतातील नामांकित तज्ञ होते. 'यकृतविकार' यात तर ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ञ होते.
या धाग्याच्या माध्यमातून त्यांना आदरांजली .

कुमार१'s picture

25 Dec 2020 - 4:16 pm | कुमार१

६४ वर्षीय जय प्रधान यांनी एमबीबीएस ला प्रवेश घेतला !!

https://www-newindianexpress-com.cdn.ampproject.org/v/s/www.newindianexp...

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

8 May 2022 - 1:38 pm | हणमंतअण्णा शंकर...

व्वा! म्हणजे माझे राहिलेले स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता तरी आहे. मी डॉक्टर होणारच!

प्राची अश्विनी's picture

28 Dec 2020 - 9:30 am | प्राची अश्विनी

डेंटिस्ट्री म्हणजे फक्त दात काढणे आणि कवळी बसवणे इतकच मर्यादित नाही. त्यातही अनेक specialities आहेत. Forensic dentistry, दात सरळ करणे, योग्य त-हेने श्वसन करण्यासाठी जबड्याची योग्य वाढ करण्यात मदत करणे, त्यासाठीची appliances, दातांच्या मुळांची, हिरड्यांची ट्रीटमेंट, sports dentistry, smile designing , community dentistryअशा अनेक शाखा आहेत. त्याचे basics हे BDS मधे तर त्यापुढे तीन वर्षांचे MDS हे उच्चशिक्षण असते.

प्राची अश्विनी's picture

28 Dec 2020 - 9:31 am | प्राची अश्विनी

सॉरी, चुकून इथे आला प्रतिसाद, अभ्या यांना द्यायचा होता.

कुमार१'s picture

9 Aug 2021 - 11:08 am | कुमार१

एमबीबीएस अभ्यासक्रम साडेपाच वर्षांचा असतो. लखनऊ येथील एका विद्यापीठात ८ पासून २७ वर्षे झाली तरीसुद्धा एम बी बी एस उत्तीर्ण होऊ न शकलेले काही मोजके विद्यार्थी राहिले आहेत. जे असे 27 वर्ष अजून उत्तीर्ण होऊ शकलेले नाहीत, त्यांची स्वतःची अपत्ये मात्र डॉक्टर झालेली आहेत !!

आता या ‘वयस्कर’ विद्यार्थ्यांना अजून दोनदा परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

चौकस२१२'s picture

9 Aug 2021 - 1:25 pm | चौकस२१२

भारतात विवाद्यकीय क्षेत्रात "मधुमेहावर काम करणारे "डायबेटॉलॉजिस्ट " अशी पाटी लावतात ! कितीपत योग्य आहे ते ? पाश्चिमात्य देशात हा शब्द ऐकलं नाही
दंतवैद्य हे इम्प्लिटलॉजिस्ट " असे लिहितात! म्हणजे इम्प्लांट करणारे.. पण अशी काही पव्दिउत्तर शिक्षण हं का?
याशिवाय होमॅओपथिक आणि आयुर्वेदिक ला डॉक्टर लिहण्याचे अधिकार कसे काय? आणि त्यापेक्षाही सरळ सरळ हे डॉक्टर ऍलोपॅथी ची औषधे कशी काय देतात? हे अवैध नाही का? त्यांनी फक्त होमेपती आणि आयुर्वेदाची औषधे द्यवीत जास्तीत जास्त !

कुमार१'s picture

9 Aug 2021 - 1:27 pm | कुमार१

चौकस,
कायद्याची अंमलबजावणी न होणे ही भारताची मोठी समस्या आहे.
अधिक काय लिहिणे ?

कुमार१'s picture

21 Aug 2021 - 9:42 am | कुमार१

वैद्यकीय अभ्याक्रमास प्रवेशासाठीचे किमान वय १७ हा नियम खूप जुना आहे. ( मूळ १८ वर्षे होता पण १०+२+३ आल्यापासून ते १७ वर आणले होते).
तरीसुद्धा विद्यार्थी असे कोर्टात का जातात हे समजत नाही :

https://medicaldialogues.in/news/education/neet-2021-mbbs-aspirant-plead...

