हुरड्याचे वडे (पोंक वडे)

केडी's picture
केडी in पाककृती
10 Mar 2017 - 12:05 pm

हुरड्याचे वडे (पोंक वडे)

Ponk Wade

साहित्य
२ कप कोवळा हुरडा
१ कप गव्हाचे पिठ
१/२ कप बेसन
१/३ कप ज्वारीचे पिठ
१ मोठा चमचा प्रत्येकी लसूण, आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट
मूठभर कोथिंबीर, बारीक चिरून
१ छोटा चमचा ओवा
१ मोठा चमचा मोहन (तेल)
१ चमचा इनो फ्रुट सॉल्ट / बेकिंग सोडा
चवीनुसार मीठ
तळायला तेल

कृती

हुरडा म्हंटल, कि डोळ्यासमोर येते ती म्हणजे गर्द अमराई किंवा हिरवा गार शेतमळा, त्याच्या सावलीत, गौऱ्यांवर भाजलेली कोवळी ज्वारीची कणसे, सोबत शेंगदाणा चटणी, गूळ, शेव, दही आणि नंतर पिठलं भाकरी, ठेचा, आणि मसाला वांग्याचे तुडुंब जेवण!

हल्ली मात्र हाच हुरडा शहरांमध्ये पॅकबंद पिशव्यात घरी आणून तव्यावर भाजून, दुधाची तहान ताकावर भागवली जाते. हुरडा हा महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ, गुजरात मध्ये ह्याला पोंक म्हंटले जाते. हि पाककृती तिथलीच.

हुरडा मिक्सर मधून जाडसर भरडून घ्या. ह्यात सगळी पीठे, आलं, लसूण, मिरची पेस्ट, कोथिंबीर, ओवा आणि चवीनुसार मीठ घाला. मिश्रणात, १ मोठा चमचा मोहन घालून, ते हाताने मळून घ्या. गोळे होतील अश्या रीतीने पाणी घालून सगळं एकजीव करून घट्टसर मळून घ्या. गोळे करण्यापूर्वी, सोडा/फ्रुट सॉल्ट घालून पुन्हा एकदा एकजीव करून त्याचे गोळे करून मंद आचेवर तळून घ्या!

गरम गरम पोंक वडे, हिरव्या चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर खायला घ्या!

[हे वडे एयर फ्रयर मध्ये होतात, पण खमंगपणा जो यायला पाहिजे, तो येत नाही, म्हणून तळूनच काढावे. ह्याच मिश्रणाचे वडे करण्यापेक्षा थालिपीठं थापून ती शॅलो फ्राय केलीत तरी चांगली लागतील]

Ponk Wade

वडेउपहाराचे पदार्थ

प्रतिक्रिया

फ्रुट सॉल्ट मुळे तेल फार पीत नाहीत ना?

सविता००१'s picture

10 Mar 2017 - 2:07 pm | सविता००१

कातिल दिसताहेत।
बेस्ट

आता करून बघ आणि फोटो टाक इथे!

सविता००१'s picture

11 Mar 2017 - 11:01 am | सविता००१

आधी हुरडा पहाते मिळतोय का आता..
वर्णन वाचून मनातल्या मनातच जिभल्या चाटल्यात :)

सुरेख दिसतायत. चवही चांगली असणार. माझ्याकडे फ्रोजन पोंक मिळतोय का पाहते.

नाहीच मिळाले तर मग ह्यात स्वीट कॉर्न घालून, कॉर्न चे बनवून बघा, किंवा मटार घालून, अर्थात हुरड्याची चव वेगळीच ....

पिलीयन रायडर's picture

10 Mar 2017 - 7:05 pm | पिलीयन रायडर

मिळतो का इथे हुरडा??? फ्रोजन का होईना, पण मिळत असेल तर एक नंबर काम होईल!

धाग्यावर हळहळायला आले होते, पण अत्यानंदात परत जात आहे!

एस's picture

10 Mar 2017 - 7:41 pm | एस

आता हुरडा कुठे मिळणार पण? कणसं भरली की! :-(

बादवे, गौऱ्यांवर हे खरं तर गवऱ्यांवर असं पाहिजे ना?

मस्त पाककृती, हुरडा मिळाला तर जरा इकडे पण पाठवा..

बादवे, गौऱ्यांवर हे खरं तर गवऱ्यांवर असं पाहिजे ना?

बरोबर, गवऱ्यांवरच भाजतात कणसे :-))

पैसा's picture

10 Mar 2017 - 8:32 pm | पैसा

लै भारी!

डॉ श्रीहास's picture

11 Mar 2017 - 9:23 am | डॉ श्रीहास

फारच मस्त असतील चवीला... नो डाऊट !!

नूतन सावंत's picture

11 Mar 2017 - 11:01 pm | नूतन सावंत

मस्त मस्त.

स्वाती दिनेश's picture

19 Mar 2017 - 3:25 pm | स्वाती दिनेश

फार छान खमंग दिसत आहेत वडे.
आता हुरडा कुठे शोधावा म्हणते मी?
स्वाती

मदनबाण's picture

19 Mar 2017 - 4:13 pm | मदनबाण

हुरडा एकदाच खाल्ला होता... तेव्हाच तो इतका आवडला होता तर हुरड्याचे वडे किती भारी लागतील ? :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू आता है सीने में जब जब सांसें भरती हूँ, तेरे दिल की गलियों से मैं हर रोज़ गुज़रती हूँ, हवा के जैसे चलता है तू मैं रेत जैसे उडती हूँ, कौन तुझे यूँ प्यार करेगा जैसे मैं करती हूँ... :- M.S. DHONI