असं म्हणतात की ब्रम्हकमळ वर्षात फक्त एकदाच फुलते. पण आमच्याकडे मागच्यावर्षी पावसाळ्यात ५ ते ६ वेळा ब्रम्हकमळ फुलले. एकूण २७
फुले आली. हे त्याचे काही फोटो.
From Untitled Album
From Untitled Album
From Untitled Album
From Untitled Album
From Untitled Album
From Untitled Album
From Untitled Album
From Untitled Album
From Untitled Album
From Untitled Album
प्रतिक्रिया
12 Feb 2009 - 1:03 pm | सागर
सुंदर छायाचित्रे आहेत रश्मीजी
माझ्या (ऐकीव) माहितीप्रमाणे ब्रह्मकमळाच्या रोपाला १२ वर्षांतून एकदा फुले येतात. फुले आली की ती रात्री उमलतात....
अर्थात या नियमाला अपवाद मी पण पाहिले आहे. खरे खोटे माहित नाही...
आमच्याही घरी ब्रह्मकमळ होते. त्याला ५ वर्षात २ वेळा फुले आलेली मी पाहिले आहे.
असो... पण तुमच्या ब्रह्मकमळाला छान फुले आलेली आहेत रश्मीजी....
- सागर
13 Feb 2009 - 11:42 am | घाशीराम कोतवाल १.२
फोटु मस्त आहेत
खुप सुरेख आहेत तुमच्या कडे ब्रम्हकमळ नेहमी येते का हो
खरच एकदम एव्हडी फुले आश्चर्य आहे हो हे
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
12 Feb 2009 - 1:44 pm | शाल्मली
ब्रम्हकमळाचे फोटो छानच आहेत.
असं म्हणतात की ब्रम्हकमळ वर्षात फक्त एकदाच फुलते.
याचा अर्थ केवळ एकच फूल येते असे नाही. तर ही फुले वर्षातून एकदाच म्हणजे फक्त श्रावणातच फुलतात. या काळात एकाच रोपाला अनेक फुले येऊ शकतात.
--शाल्मली.
12 Feb 2009 - 5:28 pm | रश्मी
तुमच्या प्रतिक्रियेबद्ध् ल धन्यवाद. आमच्या घरी ही फुले जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर आणि डिसेंबर मध्ये सुद्धा आलेली आहेत्.एका वेळेस १०,१५ आणि १७ फुले आली होती.
12 Feb 2009 - 2:00 pm | राघव
सुंदर फोटू!
ऐकीव माहीती बरीच आहे. पण खात्रीदायक नाही म्हणून उपयोग नाही!! :)
मुमु़क्षु
12 Feb 2009 - 2:19 pm | मनीषा
सगळेच फोटो सुरेख आहेत...
18 Feb 2009 - 1:19 pm | वासुनाना आले
असेच म्हणतो
सगळेच फोटो सुरेख आहेत...
12 Feb 2009 - 2:42 pm | आपला अभिजित
सुंदर छायाचित्रे आहेत रश्मीजी
असेच म्हणतो!!
12 Feb 2009 - 5:33 pm | दशानन
सुंदर फोटो :)
आज प्रथमच पाहीले हे ब्रम्हकमळ !
अत्यंत आभारी आहे आपला मी !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
12 Feb 2009 - 7:56 pm | प्राजु
मस्तच आहेत.
पाण्यात न उमलणारं (जमिनिवरच उमलणारं) आणखी एक कमळ..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Feb 2009 - 9:29 pm | सूर्य
फोटो छान आहेत.
- सूर्य.
12 Feb 2009 - 9:55 pm | मीनल
फोटो छान आहेत.
ह्या फूलाचा वास खूप छान असतो.
मीनल.
12 Feb 2009 - 11:30 pm | रेवती
फोटू मस्तच!
माझ्या आजोळी ब्रम्हकमळं फुलायची.
कधीही, कितीही आणि केंव्हाही......
रेवती
17 Feb 2009 - 5:06 am | अन्तूबर्वा
8| कधीही, कितीही, केव्हाही! रागावू नका - पण आपले आजोळ उल्हासनगरचे का हो?
17 Feb 2009 - 8:44 am | दशानन
मेड by U S A
=))
लै भारी !
U S A = उल्लासनगर सिंधी असो.
13 Feb 2009 - 2:12 am | शंकरराव
ब्रम्हकमळं सुरेख दिसतात, ह्या फुलांना मस्त मंद सुवास असतो.
फोटो टाकल्या बद्दल धन्यवाद
मिपावर क्रुष्णकमळं नंतर आता.. ब्रम्हकमळं ... आणखी
ईतर कमळां च्या शोधात ...
शंकरराव कमळाकर
13 Feb 2009 - 3:13 am | विसोबा खेचर
चित्र लै भारी!
आपला,
(मोगरा आणि गुलाब प्रेमी) तात्या नेहरू! :)
13 Feb 2009 - 3:39 am | बहुगुणी
या फुलाविषयी आणखी शास्त्रीय माहिती मिळावी म्हणून शोध घेतला तर इथे काही उपयुक्त माहिती मिळाली. तिथला, हे फूल रात्रीच्या काही तासांतच कसं उमलून कोमेजतं त्याचा, time lapse (मराठी प्रतिशब्द?) चलःचित्रपट पहाण्यासारखा आहे.