अभियांत्रिकी ला १५ चालत असेल तरी वैद्यकीय नियमाची कारणे वेगळी आहेत.

गुल्लू दादा's picture

21 Aug 2021 - 9:57 am | गुल्लू दादा

नीट ug म्हणजे वैद्यकीय प्रवेशासाठी असणारी परीक्षा 12 sept ला असून आपले मिपाकर हॅरी पॉटर ती देत आहेत आणि मी नीट pg म्हणजे पदव्युत्तर mbbs नंतर md/ms साठी लागणारी परीक्षा 11 sept ला देत आहे. आता तुम्ही म्हणाल की इथे काय करतोय मग अभ्यास कर ना ! तुमचंही खरंय म्हणा पण काय करावं चक्कर टाकावी वाटते मधात मधात तेवढाच मूड फ्रेश.

कुमार१'s picture

21 Aug 2021 - 10:10 am | कुमार१

दोघांनाही शुभेच्छा !
चांगले यश मिळो .

सुबोध खरे's picture

21 Aug 2021 - 10:55 am | सुबोध खरे

शेवटच्या ५ ओव्हर्स बाकी आहेत. जोर लावा आणि षटकार मारा

तुम्हाला परीक्षेच्या शुभेच्छा.

गुल्लू दादा's picture

21 Aug 2021 - 1:05 pm | गुल्लू दादा

कुमार सर आणि सुबोध सर खूप धन्यवाद. आपल्या सारखी विद्वान मंडळी पाठीशी असली की सीमारेषा जवळ वाटू लागतात आणि षटकार ठोकणे आवाक्यात वाटू लागते. 10 jan ची परीक्षा नंतर 18 एप्रिल आणि आता ढकलत ढकलत 11 sept ला आलीये.

गॉडजिला's picture

21 Aug 2021 - 8:29 pm | गॉडजिला

नापास होण्यासाठी माझ्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा :)

कधी तूम्ही नापास होताय अन नैराश्यातून ओल्ड मंकची पार्टी आयोजित करताय असे झाले आहे.

गुल्लू दादा's picture

21 Aug 2021 - 9:17 pm | गुल्लू दादा

पार्टीला काय कारण लागत व्हय. कधी पण या गुमनाम बाबाची बॉटल हजर आहे तुमच्या सेवेत. ;)
नापास म्हणजे काय असतं? Either u win or learn असं काहीतरी म्हणतात बाबा.

गॉडजिला's picture

21 Aug 2021 - 11:28 pm | गॉडजिला

आपली परीक्षा उत्तम रित्या पार पडावी...

कुमार१'s picture

22 Aug 2021 - 3:54 am | कुमार१

अजून एक जनहित याचिका उच्च न्यायलयात !

"पदव्युत्तर 'neet' रद्द करावी . तसेच त्या जागा दुप्पट कराव्यात "
https://medicaldialogues-in.cdn.ampproject.org/v/s/medicaldialogues.in/a...

कंजूस's picture

22 Aug 2021 - 5:38 am | कंजूस

पूर्वी केशराचा उपयोग ताप उतरवण्यासाठी करत. पण केशर एवढे महाग की फक्त श्रीमंतांचाच ताप उतरवत असणार.
केशरातले पिवळसर नारिंगी द्रव्य क्रोसिन हे त्यास कारणीभूत . तेच/ त्यासारखे द्रव्य केमिकली बनवले तर? तर ते स्वस्तात झाले. म्हणजे केमिकल कंपांउंड करून औषधासाठी वापरणे यास मॉडन मेडिसिन म्हणता येईल.

कुमार१'s picture

22 Aug 2021 - 9:09 am | कुमार१

अगदी बरोबर.
अजून एक उदा :

Cinchona tree पासून Chloroquine हे मलेरिया चे औषध.

