मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
इथे अपेक्षित काय आहे ??
आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)
१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च
२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही
३. क्लासिक ३५० चे तोटे ??
१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर
मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.
मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
प्रतिक्रिया
27 Dec 2016 - 12:39 pm | सतिश पाटील
अगदी लहानपणापासून आपल्याकडे बुलेट असावी अशी खुप इच्छा आहे,
त्यासाठीच क्लासिक ३५० ठरवली,
पण हिमालया पहिली आणि कनफूजन सुरु झाले.
हिमालायावर बसल्यावर रॉयल एन्फिल्डवर बसल्यासारखा फिल येतो का?
वजन दोघांचेही सारखेच आहे, मग दगड धोंद्यात चालवताना तेवढी सोपी आहे का?
विचारू नए तरी पण प्रति किमी सरासरी किती आहे?
टॉप स्पीड किती?
हँडलबारची का्य समस्या आहे?
28 Dec 2016 - 3:57 pm | भटकंती अनलिमिटेड
"हँडलबारची समस्या" नक्की काय आहे हे विशद कराल काय?
29 Dec 2016 - 10:06 am | Hulk the devil
हिमालायावर बसल्यावर रॉयल एन्फिल्डवर बसल्यासारखा फिल येतो का?
-->> नक्कीच रॉयल एन्फिल्डवर बसल्यासारखा फिल येतो, अधिक सांगायचं झाले तर नवीन सीट खूपच आरामदायक आहे. एका बैठकीत तुम्ही ३००किलोमीटर सहज करू शकता पृष्टभागस काही त्रास ना होता.
वजन दोघांचेही सारखेच आहे, मग दगड धोंद्यात चालवताना तेवढी सोपी आहे का?
-->> वजना मध्ये ५किलो चा फरक आहे खूप जास्त नाही. हो सोपी आहे कारण गाडी ची उंची आणि हॅन्डल बार ची फिटींग योग्य प्रकार करण्यात आली आहे, ग्राउंड कलेअरन्स पण इतर ऑफरोड़ेर पेक्षा चांगला आहे.
विचारू नए तरी पण प्रति किमी सरासरी किती आहे?
-->>गावात ३० ते ३२ आपल्या गियर बदलण्याच्या पद्धती वर आहे. महामार्ग वर ३५ते ३६ देते आरामशीर. (वैयक्तिक विचारल तर सांगेन ३५० किंवा हिमालयन किंवा कुठली पण बुलेट घेताना प्रति किमी सरासरी विचार करू नये)
टॉप स्पीड किती?
-->> मी १४१ टॉप स्पीड गाठला आहे.
हँडलबारची का्य समस्या आहे?
-->> युनिव्हर्सल समस्या नव्हती, फक्त मला जी गाडी मिळाली तिचा हॅन्डल बार जाम व्हायचा आणि गाडी एक बाजूला ओढली जायची. ग्रीसन्ग आणि बॉल बेररिंग बदलून समस्याच समाधान झाले.
मी वैयक्तिक रित्या हिमालयन सांगेन पण एकदा चालवून बघा आणि लूक्स चा विषय सोडून द्या.
काही म्हणतील खराब दिसते पण माझा अनुभव वरून सांगतो १० पैकी ८ लोक गाडी बघतच राहतात.
29 Dec 2016 - 2:55 pm | कपिलमुनी
हिमालयन मला उंच वाटली . ५.१०" तरी उंची हवीच तरच कंफर्ट आहे
30 Dec 2016 - 12:34 pm | Hulk the devil
तस म्हंटलं तर हो उंच आहे बघताना वाटेत पण जेव्हा बसल्यावर नाही वाटत उंच.
मी 6feet आहे पण आमच्या ग्रुप मधले इतर सर्व जण ५.४ किंवा ५.७ आहेत त्यांना सुद्धा सोपी वाटली चालवताना.
उंची मध्ये फरक आहे दिसण्यातला आणि बसण्यातला...!!
30 Dec 2016 - 2:03 pm | Hulk the devil
तस म्हंटलं तर हो उंच आहे. बघताना वाटेत पण बसल्यावर नाही वाटत.