13 Feb 2009 - 7:43 am | अबोलि
फारच सुरेख! फुले येताना काहि आवाज येतो हे खरे आहे का? मला काहि लोक्कानि शपथेवर सन्गितले???
13 Feb 2009 - 11:45 am | रश्मी
तुमच्या प्रतिक्रियेबद्ध् ल धन्यवाद. नाही अजुन तरी काहि आवाज ऐकायला नाही. कारण आमच्याकडे दरवर्षी भरपुर फुले येतात.पण आवाज कधिच जाणवला नाही.
13 Feb 2009 - 11:51 am | घाशीराम कोतवाल १.२
कारण आमच्याकडे दरवर्षी भरपुर फुले येतात.
अहो आश्चर्यम दरवर्षी भरपुर फुले येतात
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
13 Feb 2009 - 9:00 am | राघव
हे कमळ दिसतं अप्रतीम त्यात काही वादच नाही.
पण ही माहिती ब्रह्मकमळाबद्दल काही वेगळंच सांगते.
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Brahma%20Kamal.html
http://en.wikipedia.org/wiki/Saussurea_obvallata
गोंधळ झाला म्हणून दिले, इतकेच.
मुमुक्षु
13 Feb 2009 - 6:58 pm | बहुगुणी
...पण मी वर दिलेली विकिपेडियावरचीच लिंक वर चर्चेत असलेल्या फुलाबद्दलच माहिती देते:
http://en.wikipedia.org/wiki/Selenicereus_grandiflorus
या दोन फुलांचं वनस्पतिशास्त्रातील वर्गीकरण वेगवेगळं आहे:
या चर्चेतील ब्रम्ह्कमळः
Order: Caryophyllales
Family: Cactaceae
Subfamily: Cactoideae
Tribe: Hylocereeae
Genus: Selenicereus
Species: S. grandiflorus
आपण (मुमुक्षु) म्हणता ते ब्रम्हकमळः
Order: Asterales
Family: Asteraceae
Tribe: Cynareae
Genus: Saussurea
Species: S. obvallata
पण मुमुक्षुंच्या ;-) ब्रम्हकमळाच्या सन्मानार्थ भारत सरकारच्या पोस्ट खात्याने स्टँप काढला आहे याचा अर्थ ते खरं ब्रम्ह्कमळ असावं का?
16 Feb 2009 - 12:27 pm | राघव
पण मुमुक्षुंच्या ब्रम्हकमळाच्या सन्मानार्थ भारत सरकारच्या पोस्ट खात्याने स्टँप काढला आहे याचा अर्थ ते खरं ब्रम्ह्कमळ असावं का?
मला नाही वाटत की फक्त एवढे कारण पुरेसे ठरावे ;)
ब्रह्मकमळाचा उल्लेख महाभारतात आढळतो. पण तोही केवळ हिमालयातच असल्याचा उल्लेख येतो.
आत्ताही कुणी हिमालयात गेलेत तर ब्रह्मकमळाचे फोटू तरी विकत घ्यायला मिळतातच (इथेही मिळत असतील, माहिती नाही), पण तेही
Order: Asterales
Family: Asteraceae
Tribe: Cynareae
Genus: Saussurea
Species: S. obvallata
याच फुलाचे (??) मिळतात.
काही नीटसे समजत नाही म्हणून गोंधळ आहे.
'गोंधळ'लेला मुमुक्षु
14 Feb 2009 - 1:59 am | मदनबाण
छान फोटो...
आमच्या घरी हे झाड आधी होत.. पानातुन दुसरे पान येणार हे झाड!!! बरेच वर्ष वाट पाहिली पण फुल काही आले नाही मग एक दिवस अचानक एक मस्त कळी आली ..पण... ते फुललेल पहायला मिळाल नाही !!! :(
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
14 Feb 2009 - 8:24 am | रश्मी
ब्रह्मकमळाबद्दल अधिक माहिती या लेखात वाचायला मिळेल. http://www.loksatta.com/daily/20080927/ch15.htm
16 Feb 2009 - 8:43 am | सुप्रिया
फोटो मस्तच आहेत. या फुलांना म्हणे चंदनासारखा वास येतो. खरं आहे का?
20 Feb 2009 - 12:45 pm | रश्मी
हो या फुलांना थोडा फार चंदनासारखा सुगंध येतो. जसा काळोख पडू लागतो तशी ही फुले फुलायला लागतात आणि सुगंध दरवळायला लागतो.
17 Feb 2009 - 6:25 am | केदार_जपान
अतिशय सुंदर फुल आणि त्याचे फोटो ही मस्त आले आहेत..
या फुलाचा सुगंध ही खूप छान असतो..
------------------------------
केदार जोशी
17 Feb 2009 - 11:55 am | जागु
छान फोटो आहेत. आमच्याकडे पण आहे ब्रम्हकमळाचे झाड. आमच्याकडेही वर्षातुन ३ ते चार वेळा फुल येतात आणि एकदाच १० ते १२ येतात.
मला वाटत खर ब्रम्ह कमळ वेगळ असाव जे वर्षातुन एकदाच फुलत.