भाजलेल्या कैरीचे रायते

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
10 Apr 2017 - 8:48 am

बय्राच दिवसांनी मिपावर लिहायला जमतेय. घेऊन आलेय आंबा सिझन स्पेशल रेसिपी!!
साहित्यः
२/३ कच्चे रायवळ आंबे (ही आंब्याची जात विशेषतः कोकणात दिसते. त्या ऐवजी कोणत्याही कैय्रा घ्या.), ३ चमचे तेल, मीठ, गूळ, अर्धा चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, २ चमचे लाल तिखट
raita

कृती: कैय्रा धुवा, पुसून कोरड्या करा. निखाय्रात किंवा मध्यम आचेवर कैय्रा भाजून घ्या. गार होऊ द्या. साल सोलून गर काढून घ्या. गर हातानेच कुस्करून घ्या. जेवढा गर असेल त्याच्या दुप्पट गूळ घेऊन दोन्ही एकत्र करून घ्या. कढईत तेल तापवा. मोहोरी, हिंग आणि लाल तेखट घाला. गॅस मंद ठेवा. आता त्यात गर आणि गूळाचे मिश्रण घाला. ढवळा. मंद आचेवर गूळ विरघळू द्या. चवीनुसार मीठ घाला. साधारण सॉस इतपत झाले की गॅस बंद करा. गार झाल्यावर अजून थोडे घट्ट होते. गार झाल्यावर बरणीत भरून ठेवा. कैरीच्या आंबटपणावर गूळ जास्त लागू शकतो.
चव अप्रतिम लागते.
raita

शाकाहारीरायतेडावी बाजूकैरीचे पदार्थ

प्रतिक्रिया

सूड's picture

10 Apr 2017 - 11:42 am | सूड

भारी!!

भारीच. पोळीवर लावून खायला मज्जा येईल..

बरे तशी किती दिवस टिकते?

अनन्न्या's picture

10 Apr 2017 - 1:15 pm | अनन्न्या

आठदहा दिवस टिकते

पिलीयन रायडर's picture

11 Apr 2017 - 2:31 am | पिलीयन रायडर

अहाहा!!

स्रुजा's picture

11 Apr 2017 - 2:34 am | स्रुजा

वा वा.. हेल्दी पण आहे आणि !

वा! दिसत पण अप्रतिम आहे!

रेवती's picture

11 Apr 2017 - 7:27 am | रेवती

ग्रेट दिसतय.

इरसाल कार्टं's picture

11 Apr 2017 - 10:46 am | इरसाल कार्टं

मस्तच

सविता००१'s picture

11 Apr 2017 - 11:26 am | सविता००१

मस्तच ग

अनन्न्या's picture

12 Apr 2017 - 10:55 am | अनन्न्या

मस्त चव आहे

पैसा's picture

12 Apr 2017 - 12:18 pm | पैसा

पारंपारिक पाकृ

विशाखा राऊत's picture

12 Apr 2017 - 9:47 pm | विशाखा राऊत

:) आवडली

पियुशा's picture

13 Apr 2017 - 9:16 pm | पियुशा

तोपासु