कंजूस's picture

22 Aug 2021 - 11:20 am | कंजूस

पण काही वनस्पतीजन्य द्रव्य ( अल्कलॉईडस) इतके स्वस्त मिळू शकतात ते केमिकली बनवलेच पाहिजेत असे नसते. उदाहरणार्थ अडुळसा.

प्रतेक अवयव चे तज्ञ डॉक्टर कधी पासून तयार होवू लागले.
जसे की
किडनी तज्ञ
यकृत तज्ञ .
आणि त्याची गरज का पडली.

गॉडजिला's picture

23 Aug 2021 - 9:35 am | गॉडजिला

आणि त्याची गरज का पडली.

ते ही सगळे प्राचिन ग्रंथात लिहले असता…

सुबोध खरे's picture

23 Aug 2021 - 10:26 am | सुबोध खरे

@ Rajesh188

प्रतेक अवयव चे तज्ञ डॉक्टर कधी पासून तयार होवू लागले.

तुमचा मोबाईल बिघडला कि शेजारच्या इलेक्ट्रिशियन कडून दुरुस्त करून घेता का?

कुमार१'s picture

22 Aug 2021 - 10:20 am | कुमार१

भारतात सुमारे साठ वर्षांपूर्वी असे अभ्यासक्रम सुरू झाले. जसा मानवी शरीराचा अभ्यास वाढत गेला तसे विविध आजारांचा अभ्यास खोलात जाऊन करण्याची गरज निर्माण झाली.

पारंपरिक फिजिशियनला असा सर्व अवयवांचा खोलात जाऊन अभ्यास करणे शक्य झाले नसते.

असा अलिखित नियम आहे. आपल्या नेहमीच्या डॉक्टरनाही चांगली परीक्षा असते. ते प्रथम चार दिवस औषध देऊन खात्री झाल्यावर योग्य स्पेशालिस्टकडे पाठवतात.
उदाहरणार्थ डोकूदुखी. त्याची बरीच कारणे असतात. अगदी सामान्य ते गंभीर.

कुमार१'s picture

23 Aug 2021 - 12:09 pm | कुमार१

एमबीबीएस च्या प्रवेशासाठी एक मूलभूत अर्हता म्हणजे बारावीच्या परीक्षेत पीसीबी मिळून किमान 50 टक्के गुण मिळालेले असणे. हा नियम गेल्या कित्येक वर्षांपासून संपूर्ण भारतात लागू आहे.

नुकतेच आसाम सरकारने यामध्ये दोन महत्त्वाचे बदल केले आहेत.
१. पीसीबी मध्ये किमान 60 टक्के गुण हवेत आणि
२. बारावीची परीक्षा प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण हवी .

याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे. तिथल्या न्यायमूर्तींनी केंद्र सरकार व एन एम सी यांना स्पष्टीकरण देण्याची सूचना केलेली आहे.

यानिमित्ताने, एखादे राज्य सरकार स्वतःच्या अखत्यारीत असा मूलभूत नियम बदलू शकते का, याचा आता उहापोह होईल.

https://medicaldialogues-in.cdn.ampproject.org/v/s/medicaldialogues.in/a...

कुमार१'s picture

16 Sep 2021 - 9:49 am | कुमार१

एम बी बी एस चा अभ्यासक्रम हिंदी भाषेतून शिकवण्यासाठी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश मध्ये तयारी सुरू.

काही विद्यापीठांनी त्यासंदर्भात पाऊल उचलले आहे
https://medicaldialogues.in/news/education/soon-mbbs-in-hindi-in-indian-...

कुमार१'s picture

24 Feb 2022 - 11:32 am | कुमार१

एका पूर्ण अंध डॉक्टरने पदव्युत्तर नीट ही परीक्षा पार केली असून त्याने एमडी मानसोपचार या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मागितला होता परंतु तज्ञ समितीने त्याचा अर्ज फेटाळला आहे.
त्याविरुद्ध संबंधित डॉक्टर सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. जगभरात या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला गेल्याची उदाहरणे आहेत.

