हायवे वरच्या वाटेवरचे वळण द्यायचे हाक
"लोक काय म्हणतील कृत्रीम बंधन सत्वर तोडुनी टाक !"
बायको नामक भूत बाटलीस कायम भिववीत होते
त्या भीतीने तरल काहिसे ग्लासातून निसटत होते
गोळा करूनी धैर्य, ठरविले, नको गाय छाप मळलेली
वाट खोकुनी माझी लावीते, वीडी कोंदटलेली,
जेडी, शिवास, टिचर्स, यांच्यात अवघडून बसलेली
ओल्ड माँक ती ग्लासामध्ये, विमुक्त होता निर्मळ हसली
त्या हसण्याचा खळाळ ध्वनि मज सांगुनी गेला काही,
"कितीही प्या, पण ध्यानी ठेवा..चखण्याविण "गंमत" नाही !"
भूछत्री
प्रतिक्रिया
10 Aug 2017 - 4:44 pm | पुंबा
अहाहा
मस्त विडंबन..
10 Aug 2017 - 5:25 pm | माम्लेदारचा पन्खा
कसं सुचतं तुम्हाला ?
10 Aug 2017 - 8:28 pm | एस
(तर्राट कविता.)
10 Aug 2017 - 9:18 pm | पद्मावति
मस्तं जमलंय.
जेडी, शिवास, टिचर्स, यांच्यात अवघडून बसलेली ओल्ड माँक ती ग्लासामध्ये, विमुक्त होता निर्मळ हसली
:) हे इतकं मस्तं लिहिलंय तुम्ही की हा पुर्ण सीन animated रूपात डोळ्यासमोर उभा राहीला अगदी. एखाद्या डिज़ाइनर रम ग्लासच्या advertisement साठी छान आयडीया आहे. अवघडून बसलेली ओल्ड माँक ती ग्लासामध्ये, विमुक्त होता निर्मळ हसली आणि म्हणाली...''Ah! I am home....finally!10 Aug 2017 - 10:08 pm | दशानन
+1, पूर्ण सहमत.
10 Aug 2017 - 9:34 pm | हतोळकरांचा प्रसाद
प्वाट फुटलं हासून हासून! पैजारबुवा, दंडवत घ्या नेहमीप्रमाणे! _/\_ .
11 Aug 2017 - 11:47 am | चांदणे संदीप
ब्येक्कार! =))
Sandy
11 Aug 2017 - 3:21 pm | संजय पाटिल
मिपाचे विडंबन सम्राट....
_/\_