मैत्रि...

DTPS's picture
DTPS in जे न देखे रवी...
30 Apr 2017 - 4:03 am

मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते
कधि हसून तर कधि मुक्त रडून ति कुलवायची असते
गरज नाही रोजच भेटले बोलले पाहिजे
पण मनापासुन एकदा तरि आठवण काढायची असते
मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते...

कोण आपले कोण परके हे भेद मैत्रित विसरायचे असते
सगळ्यांना सोबत घेऊन जगायचे असते
भांडण रुसवे फुगवे आनंदाने उपभोगायचे असते
मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते....

फायद्या तोट्याला इथे किंमत नसते
सगळी गोळा बेरीज शेवटि शून्यच असते
हेवे दावे सारे काही इथे गौंन असते
मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते....

आयुष्याच्या शेवटी हि मैत्रिचि कुपी अलगद उघडायची असते
आठवणींच्या रम्य स्वप्नात सैर करायची असते
उतार वयातील दुःखा वरचे हे रामबाण औषध असते
म्हणून तर मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते....

कविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

30 Apr 2017 - 7:50 pm | पैसा

कॉलेजमधे आहात का? तुमचा आयडी पण आवडलाय.

नाहि हो.....कॉलेजमधे नाहि....जिथे काम करतो तिथल्या नावचा आयडी आहे :)

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2017 - 8:19 pm | अत्रुप्त आत्मा

अच्छा. ! डिटिपी चा व्यवसाय आहे तर!

सतिश गावडे's picture

1 May 2017 - 8:29 pm | सतिश गावडे

मैत्री कुलवायची म्हणजे काय करायचं?