आता आपले न्यायालय काय निर्णय देते हा उत्सुकतेचा विषय राहील.

कुमार१'s picture

24 Apr 2022 - 12:24 pm | कुमार१

भारतातील 6 'एम्स' मध्ये कुटुंबवैद्यक या विषयातील एमडी पदवीचा अभ्यासक्रम सुरू होत आहे.

चांगला निर्णय. अभिनंदन !

जेम्स वांड's picture

24 Apr 2022 - 6:25 pm | जेम्स वांड

मूत्रपिंड रोगतज्ञ - युरोलीजिस्ट का नेफ्रॉलॉजिस्ट ?

जर युरो तर नेफ्रो काय करतो अँड व्हाईस व्हर्सा ?

अंडाशय तज्ञ असतो का ? अँड्रॉलॉजिस्ट असे काहीसे वाचलेले स्मरते त्याचे काम काय असते ? म्हणजे पुरुष अंडकोष आणि प्रजनन स्वास्थ्य संबंधी का मूत्रमार्ग विशेष मधलीच ही एक उपशाखा होय ?

कुमार१'s picture

24 Apr 2022 - 7:05 pm | कुमार१

मूत्रपिंड रोगतज्ञ - युरोलीजिस्ट का नेफ्रॉलॉजिस्ट ?
>>>
झोप फिजिशियन मुत्रपिंड समस्यांचा अभ्यास करतो तो नेफरोलॉजिस्ट.
जो सर्जन मूत्रमार्ग, मूत्राशय, प्रोस्टेट इत्यादींचा अभ्यास आणि शस्त्रक्रिया करतो तो यूरोलॉजिस्ट.
...
अँड्रॉलॉजिस्ट हा शब्द भारतात इतका वापरात नाही. परंतु जशी बायकांची गायनॅकॉलॉजिस्ट तसा पुरुषांचा
अँड्रॉलॉजिस्ट म्हणता येईल

कुमार१'s picture

24 Apr 2022 - 7:06 pm | कुमार१

झोप>>>जो असे वाचावे

जेम्स वांड's picture

24 Apr 2022 - 7:11 pm | जेम्स वांड

असा का हो पुरुषांचा अनुशेष, गल्लोगल्ली गायनेकॉलॉजिस्ट मिळतात पण पुरुषमंडळी अँड्रॉलॉजिस्टला मोताद, पुरुष स्वास्थ्य हा तितकासा महत्वाचा विषय वाटत नाही वाटतं एकंदरीत लोकांना

कुमार१'s picture

24 Apr 2022 - 7:17 pm | कुमार१

सध्या आपण बरेच अन्याय सहन करण्याचे युग आहे खरे !
:))))

कुमार१'s picture

8 May 2022 - 12:22 pm | कुमार१

महाराष्ट्र सरकारने 'सरकारी-खाजगी भागीदारी' या तत्त्वावर शासकीय जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कुमार१'s picture

19 Oct 2022 - 6:56 am | कुमार१

नव्या अभ्यास शाखा:
१.MD (aerospace medicine)
आकाश व अवकाश वैद्यकविज्ञान

२.M.D.(marine-medicine)
सागरी वैद्यकविज्ञान

सुबोध खरे's picture

19 Oct 2022 - 9:51 am | सुबोध खरे

या विज्ञान शाखा नवीन नसून गेली ३५ वर्षे तरी त्यात MD हि पदवी उपलब्ध आहे आणि त्यापूर्वी त्यात पदविका अभ्यासक्रम उपलब्ध होता.

मरीन मेडिसिन हा अभ्यासक्रम नौदलाच्या अश्विनी या रुग्णालयाशी संलग्न INM (Institute of Naval Medicine) Mumbai, Maharashtra आणि एरोस्पेस मेडिसिन हा बंगळुरूच्या एरोस्पेस मेडिसिन संस्थेत Institute Of Aerospace Medicine या पदव्याचे शिक्षण दिले जाते.

येथे प्रामुख्याने लष्करातील डॉक्टर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी येत असल्याने सामान्य माणसांना या अभ्यासक्रम बद्दल फारसे माहिती नाही.

