लेख शीर्षक स्मजण्यास सोपे जावे म्हणून कॉपीराईट हा शब्द प्रयोग केला असला तरीही या लेखातून एकुणच बौद्धीकसंपदा कायद्यांचा उहापोह करण्याचा मानस आहे. कॉपीराईटमुळे कलाकृती हा शब्द प्रयोग लेखनात पुन्हा पुन्हा वापरला जात असला तरीही सॉफ्टवेअर सारख्या मोठा सेवा उद्योग बौद्धीक संपदा कायदे आणि कॉपीराईट कायद्यांने संरक्षीत पायावर ऊभा आहे हे लक्षात घेऊन मी तर कलाकार नाही मला याचे काय काम असा विचार सुरवातीसच टाळलेला बरा असे वाटते.
सप्तरंगी यांच्या चित्र विषयक माझी काही ट्युलिप्स पेंटिंग्स या धाग्यावर चित्रांवरील कॉपीराईट बद्दल चर्चा करण्याचा योग आला. त्या धाग्यावर चित्रांच्या कॉपीराईट बद्दल माझी चर्चा संपत आली असतानाच कॉपीराईट बद्दल सप्तरंगी यांनी कॉपीराईट बद्दल अधिक माहिती करून घेण्यास उत्सुकता दर्शवल्यामुळे या विषयावर लेख लिहून पहावा असे वाटले.
तुमच्या कलाकृतीवरचा तुमचा कॉपीराईट हि खरेतर तुमची प्रॉपर्टी असते. जंगलातील आदीवासी ज्या जमिनींवर राहतात त्यावाटून घेऊन आर्थीक आधारावर देवाण घेवाण करत नाहीत म्हणून आर्थीक मुल्यवर्धन किंवा आर्थीक विकास होत नाही. मानवी सांस्कृतीक उन्नयन अंशतः आर्थीक प्रगती अवलंबून आहे आणि आर्थीक प्रगतीचे चाक गोष्टींना मुल्य प्रदान करण्यावर आहे. आणि कॉपीराईटची संकल्पना तुम्ही गुंतवलेल्या वेळेवर, कौशल्य आणि बुद्धीमत्तेवर जी कलाकृती निर्माण होते त्याला मुल्य प्रदान करण्याचा अधिकार देते जेणे करून तुमच्या कलाकृतीचा वापर आणि वितरण कसे आणि कोणत्या कोणत्या किमतीने केले जावे याचा कलाकृतीचा निर्माता निर्माती म्हणून तुम्हाला कायद्याच्या बळावर मर्यादीत का होईना महत्वपूर्ण अधिकार मिळत असतो. त्यामुळे बौद्धीक संपदा कायद्यांची केवळ सजगता नव्हे तर सक्रीय वापर केवळ व्यक्तिगत नव्हे तर सामुहीक आर्थीक आणि सांस्कृतीक विकास चक्राला गती देण्यास साहाय्यभूत होऊ शकतो.
कलाकृतीच्या निर्मितीत आणि बौद्धीक संपदा कायद्यात मुलतः स्त्री पुरुष असा भेद नसतो. परंतु विवीध व्यक्तिगत अथवा सामाजिक परिस्थितींमुळे बहुतांश स्त्रींयांना ऑर्गनाईज्ड सेक्टरच्या संधी उपलब्ध होत नाहीत अथवा विवीध कारणांनी वयाच्या एखाद्या टप्प्यावर त्या सुटतात. त्या मुळे बर्याच स्त्रीयांना स्वयं रोजगाराच्या विवीध मार्ग चोखाळावे लागतात (-रोजगार हा शब्द खटकत असेल तर पर्यायी शब्द काय वापरावा ते वाचकांनी सुचवावे). स्त्रीयांकडून स्विकारल्या जात असलेल्या स्वयंरोजगारांमध्ये कौशल्य तंत्रज्ञान आणि मार्केटींग विक्री वितरणाच्या लागणार्या सॉफट्स्कीलच्या कमतरता जसे त्यांच्या उत्पन्नावर मर्यादा आणतात तसेच बौद्धीक संपदा कायद्यां बद्दल सजगतेचा व सक्रीय वापराचा अभावही त्यांना शक्य असलेल्या मुल्यवृद्धीच्या संधींपासून वंचीत ठेवत असू शकतो. त्यामुळे विवीध बौद्धीक संपदा कायद्यांचा परिचय करून घेणे आणि जिथे स्त्रीयांसाठी सयुक्तीक असे बदल कायद्यांमध्ये करून उत्पन्नाचे मार्ग सुरक्षीत कसे होऊ शकतीले पहाणे उपयूक्त असू शकते.