मी 6feet आहे पण आमच्या ग्रुप मधले इतर सर्व जण ५.४ किंवा ५.७ आहेत त्यांना सुद्धा सोपी वाटली चालवताना.
उंची मध्ये फरक आहे दिसण्यातला आणि बसण्यातला...!!
29 Dec 2016 - 11:35 am | सतिश पाटील
धन्यवाद , उपयुक्त माहिती दिलीत
25 Jan 2017 - 10:48 am | भटकंती अनलिमिटेड
ट्युबलेस टायर आणि एबीएस ही एकमेव गोष्ट आहे जी मला हिमालयनपासून दूर ठेवते आहे. नाहीतर एव्हाना घेतली असती.
14 Apr 2017 - 11:12 am | कबीरा
थंडरबर्ड घेऊन ६ महिने झाले नुकतेच. सुरवातीला दिवसात पहिल्यांदा गाडी चालू करताना बराच वेळ किक मारावी लागायची. तेव्हा विचार केला थंडीचे दिवस आणि इंजिन नवीन असल्या कारणानी होत असावं. कधी कधी स्पीड कमी करताना / एक गियर डाउन जाताना गाडी बंद पडायची त्यामुळे नंतर घरीच RPM सेटिंग केलं (इंजिन ऑन केल्यावर 1k RPM ). आता गाडी बंद पडायचा प्रॉब्लेम सुटला आहे आणि २-३ किक मध्ये स्टार्ट पण होते पण हे सेटिंग केल्यानंतर गियर चेंज करताना खूपच आवाज येतोय. अगदी की शेजारच्या गाडीवाल्याला पण कळावं हा बाबू गियर बदलतोय.
16 Apr 2017 - 11:19 am | अमर विश्वास
नवीन थंडरबर्डसाठी अभिनंदन
खरे तर RPM सेटिंग आणि गिअर चेंज यांचा तसा संबंध नाही
एकाच शक्यता वाटते ... High RPM सेटिंग मुळे इंजिनचे तापमान वाढते. त्यामुळे गिअर ऑइल ची व्हिस्कॉसिटी बदलू शकते .... पण ह्याची शक्यता फारच कमी आहे
गिअर बदलताना आवाज येण्याचे अजुन एक कारण क्लच लागुन राहणे / पुर्ण डिसेंगेज ना होणे ... ते एकदा चेक करा ...
4 May 2017 - 11:36 am | वेल्लाभट
जावा येतेय
overdrive.in/news/2017-jawa-350-ohc-and-660-vintage-launched-in-czech-republic/
4 May 2017 - 2:57 pm | सतिश पाटील
क्लासिक ३५० चेस्टनट बुक करण्यासाठी गेलो होतो परंतु, std ३५० बुलेटकड़े प्रयत्न करुन्सुद्धा कानाडोळा करू शकलो नाही.
शेवटी न राहवून std ३५० बुलेटच बुक केली. त्या गाडीचा रेट्रो लुक फार आवडला.
पण काही सुविधा कमी आहेत त्यात. विक्रेत्याशी बोललो तर त्याने काही सल्ले दिलेत.
मागचा टायर ३.२५ -१९ आहे. ( क्लासिक्चा १८ इंच टायर आहे )
१९ इंच जरी टायर असला तरी त्या भरभक्कम बुलेट्ला फारच किडमिडा वाटतो.
३.२५ -१९ ऐवजी ३.५०-१९ टायर लावता येतो रिम बदलण्याची गरज नाही.
सेल्फ स्टार्ट नाही.
ही गोष्ट मला शहरात चालवताना गरजेची वाटते.
५ ते ६ हजार जास्तीचे घेउन शोरुम्वाले लावून देतील म्हणाले.
वारंटी शाबूत राहिल.
डिस्क ब्रेक नाही
१० हजार जास्त घेउन शोरुम्वाले लावून देतील म्हणाले.
वारंटीवर फरक नाही पडणारं
जाणकार लोकांच्या सल्ल्याच्या प्रतिक्षेत.
