एक निर्णय (भाग 6) शेवटचा

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
26 Jan 2017 - 10:13 am

एक निर्णय भाग 1

एक निर्णय भाग 2

एक निर्णय भाग 3

एक निर्णय भाग 4

एक निर्णय भाग 5

भाग ६

एकदिवस ती नेहमीप्रमाणे घरी आली, पण घर बंद होते. डायनिंग टेबलावर परत एकदा चिठ्ठी होती... 'उशीर होईल. वाट बघू नये.' ती तशी चिठ्ठी बघून मीनाक्षी अस्वस्थ झाली.तिला प्रशांत हवा होता. पण सध्या तरी मुल होऊ देण्याइतकी तिच्या मनाची तयारी नव्हती. त्यामुळे ती एका ओळीची चिठ्ठी बघून तिला आत खोल कुठेतरी काहीतरी टोचल होत. आणि मग त्यादिवशी मात्र तिचा बांध फुटला. खूप खूप रडली मिनाक्षी. तिला हे देखिल कळत नव्हत की ती का रडत होती. रडून दमलेली मीनाक्षी मग तशीच न जेवता झोपुन गेली. सकाळी उशिराच जाग आली तिला. प्रशांत घरात दिसत नव्हता. तिने स्वतःचा चहा करून घेतला आणि पेपर उघडला. दुसऱ्याच पानावरची बातमी वाचून मिनाक्षीला मोठ्ठा धक्का बसला. एका नविन नाटकाचा शुभारंभ झाला होता... आणि नाटकाच्या डायरेक्टरच नाव डॉ. प्रशांत प्रधान होत. प्रशांतच्या स्तुतीने रकानेच्या रकाने भरले होते. M. D. सर्जन असणा-या प्रशांतच्या 'सर्जनशीलतेचे' खूप कौतुक केले होते.

मिनाक्षीने प्रशांतला फोन लावला. पण त्याने उचलला नाही. 'म्हणजे गेले काही दिवस तो रात्र रात्र नाटकाचा अभ्यास करत होता तर!' तिच्या मनात विचार आला. तिला खूप असहाय्य, हताश वाटायला लागल. भयंकर राग आला... पण नक्की कोणाचा राग आला आहे हे मात्र तिला समजत नव्हतं. स्वतःचा... की प्रशांतचा... की एकूण परिस्थितीचा! तिने तशीच स्वतःची आवरा-आवर केली आणि ती हॉस्पिटलमधे गेली. दिवसभर लोक तिला भेटून तिच्याकडे प्रशांतच कौतुक करत होते आणि त्याच्यासाठी अभिनंदनाचा निरोप देत होते. का कोण जाणे... पण तिला तेसर्व आवडत नव्हतं.

ती त्यादिवशी कधी नव्हे ते हॉस्पिटलमधुन लवकर निघाली. मिनाक्षी घरी पोहोचली. प्रशांतने तिचे हसत-हसत स्वागत केले. "कस वाटल सरप्राइज?" त्याने तिला विचारल.

त्याच्या त्या प्रश्नाने ती भलतीच चवताळली. "सरप्राइज? मूर्खपणा आहे हा. अरे प्रशांत तू डॉक्टर आहेस. एक नावाजलेला डॉक्टर! हा काय खुळचटपणा लावला आहेस? हे अस अचानक नाटकाच्या डायरेक्शनच काय सुचल तुला? आणि मला अजिब्बात कल्पना दिली नाहीस? मी तुझी कोणी आहे की नाही? आज अचानक न्यूज़ पेपर मधून मला समजल. कमाल करतोस तू. दिवसभर लोकांना तोंड देऊन कंटाळले आहे. हे अस परस्पर कस करू शकलास तू?" मीनाक्षी चिडून प्रशांतवर ओरडत होती. तिच तिला भान नव्हतं.

प्रशांतने तिचा हात धरून तिला बसवल आणि शांतपणे विचारल,"मीनाक्षी तुला नक्की कसला राग आला आहे? मी तुला न सांगितल्याचा? की मी नाटक डायरेक्ट केल त्याचा?"