पहीला प्रकार पारंपारीक कलाकौशल्यांचा
स्त्रीयांच्या कलाकृती कार्यात बर्याच पारंपारीक कलांचाही समावेश होतो जसे लोकगीत प्रकारातील नवी काव्य रचना समजा कुणी गरबा नृत्यासाठी लिहिली तर त्याचा कमर्शिअल उपयोगही होऊन जाईल पण मूळ काव्य लेखीकेला काही उत्पन्न मिळेलच असे नाही किंबहूना बहुतेक वेळा ते मिळतच नसावे कारण सर्वसामान्य जनतेला ते जुने लोकगीत नाही हे कळण्यासही मार्ग नसतो कमर्शिल प्रेझेंटरची त्यावेळेस सजगतेने मूळ कविस / संगितकारास मोबदला देण्याची मुख्य जबाबदारी असते पण एकुणच सामाजिक कायदे विषयक सजगतेचा आणि कायदेविषयक सक्रीयतेच्या अभावामुळे मूळ कलाकारास आपल्या उत्पन्नाच्या अधिकारांपासून मुकावे लागते. अशाच बाबी रांगोळी मेंदी अशा बाबतीत दाखवता येतील कि साप्ताहीके मेंदी किंवा रांगोळी विशेषांक काढताना मूळ कलाकाराची कलाकृती नवी असेल तर त्यास मोबदला पोहोचवतात का ? किंवा लग्नात कमस्रिअली मेंदी काढून घेतली तर मेंदी काढणार्या व्यक्तिस उत्पन्न मिळतेही पण मेंदीचे मूळ डिझाईन समजा नवीन आहे तर त्या मेंदीचे नवीन डिझाईन करणार्यास उत्पन्न मिळते का ? कार्पोरेट किंवा अगदी राजकीय कार्यक्रमासाठी कमर्शीअली पे करून रांगोळी काढून घेतली गेली तर डेकोरेटर ला पैसे मिळत असणार पण रांगोळीचे डिझाईन नाविन्यपूर्ण असेल तर त्याचा मोबदला डेकोरेटर रांगोळीचे नावीन्य पूर्ण डिझाईन बनवणार्या व्यक्तीस पोहोचवतो का ? लग्नासाठी कुणी नवे मंगलाष्टक रचले आणि लग्नांमध्ये वापरण्याआधी त्याचा मोबदला रचनाकाराकडे पोहोचवला जातो का ? शेवटी काही अंशी सांस्कृतीक प्रामाणिकतेचाही प्रश्न आहे. 'हॅपी बर्थ डे टू यू' सारख्या छोट्या काव्य पंक्तीची म्हणण्याच्या पद्धतीवर अगदी आत्ता आत्ता पर्यंत कॉपीराईट होता रेस्टॉरंट सारख्या पब्लिक प्लेसवर कार्यक्रम झाल्यास सबंध युरोमेरीकन मूळ संगितकारांच्या वंशजांना त्यांचा पैसा रितसर पोचता करत. पण आपल्याकडे याचे सर्वसाधारणपणे उत्तर नकारार्थी येते. कला पारंपारीक स्वरुपाची असेल तर तुमची कला नविन वेगळी ओळखू यावी आणि नव्या कलेचे रजिस्ट्रेशन करता यावे म्हणून जुन्या निर्मितींचे दस्तएवजीकरण करणे जरुरी असते ते अंशतः नियतकालिकांमधून अल्पसे पुस्तकातून होतही असते पण एकतर सर्व पारंपारीक कलांचे दस्तएवजीकरण होत नाही आणि होते ते पुरेसे होते म्हणण्यासारखी परिस्थिती नाही.
