मुळ काव्य(गीत)-वासुदेव आला हो वासुदेव आला.
पळवुन लावलं................... बाबांना पळवुन लावलं.........................
रामदेव बाबा हो रामदेव बाबा,सरकारि मेंदुचा सुटलाय ताबा॥ध्रु॥
नाही उरली जागा,लागला पहारा।
रामदेव बाबा,तुला लोकांचा सहारा॥
हिंन्दुंची तु काशी,अन मुस्लिमांचा काबा...........॥१॥
ऐकुनीया बाबा,तुझे खडे बोलं।
सरकारचं उरलं सुरलं,मोडुन गेलं बळं॥
दिली आश्वासनं,नी घेतला तुझा ताबा..............॥२॥
अश्या सरकारा,हाणुनीया जोडा।
लिहुनीया गाणी,लाऊ हातंभारं थोडा॥
होणार पुढं काय?थोडं तुमी थांबा....................॥३॥
पराग दिवेकर.........
प्रतिक्रिया
6 Jun 2011 - 11:50 am | किसन शिंदे
मस्त काव्य जमलयं!
अजुन दोन-तीन कडवी लिहता आली असती तर मजा आली असती....;)
6 Jun 2011 - 12:24 pm | अत्रुप्त आत्मा
मुळ गीता मधे ३ कडवी आहेत,म्हणुनही अत्ता ३ लिहिली आहेत,पुढे दिवसांगणिक एपिसोड निघत जाणार आहेत...तेंव्हा प्रतिभेला प्राणाची फुंकर बसली... सॉरी सॉरी...यायला हल्ली हे जड (खरं म्हणजे अवजड)मराठी लय बाहेर यायला लागलय......नवीन सुचेल तसं नवीन लिहीन,ईतकच बाकी काही नाही... प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद...
5 May 2017 - 9:35 am | अभ्या..
बुवा ह्यानंतर फुंकरा थांबल्या का?
पुढचे कड़वे पाड़ावेत अशी नम्र विनंती.
7 Jun 2011 - 3:38 pm | डावखुरा
एक्दम मस्त...
7 Jun 2011 - 4:12 pm | अमोल केळकर
मस्त :)
अमोल