इंग्लंड भटकंती भाग ६ - पूल बाईक शो आणी मूर्स व्हॅली

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in भटकंती
23 Apr 2017 - 8:23 pm

मागील भागाची लिंक
इंग्लंड भटकंती भाग ५ - पूल

मे आणी जून ह्या दोन महिन्यात पूल शहराच्या समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या भागात पूल बाईक शो भरवला जातो. अनेक लोक त्यांच्या वेगवेगळ्या बाईक्स आणून प्रदर्शनात मांडतात आणी त्यातून एक विजेती बाईक निवडली जाते. प्रदर्शन पाहायला कोणतेही तिकीट नाही.

प्रदर्शनात पाहिलेल्या काही आवडलेल्या बाईक खाली.

खालील बाईक कुठल्यातरी प्रदर्शनात विजेती होती. पूर्ण बाईक टाकाऊ वस्तूं पासून बनवलेली आहे तर बैलाची शिंगे हॅण्डल म्हणून वापरलेली आहेत.

पूल ग्रेहाऊंड हे दर रविवारी कुत्र्यांच्या धावण्याच्या स्पर्धा भरवण्याचे ठिकाण.

आपण तिथे पैसे लावून सट्टा खेळू शकतो. गेलो एकदा सट्टा खेळायला. प्रत्येक रेस ला ६ नवीन खेळाडू (कुत्रे). सुरवातीला त्यांना त्यांचे ट्रेनर फिरवून सगळ्या लोकांना दाखवणार. मग त्यांच्यावर पैसे लावायला थोडा वेळ मिळतो आणी मग रेस. जिंकलात तर लगेच पैसे घ्यायचे. बऱ्याच प्रकारे पैसे लावू शकता. पहिला कोण येणार, दुसरा कोण येणार, तिसरा कोण येणार, पहिले 3 कोण असतील, ६ जणांमध्ये कसे नंबर येतील. खूप प्रकार होते पैसे लावायला. फक्त पैसाच पाहिजे. एकदा माझा कुत्रा जिंकला त्याचे एकाच्या बदल्यात ३ पौंड मिळाले. बाकी सर्व रेस मध्ये निराशा झाली.

मूर्स व्हॅली -
हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. परंतु ह्या ठिकाणी जायला थेट बस सेवा नाही. बरेच अंतर चालावे लागते. त्यामुळे तिथे पोचण्यातच बराच वेळ खर्ची होईल कुणाचाही. स्वत:ची गाडी असल्यास उत्तम.

इथे एक टॉय ट्रेन आहे. खरोखरच खेळण्यातली वाटावी इतकी छोटी ट्रेन आहे. आणी ती व्हॅलीच्या आत दोन स्टेशनच्या दरम्यान (लेकसाईड आणी Kingmere ) फिरते. वाटेत छोटे बोगदे बनवलेले आहेत आणी सिग्नल सिस्टिम देखील उभारलेली आहे.

गाडीचे कोळश्यावर चालणारे इंजिन

तसेच मूर्स व्हॅली मध्ये आत प्रवेश केला की लगेच एक सायकल भाड्याने देण्याचे ठिकाण आहे. तेथून सायकल भाड्याने घेऊन ह्या सुंदर व्हॅलीमध्ये फिरणे का एक अतिशय सुंदर अनुभव आहे.

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

23 Apr 2017 - 8:49 pm | सिरुसेरि

छान फोटो आणी माहिती

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Apr 2017 - 12:26 am | डॉ सुहास म्हात्रे

रोचक माहिती आणि मस्त फोटो !

पद्मावति's picture

24 Apr 2017 - 12:51 am | पद्मावति

मस्तच.

आवडले लिखाण. क्रमशः आहे का?

अभिजीत अवलिया's picture

24 Apr 2017 - 12:18 pm | अभिजीत अवलिया

हा शेवटचा भाग. अजून दोन ठिकाणी मी गेलो होतो पण त्यांचे फोटो तितकेसे चांगले आले नाहीत.

असुदेत, टाका फोटो आणि लिहा.

दशानन's picture

24 Apr 2017 - 8:34 am | दशानन

तिसरी बाईक एकदम झक्कास!

वरुण मोहिते's picture

24 Apr 2017 - 1:31 pm | वरुण मोहिते

आवडली .