मी आज केलेला व्यायाम - फेब्रुवारी २०१७ - सायकलिंग / रनिंग चॅलेंज

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
1 Feb 2017 - 3:22 pm

.

नमस्कार मंडळी.

"मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.

आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे -

नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८,०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.
डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९,६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ५४७ किमी.
जानेवारी २०१७ - सायकलिंग - १०,७५५ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ६९५ किमी.

******************

सायकलिंग ग्रुपवर अनेक दिवस विशेष असे कांही घडत नव्हते.

नियमीतपणे सायकल चालवणारे चालवत होते, मात्र अनेक जणांची सायकल उगाचच बंद झाली होती आणि जुन्या राईडचेच विषय चघळले जात होते. मग अचानक एक दिवस तिथल्या चावडीवर बोलताना डॉक्टर श्रीहास यांनी एक कल्पना मांडली. आपण नियम तयार करू आणि कांही आव्हाने ठेवू. या कारणाने का होईना पण लोकं पुन्हा सायकल चालवू लागतील..!

देशपांडे मामा, सागर पाध्ये, प्रशांत सरपंच, डॉक्टर श्रीहास, मानसभौ आणि बाबा योगिराज.. आंम्ही सगळे जण लगेच यावर काम करू लागलो. आपआपल्या सुपीक डोक्यातून अनेक नियम काढले, हा नियम असावा का, नसावा का यावर चर्चा झाल्या, आंम्ही काढलेली आव्हाने (दिवसा ५० किमी सायकलिंग - असे सलग ७ दिवस) बाकी लोकांनी हाणून पाडली. त्या दृष्टीने विचार सुरू झाला. मध्येच सागर पाध्येंनी "एलिटिस्ट होवू नका रे" असा टोलाही हाणून घेतला. मग शेवटी असा निर्णय घेतला की एक तर ही आव्हाने टीम बनवून पार करायची किंवा एकेकट्याने पार करायची. सायकलश्री, सायकल रत्न अशा पदव्याही तयार झाल्या. ;)
सायकल नसणार्‍यांना या उपक्रमात भाग घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी पळण्याचे आव्हान तयार केले गेले.

मूळ कल्पक डॉक्टर श्रीहास आणि बाकी टीमने भरपूर चर्चा करून पुढील नियम फायनल केले.

१) कोणत्याही दिवशी चॅलेंज सुरू झाले तरी चालेल मात्र नक्की कोणते चॅलेंज आणि किती तारखेला सुरू करणार आहात याची माहिती स्ट्रावा किंवा व्हॉट्सप ग्रूपवर "चॅलेंज सुरू करण्यापूर्वी" द्यावी.

२) कोणतेही चॅलेंज सलग ७ दिवस (कॅलेंडर डेज) पूर्ण झाले तरच गृहीत धरले जाईल.

३) टीम बनवून चॅलेंज पार पाडायचे असेल तर कमाल ४ लोकांची टीम तयार करावी लागेल, टीमचे रोजचे सायकलिंग ५० किंवा १०० किमी करावे लागेल, टीम मधील सर्वांनी रोज किमान ५ किमी सायकलिंग करणे आवश्यक आहे
उदा. टीम मध्ये ३ सायकल स्वार असतील तर प्रत्येकाने रोज किमान ५ किमी सायकल चालवणे बंधनकारक आहे. दोघांनी २५ किमी आणि तिसऱ्याने ० असे झाले तर टीमला पुन्हा चॅलेंज सुरू करावे लागेल.

४) ७ दिवसांपैकी एखादा दिवस कांही कारणाने सायकलिंग झाले नाही तर संपुर्ण टीम चॅलेंजसाठी पात्र राहणार नाही, मात्र पुढील दिवसापासून नियम क्रमांक १ नुसार नवीन चॅलेंज सुरू करता येईल.
उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला सायकलिंग झालेच नाही तर मी ६ तारखेपासून नवीन चॅलेंज सुरू करू शकतो जे १२ मार्चला संपेल.

५) वरील कोणताही नियम न बदलता - १०० किमीचे चॅलेंज घेतल्यानंतर अचानक कांही कारणाने ते ५० किमी मध्ये बदलता येईल. मात्र ५० किमीचे चॅलेंज १०० किमी मध्ये बदलण्यासाठी सगळे दिवस १०० किमी + सायकलिंग होणे आवश्यक आहे.
उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च १०० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला ७५ किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीच्या चॅलेंजला पात्र असेन.
तसेच समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले पण माझे पहिले चार दिवस प्रत्येकी १०० किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीचे चॅलेंज १०० किमीमध्ये बदलू शकतो.

६) ज्यांना रनिंग / वॉकिंग करायचे आहे त्यांनी टीम बनवुन चॅलेंज पूर्ण करावे. रनिंग साठीचे अंतर १० किमी, आणि प्रत्येक टीम मेंबरने किमान २ किमी रनिंग करणे आवश्यक.