"मला तुझाच राग आला आहे. मला काय खेळण समजतोस का? तुझ्या आयुष्यात काय चालल आहे हे तू आता मला सांगणारही नाहीस का? मला न्यूज़ पेपर्स मधून आणि लोकांकडूनच जर तुझ्याबद्दल समजणार असेल तर मग आपण एकत्र का राहायच प्रशांत? Its better we separate. Even otherwise i have realized that my way of life and your way of life is different. Let's get divorced prashant." एवढ़ बोलून त्याच्या हातातला हात झटका देऊन सोडवून मीनाक्षी बेडरूममधे गेली. तिने रागाच्या भरात स्वतः ची बॅग भरली आणि तशीच उलट पावली ती तिच्या आई-वडिलांकडे निघुन गेली. प्रशांत अवाक् होऊन सर्व बघत बसला.

त्यानंतर अगदीच अनपेक्षित घटना घडत गेल्या. अगदी अचानक! मिनाक्षीने डिवोर्स फ़ाइल केला. प्रशांतला नोटिस आली तेव्हा तर तो चक्रावून गेला. थोड़ तिच्या मनाविरुद्ध झाल आहे म्हणून चिडली आहे, असच त्याच मत होत. शांत झाली की येईल घरी अस त्याच मत होत. तिला थोडा वेळ दिला पाहिजे, असा विचार करून तो तिच्या मागे गेला नव्हता. पण ती गेल्याच्या आठवद्याभरात एकदम डिवोर्स नोटिस बघुन तो हड़बड़ला. घाईघाईने तिच्या आई-वडिलांच्या घरी त्याच्या लाडक्या मिनुला समजावायला तो गेला. पण मिनाक्षीने भेटायला स्पष्ट नकार दिला. प्रशांत सतत तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होता. तिला गाठून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता. त्याला खात्री होती की जर तो त्याच्या लाडक्या मिनुशी बोलला तर सगळं परत ठीक होणार होत. पण मीनाक्षी त्याच्यासमोर एकटीने एकदाही आली नाही. आणि त्यानंतर होणा-या प्रत्येक councelling सेशनमधे देखिल ती काहीच बोलायची नाही. "आमच जमत नाही आणि जमणार ही नाही. त्याचे आयुष्य जगण्याचे विचार आणि माझे विचार वेगळे आहेत.." एवढ़च आणि इतकंच ती कायम म्हणायची. प्रशांतने सुरवातीला तिला समजावण्याचा खूप पर्यंत देखील केला. पण तिने तिचा निर्णय घेतला आहे हे त्याच्या लक्षात आल आणि मग मात्र त्याने फार ताणल नाही.

मुळात मीनाक्षीने घेतलेला निर्णय तो कायमच मान्य करत आला होता. फक्त एकदाच त्याने स्वतःचा असा वेगळा निर्णय घेतला होता. नाट्य दिग्दर्शनाचा! तेही स्वतःच्या मनाच एकून. पण त्यामुळे त्याची मिनू त्याच्यापासून दूर गेली होती. मनातून तो खूप निराश झाला होता. दुखावला गेला होता. आता परत त्याला तिला दुखवायचं नव्हत. ती म्हणेल ते मान्य करायचं त्याने ठरवलं होत. त्यामुळे याही वेळी त्याने तेच केल. म्यूच्यूअल अक्ससेप्टन्स मुळे त्यांचा डिवोर्स पटकन झाला. मीनाक्षी फ़क्त एकदाच घरी आली होती; तिच सामान घ्यायला आणि ते ही तिचे वकील घेऊन. त्याचवेळी त्याला समजल की तिला त्याच्याशी काहीच बोलायची इच्छा नाही. मग त्यानेदेखील काही प्रयत्न केला नाही. ती तिच्या वस्तू गोळा करत होती आणि तो एका बाजूला बसून शांतपणे तिच्या हालचाली बघत होता. तिने तिच्या सगळ्या गोष्टी अगदी आठवणीने गोळा करून नेल्या. त्याला त्याच्या आठवणींमध्ये जपून ठेवता येईल अस काहीही तिने तिथे ठेवल नाही. निघताना बाय देखील म्हणाली नाही ती.

