घन नीळ आर्त दु:खाचा उगवला जीर्ण आभाळी
डोहात कालिया डोले जल गर्द दाट शेवाळी
क्षण दीर्घ खोल विवरातिल अंधारयुगाचा साक्षी
निस्तेज होत नक्षत्रे स्वर मंद्र मारवा पक्षी
रंध्रात काळीमा झरता आळवी अनामिक कोणी
मृगतृष्णा अंतर्यामी जरतारी चिरविरहीणी
उन्मुक्त विषातिल गहिरे ते शीतल मंद उखाणे
मुरलीने भुलता कान्हा अश्वत्थ गातसे गाणे
प्रतिक्रिया
16 May 2017 - 11:25 pm | पैसा
सुंदर कविता. आवडली.
17 May 2017 - 9:28 am | शिवोऽहम्
धन्यवाद!
20 May 2017 - 10:18 am | प्राची अश्विनी
क्या बात!
27 May 2017 - 12:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहित राहा. छान.
-दिलीप बिरुटे
27 May 2017 - 12:52 pm | पिशी अबोली
सुंदर! आवडली.
27 May 2017 - 12:57 pm | किसन शिंदे
कविता आवडली, पण समजली नाही. काहीतरी अतर्क्य वाचतोय असं वाटलं.