पारंपारीक कलांचे उदाहरण बारकावे लक्षात यावेत म्हणून मुद्दाम दिले. पोषाखांवरील नक्षीकामात आणि एकुणच पोषाखांच्या डिझाईन्स मध्ये नव्या रचना करुन कॉपीराईट आणि उत्पन्न मिळवणे शक्य असावे. मग इंटिरीअर देकोरेशन, लँडस्केपिंग आर्कीटॅक्चर, मुर्तीकला इत्यादी व्यवसाय आहेत त्यात नव्या रचनांवर कॉपीराईट राखणे शक्य असावे.
व्यस्ततेमुळे एका बैठकीत लेखन पुर्ण होईल असे दिसत नाही तेव्हा उर्वरीत लेखन क्रमशः
प्रतिक्रिया
1 May 2017 - 2:03 pm | कंजूस
१) पारंपरिक कलेचे कॅापिराइट सरकार घेते का? उदा ओडिशाच्या पिप्पलीतले अप्लिक.
२) शेवटचा दुवा "उत्तरदायक्त्वास नकार" उघडत नाही (The requested page "/node/www.misalpav.com/node/31668" could not be found.)
1 May 2017 - 3:58 pm | माहितगार
उत्तरदायक्त्वास नकारचा दुवा दुरूस्त केला आहे. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद
नाही आपण जो उल्लेख करताय तो वस्तु उत्पादनाच्या भौगोलीक वारशा बद्दल. जसे की आपण म्हणतो सोलापुरच्या चादरी, नागपुरी संत्री, नाशिकची द्राक्षे. ते कॉपीराईट नव्हे पण बौद्धीक संपदा कायद्यां अंतर्गतच येते. यात कॉपीराईट म्हणण्यापेक्षा ट्रेडमार्क समकक्ष अधिकार मिळतात. म्हणजे तामीळनाडूत चादर तयार करुन सोलापुरी चादर म्हणून विकली जाऊ नये. अशा फसवणूकीत मुळ उत्पादकाचे आणि ग्राहकाचे दोघांचेही नुकसान होत असते. हे नुकसान टाळणे हा ह्या कायद्याचा उद्देश आहे.
म्हणजे लोणावळ्याची चिक्की, अमुक ठिकाणचे पेढे, रत्नागिरीचा हापुस अशा, अमुक ठिकाणची केळी अशा उत्पादनांना संरक्षण देण्याची कायद्यात काही अटींवर व्यवस्था आहे. आधी म्हटले तसे हा कॉपिराईट नव्हे कॉपीराईत वेगळा घ्यावा लागतो जसे पैठणच्या पैठणींना भौगोलीक वारशाचे संरक्षण असल्यामुळे पैठण व्यतरीक्त बनलेल्या समकक्ष प्रावरणांना कुणि पैठणी म्हणून खपवल्यास शिक्षेस पात्र होऊ शकेल अशी व्यवस्था कायद्यात आहे. पैठणीवरच्या एखाद्या नवीन डिझाईनचे कॉपीराईट घ्यायचे असेल तर त्याची प्रक्रीया उत्पादकांना स्वतंत्रपणे करावयास लागेल.