त्यानंतर मात्र ती कायमची पुण्याला शिफ्ट झाली. हे देखिल त्याला दुसरी कडून कळलं होतं. तिने आयुष्यात काय निर्णय घेतला आहे, किंवा काय करणार आहे याचा प्रशांतला थांगपत्ताही लागू न देता ती त्याच्या शहरातून आणि आयुष्यातून कायमची निघून गेली.

............12 वर्ष.... एक तप! आयुष्याची अनेक वळणं त्यानंतर प्रशांतने बघितली! त्याने उत्तम चालणारी डॉक्टरी सोडली. काही दिवस तो काही न करता बसून होता. पण मग त्याचा उपजत स्वभाव त्याच्या मदतीला आला आणि त्याने नाट्य दिग्दर्शनाला सुरवात केली. हळूहळू त्याने नाट्य-सिने क्षेत्रात खूप नाव कमावल. नंतर त्याने लग्न देखील केल. आणि त्याला दोन जूळी मूलं देखील होती. अर्थात मीनाक्षी शहर सोडून गेल्या नंतर त्याने कधीही मिनाक्षीची चौकशी केली नव्हती. त्यामुळे ती आता काय करते ते त्याला माहीत नव्हत.

आणि आज समोर उभी असलेली मीनाक्षी! थोड़े केस पांढरे झाले होते आणि चष्मा लागला होता इतकेच. बाकी तिच्यात काहीच बदल नव्हता. तशीच ताठ.... आत्मविश्वासाने भरलेली नजर!

"हाय! कशी आहेस.... अं! मीनाक्षी?" प्रशांतने विचारले.

"अरे? प्रशांत तू? मस्त दिसतोस की! मी मजेत..." मिनाक्षीने हसत उत्तर दिल.

दोघांचीही परिस्थिति अवघडल्यासारखी झाली होती. बारा वर्षानंतर दोघे भेटत होते. ते ही शाळेच्या दहावीच गेटटूगेदर ठरल होत... वर्गाच पंचविसाव्या वर्षातील पदार्पण... म्हणून. प्रशांतचा पूर्ण पुढाकार त्यात नक्की असणार याची मीनाक्षीला कल्पना होती. 'आयुष्याची बारा वर्षे सतत एकत्र काढल्यानंतर पुढची बारा वर्षे एकमेकांचे तोंडही न बघणे... काय ही नाशिबाची चेष्टा होती.' प्रशांतच्या मनात आल.

गेट टुगेदर छान झाल. प्रत्येकाने आपण आता काय करतो आहोत ते सांगितल. मिनाक्षीने फ़क्त पुण्याला असते आणि डॉक्टर असल्याने तेच काम करते; असे हसत सांगितले.

अनेकांना प्रशांत-मीनाक्षी आता एकत्र नाहीत ते माहीत होत. प्रशांत सेलिब्रिटी होता. त्यामुळे त्याच्याबद्धल कायम लिहून यायच कुठे ना कुठे. त्यामुळे समंजसपणे कोणीच काहीही विचारल नाही. कार्यक्रमच्या शेवटी जेवण होत. हळू हळू एक एक जण जेवायला उठले. प्रशांत मीनाक्षी जवळ आला.

"जेवलीस?" त्याने विचारले.

"नाही रे... जेवेन." ती म्हणाली.

"आजच परत जाणार का पुण्याला?"

"नाही. रहाणार आहे. हॉटेल बुक केल आहे."

"अग कमाल करतेस. घरी का नाही आलीस? आई-बाबा कुठे आहेत?" "अरे त्यांना देखिल मी पुण्याला घेऊन गेले." तिने उत्तर दिले. "ओह! पण आता तुझं ते हॉटेल वगैरे काही नाही... तू आपल्या घरी चल." प्रशांत म्हणाला.

"प्रशांत... आपल्या घरी?" मीनाक्षी त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. आणि तो एकदम शांत झाला. आपण अचानक काहीतरीच बोलून गेलो याची त्याला जाणीव झाली. तो एकदम मूक झाला.

