बंधने झुगारणे माझ्याच हाती
मानणे ना मानणे माझ्याच हाती
कापलेले पंख किती उडणार सांगा
प्रगतीची वाटचाल कशी करणार सांगा
दूर चाललेले ध्येय कधी गाठणार सांगा
वेग मोकळा कसा मी सोडणार सांगा
छत्र पित्याचे हरवले कसे सांगणार सांगा
रांगणाऱ्या बालकाला कशी समजावणार सांगा
जीवनाला ऊत आला , भोवताली काळ माजला
हरवलेले सर्वस्व तिला कसे मिळणार सांगा
प्रतिक्रिया
27 May 2017 - 12:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख. लिहित राहा. अजून कसदारपणे लिहिता येईलच.
-दिलीप बिरुटे
27 May 2017 - 12:19 pm | सतिश गावडे
मस्त आहे कविता.