4 May 2017 - 8:32 pm | कपिलमुनी
std ३५० बुलेट घेउन डिस्क , सेल्फ स्टार्ट बाहेरून लावून घेउ नका !
कधीही स्मूथ चालत नाही.
त्यापेक्षा std ५०० घ्या ( रेट्रो लूक आणि हवे असलेले फीचर्स त्यात आहेत)
किंवा क्लासिक ३५० घ्या.
तुम्ही सांगितलेला प्रयोग फसल्याची मित्रांची उदाहरणे आहेत.
4 May 2017 - 4:08 pm | अमर विश्वास
सतीशजी ...
नव्या बुलेट बद्दल अभिनंदन ...
आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो ..
सेल्फ स्टार्ट
माझ्या माहितीप्रमाणे स्टॅंडर्ड ३५० ची बॅटरी ५AH ची असते. त्यामुळे त्यावर सेल्फ स्टार्ट चालणे अवघड वाटते. (क्लासिक व इतर मॉडेल्स मध्ये १४AH असते)
तेंव्हा हे चेक करावे ... तसेच जर बॅटरी बदलणार असाल तर आल्टरनेटर बद्दल माहिती घ्यावी जेणेकरून १४ हं ची बॅटरी चार्ज होण्यात अडचण होणार नाही )
मागचा टायर
मागचा टायर जाड टाकायला फारसा प्रॉब्लेम नाही . रोडग्रिप सुधारेल पण गाडी थोडी जड वाटेल व ऍव्हरेज थोडे कमी होईल .. अर्थात बुलेटला दोन गोष्टी नवीन नाहीत
डिस्क ब्रेक
डिस्क ब्रेक हा फक्त पुढच्या चाकाला बसवणार हे गृहीत धरतो .. काही प्रॉब्लेम नाही
ऑल द बेस्ट
4 May 2017 - 4:53 pm | सतिश पाटील
धन्यवाद अमरजी
म्हणजेच स्लेफ़ स्टार्ट लावताना ब्याट्री अणि अल्टरनेटर पण बदलावा लागेल
अणि टायर बदलल्याने जो एवरेज कमी होइल तो क्लासिक ३५० पेक्षा कमी नसेल कारण त्याचा टायर खुपच पसरट आहे.
हो आणि डिस्क ब्रेक फ़क्त पुढच्या चाकाला.
4 May 2017 - 7:38 pm | सुबोध खरे
माझे मत विचारलं तर कोणत्याही मोटर सायकलला असे मूळ ढाच्यात बदल करण्यापेक्षा कंपनीकडूनच बदल असलेली मोटर सायकल विकत घ्यावी कारण डिस्क ब्रेक बदलण्यासाठी चाकाची रिम पण बदलावी लागेल. ५ mAH ऐवजी १४ mAH म्हणजे तिप्पट प्रवाह आहे त्यासाठी आल्टरनेटर बदलणे म्हणजे सगळ्या वायरिंग वर ताण येतो( ५ mAH मॉडेल च्या तांब्याच्या तारांची जाडी तितकी कमी असणार) आणि वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाले तर गाडीला आग लागण्याचा धोका असतो. कारण सेल्फ स्टार्टरला सर्वात जास्त विद्युत प्रवाह लागतो. एवढी कटकट करून वर्षभरात त्याचे रुटूखुटू सुरु झाले तर कंपनी (साहजिकच) हात वर करेल. यात त्या शोरुम वाल्याला "घबाड" मिळेल म्हणून तो उत्साहात करून देतो म्हणणारच. पण हे सर्व नंतर लावून घेण्यात तुमचे फारतर ७-८ हजार वाचतील असे वाटते.
पुन्हा एकदा नीट विचार करा. या सर्व सोयी नसलेली गाडी हि स्वस्तात उपलब्ध असते कारण या सोयीनं खर्च लागतो म्हणून कंपनी स्वस्तातील एक मॉडेल आणि चढत्या भाजणीने अधिक सुविधा असलेली मॉडेल विकतात. हा सर्व विचार कंपनी मधील विशषज्ञ इंजिनियर लोकांनी अगोदरच "पूर्ण पणे" केलेला असतो.