त्याला शात झालेला बघून मीनाक्षी हसत म्हणाली,"बर... मला हॉटेल वर सोडशील का?" आणि तो लगेच हो म्हणाला. कार्यक्रम आटपला. सगळे एक-एक करून निघाले. तसे प्रशांत आणि मीनाक्षी देखिल निघाले. गाडीत दोघेही शांत होते. हॉटेल आल. मिनाक्षीने प्रशांतकड़े वळून विचारल,"कॉफ़ी घेऊया? वेळ आहे तुला?"

"हो..." घड्याळाकडे नजर टाकत तो म्हणाला.

दोघेही हॉटेलच्या कॉफ़ी शॉप मधे आले. एका कोप-यातल्या टेबलवर बसले.

प्रशांत थोड़ा गोंधळला होता. त्याला मनातून खरं तर खूप काही बोलायचं होत. पण काय आणि कसं बोलावं; कुठून सुरवात करावी ते कळत नव्हत. मीनाक्षी काही वेळ शांत होती. ती त्याचं निरीक्षण करत होती. मंदपणे हसत तिने प्रशांतला हाक मारली.

"प्रशांत.."

"ह?"

"कसा आहेस तू?"

"मिनु..." जणूकाही तिच्या या प्रश्नाची वाट बघत असल्यासारखा प्रशांत एकदम म्हणाला. मग मात्र स्वतःला सावरून म्हणाला,"I mean... मीनाक्षी... खर सांगू? मी खूप समाधानी आहे ग. आपण वेगळे झाल्यानंतर अनेक महिने मी दु:खात होतो. कोणाला भेटत नव्हतो... कोणाशीही बोलत नव्हतो.... पण मग कधीतरी परत एकदा एका नाटकाच्या दिग्दर्शनाची ऑफर आली. मी इच्छा नसूनही ते काम घेतल आणि जणूकाही माझ जगच बदलून गेल. मग मात्र मी कधी मागे वळून नाही ग बघितल. मी तुझ्यात खूप गुंतलो होतो. तुझी सवय होती मला. आयुष्यात तू निर्णय घेणार आणि मी तुझ्याबरोबर चालणार; असाच मला कायम वाटत होत. पण अचानक हे सगळ बदलल. तू बदलवलस. मी एकटा पडलो. पण हळूहळू माझ्या लक्षात आल की रडत आणि दु:ख करत जगण हे आयुष्य नाही. म्हणून मग मी माझ्यासमोर जे आयुष्य आल ते हसत स्वीकारलं. खरच! आज तू समोर आलीस आणि आपण एकत्र घालवलेला काळ एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यासमोर उभा राहिला एवढच. नाहीतर मी डॉक्टरी शिकलो आहे आणि आता प्रक्टिस करत नाही याच मला कधीच दु:ख झाल नाही." प्रशांत अपराधी आवाजात म्हणाला.

मीनाक्षी शांतपणे प्रशांतच बोलण ऐकत होती. तिने प्रशांतच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, "प्रशांत तू अपराधी वाटून घेऊ नकोस. खर सांगू? मी कायम तुझ्याबद्धल वाचत असते. पण केवळ तू कसा आहेस ते समजाव म्हणून. मला तुझ्या इंटरव्यूज मधून जाणवत की आपल्यात जे घडून गेल आहे त्याबद्दल तू कुठेतरी स्वतः ला अजूनही दोष देतोस. अस आहे का प्रशांत?" मिनाक्षीने त्याला विचारल.

"हो मिनु. मी खरच तुझ्यावर खूप प्रेम केल होत. कुठे आणि काय चुकल मला कळलच नाही. तुझ्यासारखी समंजस, विचारी मुलगी; जिने आयुष्यभर सगळ कस विचारपूर्वक केल; इतक्या तड़का-फड़की असा टोकाचा निर्णय घेईल अस कधी वाटल नव्हतं ग. तू तर एक घाव आणि दोन तुकड़े अस केलस. मी किती भेटायचा प्रयत्न केला तुला. पण तू कधीच भेटली नाहीस मला एकदा घर सोडून गेल्यावर." प्रशांत म्हणाला.