भौगोलीक वारशा बद्दल एखाद्या उत्पादनाचे रजिस्ट्रेशन सहसा संबंधीत उत्पादकांच्या संघटनेस करावे लागते. कदाचित स्थानिक स्वराज्य संस्था किंवा राज्यसरकार यात पुढाकार घेऊ शकतात का ते माहित नाही तपासावे लागेल पण मुख्यत्वे जबाबदारी उत्पादकांच्या संघटनांची असावी. इथेही त्या विशीष्ट भौगोलीक परिसरातील उत्पादन वेगळे का आहे हे व्यवस्थीत डॉक्यूमेंटॅशन करुन त्याची महती पटवून द्यावी लागते. म्हणजे संबंधीत संघटनेस बरीच मेहनत घ्यावी लागते. अलिकडे हैदराबादी बिर्याणी बद्दल त्यांचे डॉपुमेंटेशन कमी पडल्यामुळे त्यांना ते मिळू शकले नाही अशी बातमी होती. हे रजिस्ट्रेशन एका वेळी दहा वर्षांसाठी मिळते आणि दर दहा वर्षांनी
माझ्या मते एखादे उत्पादन एखाद्या गल्ली पुरते मर्यादीत असले तरी विख्यात असेल तर असे रजिस्ट्रेशन करता यावयास हवे 'अमुक गल्लीतील भेळ' असे रजिस्ट्रेशन जमावयास हवे आणि केले जावयास हवे. आपल्या कडील कोल्हापुरी चपला लोणावळ्याची चिक्की अशा कितीतरी उत्पादनांना असे रजिस्ट्रेशन शक्य असावे पण सजगता आणि सक्रीय संघटनात्मकता या साठी गरजेच्या आहेत. वर हैदराबाद बिर्याणी प्रकारात दस्तएवज उपलब्ध करण्यात संघटनेचा बहुधा आळशीपणा नडला असावा.
महाराष्ट्रात स्त्री उत्पादकांचे बर्याच प्रमाणावर अल्पबचत गट झाले आहेत त्यांच्या पर्यंत हि माहिती पोहोचावयास हवी. ती सध्या कितपत पोहोचत असेल या बाबत साशंकता वाटते.
लेखात नमुद केल्या प्रमाणे उत्तरदायकत्वास नकार लागू आहेच.
1 May 2017 - 4:19 pm | माहितगार
हे भारतात नसल्यामुळे केवळ वैचारीक चर्चा आहे.
वस्तुतः कॉपीराईट व्यकिकडे असेल तर व्यक्तिचे आयुष्य + ६० वर्षे आणि संस्थेकडे म्हणजे व्यक्तिच्या नावावर नसेल तर ६० वर्षे परदेशात काही ठिकाणी ७० वर्षे वगैरे. म्हणजे एखादी कला कलाकृती नवीन नसेल परंपरागत लोककलेचा भाग असेल तर त्यावर कॉपीराईट उपलब्ध होत नाही कारण कलाकृतीच्या निर्मात्याचे आयुष्य + ६० वर्षे हा काळ संपलेला असतो.
पण लोककलांच्या बाबतीत अजून एक वाद युरोमेरीकेत उद्भवलेला/ चर्चीला गेलेला दिसतो. वर आपण जसे भौगोलीक वारसा पाहीले तसे काही लोक कला या काही विशीष्ट समुदायांचा वारसा असतो. यातील असंख्य (आदीवासी) समुदायांना प्रापर्टी कॉपीराईट या संकल्पना माहितही नसतात. ऐश्वर्या राय आणि अनिल कपूरच्या त्या चित्रपटाचे नाव आठवत नाहीए ज्यात ऐश्वर्या रायचे वडील खेड्यात संगितकार असतात आणि त्यांच्या संगित रचनेत बदल करुन मुंबईत बसून अनिल कपुर पैसा आणि प्रसिद्धी मिळवतोय वस्तुतः गित-संगित-कोरीओग्राफी विवीढ लोक कला यांना कॉपीराईट प्रोटेक्शन असते पण फारच मर्यादीत असते आपल्याकडे बर्याच शहरी भागात वारली मधुबनी इत्यादी पेंटींगवर वारली किंवा मधुबनी नसलेलेही अलिकडे पैसे कमावताना दिसतात पण मूळ वारली आणि मधुबनी समुदाय उत्पन्नापासून वंचितच रहाण्याची समस्या निर्माण होते. म्हणून आमेरीकेत मला वाटते अॅबओरीजीनीजच्या काही लोककलां आणि अगदी पारंपारीक ज्ञानबद्दल भौगोलीकच्या स्टाईल मध्ये समुदाया आधारीत बौद्धीक संपदा कायद्याचे संरक्षण दिल्याचे वाचनात आले आहे (सर्व डिटेल्स माहित नाहीत त्यामुळे त्याचे स्वरुप कॉपीराईट स्टाईल आहे का ट्रेडमार्क स्टाईल आहे माहित नाही पण समुदाय आधारीत आहे हे नक्की चुभूदेघे)
अर्थात वरील माहिती जेव्हा वाचनात आली तेव्हा नाण्याची एक बाजू जसे कि वारली पेंटींगवर वारली समुदायासच उत्पन्न का मिळू नये ? बरोबर वाटेल पण दुसर्या बाजूस वैदीक ज्ञानावर बरीच शतके चालवला गेलेला अघोषीत कॉपीराईट समुदायाधारीत होता तेव्हा असा कॉपीराईट देणे म्हणजे जुनी जाती प्रथा निर्मितीस कारणीभूत 'वतन' पद्धती जसे कि मडकी कुंभारानेच बनवावीत म्हणण्यासारखे होते आणि त्या पद्धतीच्या मर्यादाही भारतात अनभवून झाल्या आहेत युरोमेरीकेने ते अनुभवले नसल्यामुळे त्यांना त्याचे सध्यातरी कौतुक वाटत असावे.