बाकी बुलेट हा "दिल से" लिया गया निर्णय आहे म्हणून अधिक बोलत नाही. पण सुरक्षिततेबद्दल तडजोड/चालढकल नको असेच वाटते
4 May 2017 - 7:48 pm | सुबोध खरे
एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे std चा हेडलाईट 35 W / 35 W, HALOGEN चा आहे आणि classic चा 60 W / 55 W, Halogen आहे म्हणजे रात्री क्लासिक मध्ये तुम्हाला हेडलाईटचा प्रकाश जास्त स्वच्छ आणि भरून मिळेल हा एक सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे.
4 May 2017 - 10:06 pm | अमर विश्वास
सतीशजी ..
बुलेट हा "दिलसे " मामला असल्यामुळे आधी लिहिले नव्हते .. पण डॉक्टरसाहेब म्हणतात त्याचा जरूर विचार करावा ...
अजुन एक "दिलसे" बात ...
बुलेट ही लोणच्यासारखी असते .. लोणचे कसे छान मुरल्यावर त्याला खरी चव येते ... बुलेटचेही तसेच..
नविन बुलेट काहीनाकाही प्रॉब्लेम देत रहाते .. छोटे छोटे annoying प्रॉब्लेम ...
एकदा दोन सेर्विसिन्ग झाली .. चांगल्या मेकॅनिकचा हात दोन - तीन वेळा फिरला कि मामला सेट होतो ... मग खरी "सफर" सुरु होते ...
लगे राहो ...
4 May 2017 - 10:18 pm | वेल्लाभट
हे वाक्य खरं दिल से आलंय !
5 May 2017 - 9:16 am | अभ्या..
नै नै, बुलेट ही लव्ह म्यारेज करून आनलेल्या बायकोगत असते.
पर्यायच नसतो कौतुक करत बसन्याशिवाय.
;)
5 May 2017 - 11:06 am | सतिश गावडे
अगागा... अगदी मर्मभेद केलात तुम्ही.
5 May 2017 - 11:51 am | अभ्या..
आणि एक साम्य म्हणजे वस्तुस्थिति पाहायची असेल तर...
लव्हवाले समदुःखी सोबत बारमध्ये बोलतात ते
बुलेटवाले समदुःखी सोबत ग्यारजमध्ये बोलतात ते
.
अगदी सेम हो..... ;)
5 May 2017 - 12:48 pm | अमर विश्वास
अभ्या.....
जबरा ,,,, भेटुच कुठल्यातरी गॅरेज मध्ये :)
5 May 2017 - 11:57 am | अभ्या..
आणि एक साम्य म्हणजे वस्तुस्थिति पाहायची असेल तर...
लव्हवाले समदुःखी सोबत बारमध्ये बोलतात ते
बुलेटवाले समदुःखी सोबत ग्यारजमध्ये बोलतात ते
.
अगदी सेम हो..... ;)
5 May 2017 - 11:19 am | सुबोध खरे
हे एकदम खरं. डोक्याने विचार केला तर बुलेट कोणीच घेणार नाही.
https://www.bikewale.com/comparebikes/royalenfield-classic-vs-bajaj-domi...
5 May 2017 - 11:25 am | साहेब..
एक नंबर
5 May 2017 - 10:08 am | सतिश पाटील
कपिलमुनी, अमरविश्वास, डॉक्टर खरेसाहेब धन्यवाद.
मुळ ढाच्यात बदल करू नये हे पटले.
३५० क्लासिक नक्की.
5 May 2017 - 4:09 pm | जगप्रवासी
१ मे ला भाच्याने त्याच्या बॉसची आणलेली थंडरबर्ड चालवली. काय ताकद त्या गाडीची. थोडंसं अक्सिलेटर पिरगळल तरी गाडी पळत होती. भाच्याला बोललो होतो की इथूनच ५ मिनिटात राउंड मारून येतो, पण आलो डायरेक्ट अर्ध्या तासाने. इंजिनाची धडधड आणि हृदयाचे ठोके यांची त्या अर्ध्या तासात जुगलबंदी चालू होती. एकदम स्वर्गीय अनुभव, सॉलिड मजा आली. आधी नुसता पाहून आणि गाडीचा आवाज ऐकून तिच्या प्रेमात होतो आणि आता चालवल्यावर तर तिच्या आकंठ प्रेमात बुडलोय
16 May 2017 - 4:52 pm | पी. के.
खरा तर थोडा आवांतर प्रश्न आहे पण मदत करा.