"प्रशांत... मला मान्य आहे की मी जे केल ते त्यावेळी योग्य नव्हतं. त्यावेळी मी तुला काहीच न सांगता निर्णय घेतला. जसा कायम मी आपल्या दोघांसाठी घेत आले तसाच. त्यावेळी मी तुला भेटले नाही किंवा असा निर्णय का घेते आहे ते देखील सांगितले नाही. कारण त्यावेळी मी तुला भेटले असते तर तू माझं ऐकूनच घेतलं नसतसं. मात्र आज तू समजू शकशील माझा निर्णय. म्हणून मी तुला माझ्या त्या निर्णयाच कारण सांगते... जेव्हा नाटकाचा डायरेक्टर म्हणून तुझ नाव मी पेपरमधे वाचल तेव्हा त्याक्षणी मला खूप राग आला. मला न सांगता... माझ मत विचारात न घेता... तू आयुष्यात पहिल्यांदाच एक वेगळ पाऊल उचलल होतस. त्यावेळी मला तो माझा अपमान वाटला. मी तशीच घर सोडून गेले. पण मग आईकडे गेल्यावर आणि मन शांत झाल्यावर माझ्या लक्षात आल की डायरेक्शन हा तुझा स्वतः चा चॉइस होता. आयुष्यात पहिल्यांदाच तू स्वतःच्या मनाने एक निर्णय घेतला होतास. तोवर मीच दोघांच्या आयुष्याचे निर्णय घेत आले होते. कदाचित् आपण एकत्र राहिलो असतो तर तू तुला आवडणाऱ्या या क्षेत्राचा विचारही केला नसतास. कदाचित् आपण कायम भांडत... एकमेकांना दुखवत एकत्र राहिलो असतो. प्रशांत... मला न टिपिकल संसार करायची फारशी इच्छाच नव्हती. तुझ्यापासून दूर झाले आणि तुझा आणि माझा असा वेगळा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आल की तू फ़क्त माझ्यावर प्रेम करत होतास. आणि मी मात्र कायम माझ्या करियरचा विचार केला होता. तू हुशार होतास आणि माझ एकायचास म्हणून मी माझ्या बरोबर तुझे देखिल निर्णय घेत होते; इतकंच. मला देखील त्याची सवय झाली होती. मुळात मला संसार करायची इच्छा नाही आणि तुला मात्र हे सगळच मनापासून हव आहे; जेव्हा हे लक्षात आल तेव्हा मग मी निर्णय घेतला की आपण वेगळ होण दोघांसाठी योग्य आहे.

आणि बघ न... आज तू तुला आवडत ते करतो आहेस. अगदी मनापासून! खूप यशस्वी आहेस. लग्न केल आहेस. छान गोंड्स मूलं आहेत. सुखी आहेस. याचा मला खूप खूप आनंद आहे. आणि एक गोष्ट; अगदी प्रामाणिकपणे सांगते... मी पण खूप सुखी आहे. पूना मेडिकल कॉलेजची डीन आहे. कॉलेज मध्ये शिकवते आहे, अवघड ऑपरेशनस एक चालेंज म्हणून करते आहे. यासगळ्याच जे कौतुक होत ते मनापासून एन्जोय करते आहे. मला जे हव होत ते मी मिळवल आहे.

मग का उगाच भूतकाळाच् ओझ मनावर बाळगायच? प्रशांत खरच असाच पूर्णत्वाने जग. आपण दोस्त होतो. आणि राहु. असच कधीतरी भेटु. एखादी कॉफ़ी घेऊ... आणि आपण स्वतः च्या मनाने निवडलेल आयुष्य परिपूर्णपणे जगु. हो न?" मिनाक्षी बोलायची थांबली.

प्रशांतला तिच म्हणण अगदी पटल. अगदी पूर्वी देखील जस ती जे म्हणायची ते पटायचं तस; आणि ते मनात येऊन तो मनापासून हसला. दोघेही उठले. एकमेकांना शेक हॅंड केल. मीनाक्षीने त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि मागे वळून चालू लागली. आत्माविशावासाने आणि शांतपणे जाणाऱ्या मिनाक्शीकडे बघून प्रशांतला खूप बर वाटल. आज त्याला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली होती. मीनाक्षीच्या पाठमोऱ्या व्यक्तिमत्वाकडे बघताना तो भारावून गेला आणि शांत मनाने त्याच्या घराकडे निघाला.

