काही कविता मनात अलगद उतरतात, काही कविता अगदी खोलवर रुततात..
काही कविता हातात येता येता सूळ्ळकन निसटतात तर काही धडधडत वेगाने डोक्यावरून जातात
काही मनाला पटतात तर काही पटुनही नकोशा वाटतात
काही टच्चकन डोळ्यात पाणी आणणार्या, काही मात्र फक्त शब्द उधळणार्या...
काही कविता अंतर्मुख करणार्या तर काही कविता सुंदर पण परकाश्या वाटणार्या
काही असतात फील गुड कविता तर काही असतात 'काहीही हं' टाईप्स कविता
....
काही कविता मात्र सहज समजतात, मनमोकळ्या भेटतात, लयीत गुंफतात, जिभेवर वसतात, मनात भिनतात.....या कविता 'आहा..क्या बात है' अशी उत्स्फूर्त दाद क्षणार्धात घेऊन जातात!!
अशीच एक नितांत सुंदर कविता-- मिपाकर अनन्त्_यात्री यांची रचना-- 'मध्यरात्री'
या सुरेख रचनेचा हिंदीत स्वैर अनुवाद करायचा मी प्रयत्न केलाय...
मध्यरात्री गजबजावे नभ वितळत्या चा॑दण्याने
भरुनी जावा ओ॑जळीचा चषक त्या फेनिल प्रभेने
मध्यरात्री सळसळावे बेट पिवळे केतकीचे
भरुनी जावे आसम॑ती ग॑ध थरथरत्या तृणांचे
मध्यरात्री कुजबुजावा मेघ बिलगुनी पर्वता
त्या ध्वनीने विरत जावी दाट गहिरी शा॑तता
मी केलेला स्वैर अनुवाद/ भावानुवाद
आसमाँ में आज कुछ चहल पहल सी है
चंदा की चाँदनी भी पिघली पिघली सी है
रात के प्याले में फेनील सी मदिरा
उमड़ती, मचलती छलकी छलकी सी है
हवाओं मे केरुआ छिड़का छिड़का सा है
धरतीं का आँचल भी कुछ लहका लहका सा है
फिर अचानक ये हंगामा सा क्यों है
मौसमका मिजाझ यूं बदला बदलासा क्यो है
वादीयोँ में मची ये हलचल सी क्यो है
निशब्द रात बनी तार तार सी क्यो है
पर्बत के सीने से जा बादल टकराया है
बिछड़ा हुआ कोई अपना जैसे घर लौटके आया है
( केरुआ- केवड़ा)
प्रतिक्रिया
23 Apr 2017 - 6:56 pm | यशोधरा
क्या बात! :)
सुरेख जमला आहे भावानुवाद.
23 Apr 2017 - 8:29 pm | अनन्त्_यात्री
-माझी एखादी कविता भावानुवादास योग्य वाटली हे वाचून जितक॑ बर॑ वाटल॑ त्याहीपेक्षा अधिक आन॑द आपण केलेला समर्पक व चित्रदर्शी भावानुवाद वाचून झाला!
-मनाला भिडलेल्या, भावलेल्या अन मनात भिनलेल्या कवितेचा मनासारखा अनुवाद्/भवानुवाद जमेपर्य॑त कशी घालमेल होते याचा मीही अनुभव घेतलाय !
23 Apr 2017 - 9:59 pm | पद्मावति
थॅंक्स यशो :)
अनन्त्_यात्री, तुमच्या इतक्या सुंदर कवितेचा भावनुवाद करण्याचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला हे कळवल्याबद्दल मन:पूर्वक आभार तुमचे.
मनाला भिडलेल्या, भावलेल्या अन मनात भिनलेल्या कवितेचा मनासारखा अनुवाद्/भवानुवाद जमेपर्य॑त कशी घालमेल होते याचा मीही अनुभव घेतलाय !
+१24 Apr 2017 - 4:53 am | स्रुजा
सुंदर ! भावानुवाद छान जमलाय..
24 Apr 2017 - 5:12 am | सत्यजित...
अतिशय सुरेख भावानुवाद!
मालिकेची प्रस्तावनाही सुंदरच!
पुलेशु.
24 Apr 2017 - 10:24 am | प्रीत-मोहर
सुंदर!!!
24 Apr 2017 - 11:20 am | मंजूताई
जमलाय भावानुवाद!
24 Apr 2017 - 11:45 am | अभ्या..
मस्त जमलाय भावानुवाद
शेवटच्या ओळीचे उत्तर जास्त आवडले.
