II मास्तर म्हणतात पोरांना , पिरेम लय वाईट II

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in जे न देखे रवी...
5 Jul 2017 - 7:26 pm

मास्तर म्हणतात पोरांना

पिरेम लय वाईट

करू नका कधी तुम्ही

जाल सर्व खाईत II

झाडे लावा, गुरे चारा

मायबापास पोसा

पिरमामध्ये हे शक्य नाय

मग का स्वतःस कोसा ?

पिरेम पिरेम करता करता

माझी बिनपाण्याची झाली

सोन्यासारखी नोकरी जाउनी

घंटा हाती आली II

हाती छडी अन टोपी घेऊनि

शाळेमंधी जातो

डोक्याला मॉप शॉट लावूनी

घरी घ्यायला परत येतो II

पगारपाणी ना येळेवरती

वाढला भांडणतंटा

छडी घेऊनि फक्त बडवितो

म्या शाळेमधली घंटा II

सिद्धेश्वर विलास पाटणकर C

कविता

प्रतिक्रिया

ओह्ह द्याट मीन्स दादा यु आर प्युन इन स्कूल ??

विच स्कूल ??

त्यामुळेच तुला अश्या कविता सुचतात ... घंटा बडवुन बडवुन बोर मारत असेल नै तुला :D

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

5 Jul 2017 - 7:39 pm | सिद्धेश्वर विला...

घंटेचे बाकी उपयोग पण आहेत ? चातुर्मासानंतर सांगण्यात येतील .. तोपर्यंत कविता वाचावी

हरी ओम तत् सत् ,, जेनी ताय.... कविता बस्स वाचत्

जेनी...'s picture

5 Jul 2017 - 7:41 pm | जेनी...

लै बोर होतय .. :(

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

5 Jul 2017 - 7:42 pm | सिद्धेश्वर विला...

हरी ओम तत् सत् ,, जेनी ताय

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

5 Jul 2017 - 7:47 pm | सिद्धेश्वर विला...

देवाचे नाव घे ... बोर होनर नाय

ज्योति अळवणी's picture

5 Jul 2017 - 10:41 pm | ज्योति अळवणी

अगदीच सुमार

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

6 Jul 2017 - 3:55 pm | सिद्धेश्वर विला...

चालतं हो ताई

चालवून घ्या ना ...चातुर्मास आहे बाई

त्याच काय हाय

गावरान कविता हाय

सुभाषितांची रेलचेल नाय

ना जिवाची घालमेल

पिरेमात हातात काय आलंय

त्येच लिहिलंय

दशानन's picture

6 Jul 2017 - 4:32 pm | दशानन

सही काम भेटलं आहे !

पैसा's picture

6 Jul 2017 - 5:39 pm | पैसा

दादुस, भारीच लिहिताय! पण इथली वांड पोरं तुम्हाला ऐकणारी नाहीत!

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

6 Jul 2017 - 5:41 pm | सिद्धेश्वर विला...

नको ऐकू देत कि

कुठं जातायत , ह्ये अंतरजाल आपलच हाय

आणि ह्ये माळरान बी

कविता टाका कवा बी

स्वलिखित's picture

6 Jul 2017 - 6:27 pm | स्वलिखित

डॅाक्टर,शिक्षक वकील शास्त्रज्ञ विचारवंत लेखक कवि सब कुछ है ,.बस एक ....
ओ भी आपने पुरी कर दी

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

6 Jul 2017 - 6:37 pm | सिद्धेश्वर विला...

अहो मीच तो शिल्पकार

ज्याने तुम्हाला हे सर्व दाखवलं

लिहियाचं काय आणि कसं असतं

ते शिकवलं

अहो मला डॉक्टर म्हणा हवं तर

माझं प्रोफाइल बघून घ्या

नाही पटलं तर

ह्ये आंतरजाल आपलच हाय कि

जसे तुम्ही तसाच मी