पुनः एक दंगल झाली, रक्त खुप वाहिले
भगवे, हिरवे, निळे सारे रंग त्याचे पाहिले
सीमेवरचे युद्ध आठवे, रक्त ज्यात सांडले
रंग नव्हता त्याला, आश्र्चर्य याचे वाटले
शहीदरंगी कफन, ज्यांच्या शवांवर टाकले
रंग रक्ताचे त्यांच्या, त्या कफनांवर माखले
दंगलीच्या रंगांचे कफन शहिदांना घातले
तिरंग्यावरील पांढ-याचे मर्म काही उमगले
प्रतिक्रिया
8 Apr 2017 - 10:11 am | Rahul D
छान
9 Apr 2017 - 11:08 pm | संदीप-लेले
धन्यवाद. यापुढे नाव लिहेन.
13 Apr 2017 - 11:40 am | माहितगार
दाद
18 Apr 2017 - 8:49 pm | संदीप-लेले
:)
19 Apr 2017 - 6:55 am | प्राची अश्विनी
आवडली.
21 Apr 2017 - 3:50 am | संदीप-लेले
:)