समाप्त

-----------------------------------------------------------

कथा

प्रतिक्रिया

शलभ's picture

26 Jan 2017 - 10:22 am | शलभ

आवडली कथा..

तुमची लिहायची पद्धत छान आहे पण केवळ नाट्य दिग्दर्शन केले म्हणून लगेच कोणी डिवोर्स मागेल हे पटत नाही.
एकमेकांनी आपापली आवड (पॅशन) जोपासण्यासाठी वेगळे व्हावे लागते असे थोडेच आहे? :)
आणि टिपिकल संसार काय असतो वा नसतो?
.
.
.
पण तरीही, तुम्ही मालिकांसाठी लिहू शकाल खरेच. राजवाडेंसारखे लोक तुमच्या ओळखीत आहेत, तर मग त्या दृष्टीने प्रयत्न करु शकाल का ह्याचा जरुर विचार करा :)

आवडीच्या क्षेत्रात काम करताना परस्परांच्या प्रगतीच्या आड येउ नये, आपापली
ध्येये मिळवताना संसारातल्या तडजोडीचा कामावर परीणाम होउ नये म्हणुन वेगळे व्हायचा निर्णय घेतला आहे.

१२ वर्षांनंतर दोघेही आपापल्या क्षेत्रात यशस्वी, समाधानी व सुखी असणे हेच तो निर्णय कीती बरोबर होता ते सांगते.

ते समजले हो नेत्रेश. तरीही हे असे निर्णय म्हणजे शेंबूड येतो म्हणून नाक कापल्यासारखे होतील.

नेत्रेश's picture

26 Jan 2017 - 2:15 pm | नेत्रेश

' शेंबूड येतो म्हणून नाक कापल्यासारखे ' .... हे भारीच :)

ज्योति अळवणी's picture

26 Jan 2017 - 4:37 pm | ज्योति अळवणी

यशोधराजी,
मिनाक्षीच्या थोडं उशिरा लक्षात आलं की तिचं प्रेम फक्त तिने लहानपणापासून ठरवलेल्या तिच्या करियरवर आहे. मग तरीही आयुष्यभर एकमेकांना दूषणं देत जगण्यापेक्षा आपापल्या परीने पूर्ण आयुष्य जगलेलं चांगलं, असा विचार जर तिने केला तर त्यात तिचं काही चुकतं आहे असं मला तरी वाटत नाही. आणि अर्थात पुढच्या 12 वर्षात ते सिद्ध देखील झालेलं आहे. मग मन मारत केवळ लग्न केलंच आहे म्हणून ते निभावण्यापेक्षा वेगळा विचार करणारी मिनाक्षी मला शेंबुड येतो म्हणून नाक कापण्याइतक्या उथळ विचारांची नाही वाटत.

अर्थात प्रत्येक व्यक्तिचा आपापला दृष्टिकोन असू शकतो. आणि तुम्हाला मिनाक्षीचं वागणं चुकीचं वाटू शकतं.

अर्थात प्रत्येक व्यक्तिचा आपापला दृष्टिकोन असू शकतो.

नक्कीच! त्याबद्दल काहीच दुमत नाही. आणि वाचक म्हणून मला कथेत काय खटकले हे मी सांगितले आहे. :)