माझ्या रॉयल एन्फ़िल्ड. डेसर्ट स्टॉर्म चा न्यू इंडिया चा इन्शुरन्स ५ मे ला संपला. चुकून रिन्यू करायचा राहून गेला.
न्यू इंडिया च्या कस्टमर केअर ला फोन केला तर ते म्हणतात गाडीचे चेकअप करावे लागेल, ऑफिस ला गाडी घेऊन या.
एका मित्रांनी सांगितलं कि पेट्रोल पंप वर icici लोंबार्ड वाले गाडी चेक करून फोटो कडून पाच मिनटात इन्शुरन्स देतात.
तोपर्यंत आज icici लोंबार्ड मधून फोन आला त्यांनी ऑनलाईन इन्शुरन्स बद्दल सांगितलं त्यांच्या मते ऑनलाईन इन्शुरन्स साठी गाडी चेकिंग ची गरज नाही.
शेवटचा पर्याय कसा आहे, खरचं ऑनलाईन इन्शुरन्स साठी गाडी चेकिंग ची गरज नाही का? इन्शुरन्स क्लेम करताना हे नंतर काही प्रश्न उपस्तित करून क्लेम रिजेक्ट करणार का?
माझी २०१६ सालाची गाडी सुस्तिथित आहे आणि मला फक्त पोलिसाना दाखवण्यासाठी इन्शुरन्स नको आहे. कृपया मदत करा ऑनलाईन इन्शुरन्स घेणं योग्य का...
16 May 2017 - 7:43 pm | सुबोध खरे
ऑन लाईन केलात तर नो क्लेम बोनस मिळणार नाही. यासाठी आपण आपली गाडी एक महिन्याच्या आत आपल्या विमा कार्यालयात घेऊन जा. तेथे ते फक्त अपघात झाला नाही एवढी तपासणी करतात. आणि आपला हप्ता घेतला जाईल.
25 May 2017 - 4:19 pm | शलभ
अस काही नाहीयं. ऑनलाईन घेताना NCB सेल्फ डिक्लेर करायचा असतो. किती वर्ष क्लेम नाही घेतला ते. त्यावर इन्शुरन्स कॅल्कुलेट होतो. ते नंतर वेरीफाय करतात. मिस्मॅच असेल तर जास्तीचा क्लेम ऑफिस ला येऊन भरायला लावतात. ऑन्लाईन इन्शुरन्स चा काही प्रॉब्लेम होत नाही फक्त कंपनी चा रेकॉर्ड चांगला हवा.
15 Jun 2018 - 9:06 am | प्रचेतस
जवळपास ३ महिन्यांच्या वेटींगनंतर काल थंडरबर्ड ३५० एक्स घरी आली.
ट्युबलेस टायर्स, अलॉय व्हिल्स, फ्लॅट हॅन्डलबार ही प्रमुख वैशिष्ट्ये. गाडी चालवायला एकदम मख्खन आहे.
15 Jun 2018 - 9:47 am | सुबोध खरे
अभिनंदन
ट्युब्लेस टायर आणि पुढे आणि मागे डिस्क ब्रेक्स हि सुरक्षिततेच्या दृष्टीने फार महत्त्वाची उपलब्धी आहे. बाकी जर ABS आणि फ्युएल इंजेक्शन असते तर अजूनच उत्तम झाले असते असे वाटते.
15 Jun 2018 - 10:36 am | प्रचेतस
धन्यवाद.
एबीएस द्यायला हवेच होते. बहुधा पुढच्या वर्षीच्या मॉडेलपासून सुरु होतील असे वाटतेय. फ्युएल इंजेक्शन ५०० सीसी क्षमतेच्या व्हर्जनला दिले आहे.