24 Apr 2017 - 11:52 am | सस्नेह
सुंदर अनुवाद !!
'ये रात भीगी भीगी..' या जुन्या गाण्याची आठवण झाली !
24 Apr 2017 - 3:27 pm | एस
छान भावानुवाद.
24 Apr 2017 - 5:27 pm | सपे-पुणे-३०
सुरेख !
मस्त भावानुवाद. पिघली पिघली, छलकी छलकी अशा शब्दांच्या पुनरावृत्तीमुळे मजा आली. नकळत जुन्या हिंदी सिनेगीतांची आठवण झाली.
24 Apr 2017 - 6:05 pm | अजया
सुरेख जमलाय भावानुवाद. अजून कवितांच्या प्रतीक्षेत..
24 Apr 2017 - 6:33 pm | प्राची अश्विनी
कविता अन् भावानुवाद, दोन्ही सुरेख! अजून येऊ दे.
25 Apr 2017 - 2:08 am | रुपी
वा.. सुंदर भावानुवाद!
25 Apr 2017 - 6:03 am | प्रमोद देर्देकर
मस्त , आवडले.
25 Apr 2017 - 10:15 am | स्मिता चौगुले
सुंदर भावानुवाद !!
बादवे तो केरुआ गाण्यातला केरुआ रंग कसला असतो असा प्रश्न इतके दिवस होता. .. ;-)
आता अर्थ कळला
25 Apr 2017 - 10:23 am | पैसा
भावानुवाद आवडला. अजून येऊ देत.
25 Apr 2017 - 11:25 am | ज्ञानोबाचे पैजार
हिंदी आणि उर्दू भाषां मधे प्रचंड गोडवा भरलेला आहे. या भाषांमधल्या कविता वाचताना कधी कधी डायबिटीस होईल असे वाटते.
अनंत यात्रींची कविता म्हणजे देवगड हापुस होता, तर पद्मावती ताईंची कविता म्हणजे जणू दाट मलाईदार बासुंदीच.
अनंत यात्रींच्या मनातुन कागदावर उतरलेल्या कवितेचा भावानुवाद तितक्याच ताकदीने झाला आहे.
दोन्ही कविता अतिशय आवडल्या
पैजारबुवा,
25 Apr 2017 - 12:59 pm | मितान
सुदंर अनुवाद !!!
25 Apr 2017 - 3:16 pm | चाणक्य
रचना चांगल्या आहेत. पण मूळ कवितेत मला वाटते 'असे व्हावे, तसे व्हावे' अशी शब्दयोजना आहे आणि अनुवादात 'असे झाले आहे, तसे झाले आहे' अशी. त्यामुळे मला मूळ कविता वाचल्यावर जे भाव उमटतात, तसे अनुवाद वाचून नाही उमटले असे वाटले. तुमचा अनुवाद एक स्वतंत्र रचना म्हणून चांगलीच आहे, पण 'भावानुवाद' या कसोटीवर मला वाटले ते सांगितले. गैरसमज नसावा.
25 Apr 2017 - 4:26 pm | पद्मावति
सर्वांचे खूप खूप आभार.
पैजारबुआ =))
स्मिता..तो गाण्यातला शब्द गेरुआ आहे...म्हणजे नारिंगी रंग :) थोडं केरुआ विषयी सांगते. केरुआ म्हणजे केवडा असा अर्थ कुठेतरी वाचल्याचे अंधुक आठवते..पण नक्की नाही. त्यामुळे मी स्वत:लाच बेनिफिट ऑफ डाउट दिला आणि थोडीफार काव्यात्मक स्वातंत्र्य म्हणतात ते घेतलंय :)
चाणक्य, धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल. तुम्हाला काय म्हणायचंय ते मी समजू शकते आणि आदर आहेच. काय झालं नं ही कविता पहिल्यांदा वाचत होते तेव्हाच इतकी आवडली आणि मनात या ओळी भरभर उलगडत गेल्या..अगदी सहजपणे. तो उत्स्फूर्तपणा तंतोतंत अनुवाद करायला गेले तर हरवून जाईल असे मला वाटले म्हणून मी थोडेफार संस्कार करून तेच शब्द, त्याच ओळी राहू दिल्या.
मे बी, मी जे लिहिलंय त्याला भावानुवाद यापेक्षा स्वैर अनुवाद हा जास्ती योग्य शब्द वाटेल.
2 Nov 2017 - 7:21 pm | Madhavi1992
भावानुवाद सुंदर