मराठी कथालेखक's picture

27 Jan 2017 - 12:08 am | मराठी कथालेखक

त्याने डायरेक्शन केलं म्हणून तिने डिव्होर्स मागितला असं साधं सरळ नाहीये ते.
त्याला घर-संसार म्हणजे आपल्याला वेळ देणारी पत्नी, मुले, पती आणि मुलांच्या कौतुकात रमणारी पत्नी असं काहीसं हवं होतं ..त्यावेळी तो फक्त तिच्यासोबत आयुष्य रेटत होता, एक अपुर्णत्व होतं त्याच्या आयुष्यात. हे तिने जाणलं आणि डिव्होर्स मागितला. 'डायरेक्शन' हे तात्कालिक कारण होतं.
आणि दूसरं असं की तिच्या मनात जे काही होतं ते ती स्पष्टपणे बोलली नाही याचं कारण असं असावं की 'मी तुझ्या मनातल्या संसाराच्या कल्पना /स्वप्न पुर्ण करु शकत नाही, कारण माझं तुझ्यापेक्षा करिअरवर जास्त प्रेम आहे' असं प्रांजळपणे कबूल करण्यास त्यावेळचा तिचा अहंकार आड आला. त्यापेक्षा त्याला अपराधी बनवणं तिला सोयिस्कर वाटलं. पण पुढे त्याने अनेक वर्षे ते ओझं बाळगलेलं पाहून तिला कदाचित वाईट वाटलं आणि तिने त्याच्या मनावरील ते ओझं अलगद दूर केलं
मला तरी कथा आवडली आणि पटली. आयुष्यात असं होतं अनेकदा, माणूस एखादा निर्णय घेताना अपराधी भावना झटकून दूसर्‍यावर दोष ढकलू पहातो. नात्यात स्वतःच्या चूका /कमीपणा मान्य करणं अनेकांना जमत नाही , त्या उलट ते स्वतःच्याच त्यागाचे ढोल बडवतात.

नेत्रेश's picture

26 Jan 2017 - 1:33 pm | नेत्रेश

ज्योतीमॅडम, कथा आवडली बरका.

संजय क्षीरसागर's picture

26 Jan 2017 - 10:33 am | संजय क्षीरसागर

ती सध्या काय करते ? मजेत असते !
तो सध्या काय करतो? मजेत असतो !
दोघं सध्या काय करतात ? आपापल्या जीवनात मजेत असतात !!
हा पॅटर्न आवडला.

जगप्रवासी's picture

27 Jan 2017 - 6:22 pm | जगप्रवासी

माझं "पहिलं प्रेम" आता माझी खूप छान मैत्रीण आहे. ना मला तिच्याबद्दल आता तसं काही वाटत ना तिला माझ्याबद्दल. आम्ही दोघेही आपापलं लाईफ मस्त जगतोय. आणि महत्वाचं म्हणजे माझ्या बायकोची आणि तिची छान गट्टी जमलीये, माझ्या बायकोला (माझी कॉलेजपासूनची बेस्ट फ्रेंड) सर्व माहित आहे.

एस's picture

26 Jan 2017 - 11:27 am | एस

छान कथा. आवडली.

पैसा's picture

26 Jan 2017 - 11:36 am | पैसा

असा समंजसपणा क्वचित दिसतो. घटस्फोटाचा निर्णयही शेवट नायिकेनेच दोघांसाठी घेतला असे दिसते आहे! :)

रातराणी's picture

26 Jan 2017 - 11:54 am | रातराणी

सुरेख! कथा आवडली.

योगेश कोकरे's picture

26 Jan 2017 - 3:49 pm | योगेश कोकरे

ती सध्या काय करते ,हा चित्रपट बघतोय असं वाटलं .

संजय पाटिल's picture

26 Jan 2017 - 4:11 pm | संजय पाटिल

आवडली कथा!

ज्योति अळवणी's picture

26 Jan 2017 - 4:39 pm | ज्योति अळवणी

आपल्या सर्वांचेच प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!

लोथार मथायस's picture

26 Jan 2017 - 8:45 pm | लोथार मथायस

कथा आवडली

नहर's picture

27 Jan 2017 - 4:31 pm | नहर

छान कथा

गिरिजा देशपांडे's picture

28 Jan 2017 - 2:18 pm | गिरिजा देशपांडे

खूप छान कथा. आवडली.

शित्रेउमेश's picture

30 Jan 2017 - 9:55 am | शित्रेउमेश

कथा आवडली आणि पटली सुद्धा....
खूपच छान....

एमी's picture

31 Jan 2017 - 7:11 am | एमी

आवडली.

कथानकात तसं फारसं नावीन्य नव्हतं पण शेवटच्या भागात छान कलाटणी दिलीय. हा भाग आणि त्यामुळेच नायिकादेखील आवडली.

माबोवर नुकतीच वाचलेली 'इष्क मुबारक, दर्द मुबारक'देखील अशीच पाचव्या हटके भागामुळे आवडली होती.

रुपी's picture

31 Jan 2017 - 7:30 am | रुपी

कथा छान खुलवली आहे.