स्वप्नात एकदा चार सिंव्ह मारले
अरे लेकानो मारले कसले
चांगले उभे आडवे हाणले
पुढे गेलो तर काय ?
जंगली हत्तींचा कळप चालून आला
बाह्या सरसावून ठोकून काढला एकेकाला
भिरकावून दिले गगनात सारे
अजुनी आहेत ते बनुनी गगनी तारे
याच तार्यांचे पाठ गिरविता
तुम्हासी न ठावे
असे मीच करविता
मखलाशी चालू असे मनाशी
बहुत लढे उशी घेऊन उशाशी
लढता लढता लाथ पसारे
बायको उठुनी झाडू मारे
स्वप्न मोडिता सत्य अवतरे
मारलीस का कधी
खरी कबुतरे ?
सिद्धेश्वर विलास पाटणकर C
प्रतिक्रिया
18 Jul 2017 - 4:38 pm | सिरुसेरि
मस्त कविता . "झेंडुची फुले" आठवली .
18 Jul 2017 - 6:31 pm | सिद्धेश्वर विला...
धन्यवाद सिरुसेरी .... माफ करा पण एक सत्य सांगतो .. मी बिलकुल वाचनाच्या वाट्याला जात नाही ... मला वृत्तपत्र वाचायला फार आवडते आणि मी ते नेहेमी कसाही वेळ काढून वाचतो .... रविवारी नुसतं वाचत नाही तर अक्षरशः चाळून काढतो ... हीच काय ती माझी वाचनाची आवड ....
18 Jul 2017 - 6:53 pm | अप्पा जोगळेकर
मस्त. भारी लिहिलय.