15 Jun 2018 - 10:52 am | जेम्स वांड
हा धागा कधी कसा दिसला नाही ते!
प्रचेतस सर, हार्दिक अभिनंदन, जबरी खरेदी, ही गाडी माझ्या विशलिस्ट मध्ये आहे राव. जब्बर गाडी, जब्बर फीचर्स, तुमचे खूप खूप अभिनंदन.
15 Jun 2018 - 12:33 pm | सुबोध खरे
आफ्टर मार्केट ड्युएल चॅनेल ए बी एस (जर आणि जेंव्हां) उपलब्ध होईल तेंव्हा ते लावूनच घ्या.
पावसाळ्यात तेल सांडलेल्या किंवा वाळू असलेल्या रस्त्यावर त्याचा नक्की फायदा होतो हा स्वानुभव आहे. (होंडा युनिकॉर्न आणि बजाज डॉमिनार या माझ्या कडे असलेल्या दोन्ही गाड्यात हा फरक नक्की जाणवतो)
15 Jun 2018 - 1:28 pm | एस
अरे वा! अभिनंदन..!
15 Jun 2018 - 1:38 pm | मोदक
अभिनंदन..!!!!!
29 Jun 2018 - 2:14 pm | खटपट्या
अभिनंदन वल्ली !!!
15 Jun 2018 - 5:33 pm | कपिलमुनी
पिंची मध्ये चिन्मय डांगरे नावाचा अवलिया मॅकेनिक आहे. बुलेटपासून ते हार्ले सगळी काम मस्त करतो. तिकडे ए बी स टाकू शकता
29 Jun 2018 - 11:08 am | जेम्स वांड
महिंद्रा अँड महिंद्रा जावा बाईक्स चे पुनरुज्जीवन करणार हो! मध्यप्रदेश इथल्या पिथमपूर प्रकल्पात होणार निर्मिती.
29 Jun 2018 - 11:21 am | कपिलमुनी
ट्विन सिलेंडर आणि ३५० सीसी असेल तर किंमत अडीच लाखाच्या पुढे जाइल .
महिन्द्राची मोजो चा परफॉर्मन्स चांगला आहे , पण किंमत जास्त असल्यने फ्लोप गेली अहे . बजाज च्या गाड्या तुलनेने स्वस्त आहेत आणि २ लाख हून अधिक किंमत असल्यास आंतरराष्ट्रीय ब्रंडची स्पर्धा असेल
29 Jun 2018 - 3:11 pm | जेम्स वांड
पण, जर त्यांना थेट रॉयल एन्फिल्डला कंपेटिशन द्यायची असेल तर त्यांना प्रायजिंग स्पर्धात्मक ठेवावेच लागेल. एनफिल्ड जश्या गाड्या बनवते ते मुद्दाम टोर्क कमी ठेवतात, हायवे क्रुजिंग, क्रॉस कंट्री डोळ्यासमोर ठेऊन, महिंद्राला जर अख्खा एक प्लांट/लाईन/फ्लोर जावाला समर्पित करायचा असेल तर त्यांना ही बाब लक्षात घ्यावीच लागेल, कारण 'इन इट्स ओन क्लास' रॉयल एनफिल्डला स्पर्धाच नाहीये अन मार्केट कॅपचर जबरी आहे. सेल्स फिगर्स पाहून चक्रावून जायला होतं त्यांच्या.
31 Oct 2019 - 2:53 pm | सतिश पाटील
स्टॅंडर्ड बुलेट ३५०x
31 Oct 2019 - 7:31 pm | अमर विश्वास
मंडळात आपले स्वागत आहे
आत मस्त ट्रिप चा वृत्तांत येउद्या
2 Nov 2019 - 10:16 am | वामन देशमुख
रॉयल परिवारात आपलं हार्दिक स्वागत!
2 Nov 2019 - 10:59 am | जेम्स वांड
खूप खूप अभिनंदन, आता बघायचं आमचा योग कधी लागतो ते.
2 Nov 2019 - 3:40 pm | सतिश पाटील
धन्यवाद