इन एनी केस वारली असो का मधुबनी असो त्यांना भौगोलीक वारसा कायद्याचा आधार घेता येऊ शकतोच. एवढेच कि उत्पादन आपल्या समुदाया पर्यंत मर्यादीत करता येत नाही.
1 May 2017 - 4:51 pm | सतिश गावडे
देवगड हापूस ट्रेडमार्क होणार असे कुठेतरी वाचले होते. असे झाल्यास इतर ठीकाणचा हापूस आंबा "देवगड हापूस" म्हणून विकता येणार नव्हता/नाही.
1 May 2017 - 7:36 pm | माहितगार
http://www.ipindia.gov.in/ या साईटवर शोध आणि पिडीएफ उपलब्ध आहेत (बर्याच गोष्टी ऑनलाईन झालेल्या दिसतात) पण अद्ययावतते साठी शोध अवघड नाही पण अगदिच सुलभ असाही दिसत नाही. काही आंब्यांच्या जाती यात नोंदवलेल्या दिसतात पण कोकणातले हापूस आंबे आणि इतर गोष्टी का नाहीत माहित नाही. पेंडींग वगैरेच्या लिस्टही दिसतात. कोल्हापुरी चप्पल पेंडींग लीस्टमध्ये दिसली पण ते प्रयत्न महाराष्ट्रातून झालेले दिसत नाहीत. (चुभूदेघे)
1 May 2017 - 5:37 pm | अभ्या..
ताल
1 May 2017 - 7:37 pm | माहितगार
हां 'ताल' बरोबर. आठवण देण्याबद्दल धन्यवाद.
1 May 2017 - 4:41 pm | पैसा
उत्तम माहितीपूर्ण लेख
1 May 2017 - 7:45 pm | माहितगार
मिपाच्या माध्यामातून गरजूंपर्यंत किती पोहोचेल माहित नाही पण किमान स्वरुपाची माहिती चर्चा आंतरजालावर उपलब्ध होण्यास मदत होईल. आपण आणि इतरांनी माहित असलेल्या गोष्टीबद्दलही प्रश्न विचारले तर हरकत नाही जसे कि ट्रेडमार्क म्हणजे काय वगैरे. इतर बौद्धीक संपदा कायदे कॉपीराईट एवढे माहित नसले तरी या निमीत्ताने किमान ओळख तरी होऊ शकेल.
मी मिटकॉन साठी ३ का ४ कार्यशाळांसाठी स्त्री उत्पादक बचतगटांना मार्गदर्शक म्हणून जाऊन त्यांची कार्यपद्धती अल्पशी अभ्यासण्याचा योग आला आहे. सर्वच गोष्टी तेथे चर्चा करण्यास वेळ मिळत नाही पण ट्रेडमार्क मार्केटींग वगैरे गोष्टींची तोंड ओळख असणे खूप गरजेचे असावे.
1 May 2017 - 5:25 pm | कंजूस
धन्यवाद माहितगार.