********************

हे नियम ग्रुपवर टाकले आणि एकच हलकल्लोळ सुरू झाला, कांही तासातच टीम तयार झाल्या.

टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी सायकलिंग ७ दिवस
टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी सायकलिंग ७ दिवस
लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी सायकलिंग ७ दिवस
टीम लोड रनर - प्रसाद दाते, इरसाल कार्ट, मोदक - १० किमी रनिंग ७ दिवस

यातील "लोन रेंजर" डॉक्टर श्रीहास यांनी आज सकाळी ५० किमीचे चॅलेंज पूर्ण केले.

त्रिदेव आणि F1 जबरदस्त सायकलिंग करत आहेत. त्रिदेवांचे ५ दिवसात तब्बल ६६३ किमी सायकलिंग झाले आणि टीम F1 ४५१ किमी अंतर कापून त्यांना साथ देत आहे.

चॅलेंज स्वीकारल्यानंतर दुसर्‍याच दिवशी मला भटकंतीसाठी बाहेर पडावे लागले त्यामुळे एकच दिवस ५ किमी पळणे जमले व दुसर्‍या दिवशी चॅलेंज गुंडाळावे लागले. मात्र प्रसाद दाते आणि इरसाल कार्ट यांनी नाउमेद न होता दोघांतच आव्हान पूर्ण करायचा चंग बांधला आणि सध्या नियमीतपणे पळत आहेत.

****************************

पुढील टप्पाही आता चर्चेत आहे. थोडी अवघड पण कस बघणारी आव्हाने सागर पाध्येंनी सुचवली आहेत.

मासिक आव्हाने

१. एक सलग फेरी ५० किमी (<१०० किमी)
२. एक सलग फेरी १०० किमी (कितीही)
३. एकूण अंतर ५०० किमी
४. एकूण अंतर १,००० किमी (*)
५. एकूण चढण ३,००० मी
६. एकूण चढण ७,००० मी (*)

वार्षिक आव्हाने
१. ५० किमी दररोज असे कोणतेही ४ आठवडे
२. १०० किमी दररोज असा १ आठवडा
३. महिन्यात २२ वेळा ४०किमी + फेऱ्या (कसाही कॅलेंडर महिना)
४. महिन्यात २२ वेळा दिवसाचे ४० किमी (ऑफिस ऑफिस)⁠⁠⁠⁠
५. किमान ५ घाट (*)

****************************

सध्या या चॅलेंजमुळे ग्रुपवर सर्वजण एकदम उत्साहित आहेत, धमाल करत आहेत आणि अनेकजणांचे नियमीत सायकलिंग सुरू झाले आहे.

****************************

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

येथे विशेष उल्लेख म्हणून ज्यांनी ज्यांनी चॅलेंजे पूर्ण केले त्यांची माहिती देत आहे.

१) लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ४३० किमी.
२) टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ८८० किमी.
३) टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ५०२ किमी.
४) टीम लोड रनर - इरसाल कार्ट आणि प्रसाद दाते - १० किमी रनिंग ७ दिवस - एकूण रनिंग - ७९ किमी.
५) टीम सायक्लोमेनीयाक्स - सागर PDY, स्थितप्रज्ञ आणि नकुल पाठक - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ६४८ किमी.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

क्रीडाआरोग्य

प्रतिक्रिया

स्थितप्रज्ञ's picture

27 Feb 2017 - 3:51 pm | स्थितप्रज्ञ

उन्हात चालवायची सवय रहावी म्हणून शनिवारी आणखी दोन मित्रांबरोबर कामशेतला सायकलवर जाऊन आलो. जाऊन येऊन १००री झाली.
लॉन्ग राईड्सना उन्हामुळे मला नेहमी डोकेदुखीचा त्रास होतो. एका मित्राने सांगितले त्यालाही तसेच होते. त्याच्या डॉ ने त्याला सांगितले होती कि शरीरातले "पोटॅशियम" कमी झाले कि हा त्रास होतो. त्यामुळे भरपूर पोटॅशियम असलेले पदार्थ खात रहा. गूगलबाबाला विचारून या वेळी बरोबर अर्धा डझन केळी घेतली (एका केळ्यात अंदाजे ४०० मिलिग्रॅम पोटॅशियम असते). राईडला ३ फस्त केली. (ठिकाणावर असून सुद्धा) डोके अजिबात दुखले नाही. सोबत डीहायड्रेशन होऊ नये म्हणून पाणी, इलेक्ट्राल आणि नीरा होतेच.

हे भारीये.. प्रॉब्लेम शोधून स्वतः निर्मूलन केलेत. __/\__

पिलीयन रायडर's picture

27 Feb 2017 - 9:02 pm | पिलीयन रायडर

म्हणुन होते का डोकेदुखी? मला नेहमीच हा त्रास होतो. अत्यंत धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल.

आशिष काळे's picture

27 Feb 2017 - 8:48 pm | आशिष काळे

आज ऑफिस ला नव्हतो गेलो त्यामुळे संध्याकाळी चांदणी चौक सायकल फेरी केली ३० कि मी