सुबोध खरे's picture

19 Oct 2022 - 9:51 am | सुबोध खरे

या विज्ञान शाखा नवीन नसून गेली ३५ वर्षे तरी त्यात MD हि पदवी उपलब्ध आहे आणि त्यापूर्वी त्यात पदविका अभ्यासक्रम उपलब्ध होता.

मरीन मेडिसिन हा अभ्यासक्रम नौदलाच्या अश्विनी या रुग्णालयाशी संलग्न INM (Institute of Naval Medicine) Mumbai, Maharashtra आणि एरोस्पेस मेडिसिन हा बंगळुरूच्या एरोस्पेस मेडिसिन संस्थेत Institute Of Aerospace Medicine या पदव्याचे शिक्षण दिले जाते.

येथे प्रामुख्याने लष्करातील डॉक्टर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी येत असल्याने सामान्य माणसांना या अभ्यासक्रम बद्दल फारसे माहिती नाही.

कुमार१'s picture

19 Oct 2022 - 10:07 am | कुमार१

धन्यवाद !

धर्मराजमुटके's picture

19 Oct 2022 - 9:07 am | धर्मराजमुटके

नुकतीच माध्यमात वैद्यकिय आणि अभियांत्रिकी शिक्षण हिंदी भाषेतून चालू केल्याच्या बातम्या ऐकल्या. या संकेत स्थळावरील डॉक्टर मंडळींना याबाबत काय वाटते ?
यामुळे या क्षेत्राची प्रगती होईल काय ? अधोगती होईल काय ?
जास्त प्रमाणात डॉक्टर निर्माण झालयास डॉक्टरांचे उत्पन्न घसरेल काय ?
हिंदी डॉक्टर वि. इंग्रजी डॉक्टर यांत उच्च नीच भेदभाव होऊन नवीन जमात उदयास येईल काय ?
मते ऐकायला किंवा स्वतंत्र धाग्यावर चर्चा वाचायला आवडतील.

कुमार१'s picture

19 Oct 2022 - 10:08 am | कुमार१

हा विषय महत्त्वाचा असून एका प्रतिसादात उरकण्यासारखा नक्कीच नाही. इच्छुकांनी यावर स्वतंत्र धागा काढावा. तूर्त मी काही मूलभूत माहिती देतो.

१. गेल्या चार वर्षांपासून एमबीबीएसचा नवीन अभ्यासक्रम लागू झाला. त्याच्या पहिल्या वर्षी प्रत्यक्ष वैद्यकीय विषय शिकवण्यापूर्वी दोन महिने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे विषय शिकवले जातात. ज्यामध्ये, संबंधित राज्याच्या (मातृ)भाषेचाही समावेश असतो. मातृभाषेतून शिक्षण ही संकल्पना चांगली व महत्त्वाची आहेच.

२. अजून एक मुद्दा. सध्या वैद्यकीय प्रवेश हे बऱ्यापैकी अखिल भारतीय पातळीवर होतात. त्यामुळे एखाद्या उत्तर टोकाकडच्या राज्यातील विद्यार्थ्याला जर दक्षिण भारतात प्रवेश मिळाला असेल तर त्याने रुग्णांशी बोलायला म्हणून संबंधित राज्यभाषा शिकणे आवश्यक आहे.
…..
समजा, ज्या विद्यार्थ्यांनी पूर्णपणे हिंदीतून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे, त्यांची जर आयुष्यभर फक्त त्या राज्यापुरताच व्यवसाय/ नोकरी करण्याची इच्छा असेल तर त्यांचे काही अडणार नाही. तरीही शिक्षणादरम्यान संघर्ष करावा लागेल. तसेच अशा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी एक आडकाठी निर्माण होईल.

कुमार१'s picture

28 Oct 2022 - 7:58 pm | कुमार१

आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून, राज्य सरकारचा मोठा निर्णय

हा पर्याय ऐच्छिक असेल.