८६ वर्षाची एक (तरूण!) आजीबाई आयर्नमॅन स्पर्धेमध्ये भाग घेते आणि यशस्वीरीत्या "आयर्नमॅन" होते..!!
हे वाचून डोक्याला झिणझिण्या आल्या ना..?
बादवे, आयर्नमॅन ट्राएथलॉन म्हणजे ४ किमी पोहायचे, नंतर १८० किमी सायकल चालवायची आणि सर्वात शेवटी एक ४२ किमीची मॅरेथॉन धावायची.
बस्स इतकेच, फक्त हे सगळे १७ तासात पूर्ण करायचेच..!
..तर या आज्जींनी८६ व्या वर्षी आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली.
अरे हो, आणखी एक. हे त्या आजीबाईंचे ४५ वे आयर्नमॅन विजेतेपद होते. म्हणजे या आधी ४४ वेळा "पोहणे + सायकलिंग + मॅरेथॉन" यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.
तसेच यांनी आत्तापर्यंत तब्बल ३२५ वेगवेगळ्या ट्राएथलॉन स्पर्धांचे विजेतेपद मिळवले आहे.
अशा जबरदस्त लोकांपुढे आपण फक्त साष्टांग नमस्कार घालायचा. बस्स..!!
या आहेत सिस्टर मडोना ब्युडर, वय वर्षे ८६. या एक कॅथलीक सिस्टर आहेत.
शरीर, आत्मा आणि मनाशी संवाद साधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून पोहणे, सायकलिंग आणि धावणे हे व्यायामप्रकार यांच्या दैनंदिन वेळापत्रकातला आनंदाचा भाग आहे. या सातत्याचाच परिपाक म्हणजे वयाच्या पन्नाशीनंतर यशस्वीरीत्या जिंकलेल्या ट्राएथलॉन स्पर्धा.
वयाच्या ४८ व्या वर्षानंतर धावणे सुरू केले, त्या दिवसापासून आता ८६व्या वर्षापर्यंतचा हा प्रवास निव्वळ स्वप्नवत आहे. अर्थात हा प्रवासही सोपा नव्हता.
एक दोनदा आयर्नमॅनसाठी वापरल्या जाणार्या खास सुटचा प्रॉब्लेम झाला व स्पर्धा सोडावी लागली.
एकदा सेकंदातल्या शतांश भागाच्या फरकामुळे विजेतेपदाने हुलकावणी दिली.
२०१३ साली बोस्टन मॅरेथॉन दरम्यान या फिनीश लाईन पासून दीडदोन किमी दूर असताना तेथे बाँबस्फोट झाला.
वयाच्या ८२ व्या वर्षी ट्रेनिंग दरम्यान अपघात होवून खुबा फ्रॅक्चर झाला. (मात्र सहाच महिन्यात त्या पुन्हा पुढच्या ट्राएथलॉन साठी सज्ज झाल्या होत्या.)
या सर्व अडचणींना यशस्वीपणे तोंड देवून आणि अडचणींवर मात करून आजीबाईंचा प्रवास सुरूच आहे..!!
अरे हो या आज्जीबाई सिनीयर ऑलिंपीयन सुद्धा आहेत आणि अनेक स्पर्धांमध्ये, विशेषतः आयर्नमॅनमध्ये यांच्या वाढत्या वयानुसार अनेक नवीन "एज-ग्रूप" वाढवावे लागले. तेंव्हापासून यांना सगळेजण "आयर्न-नन" म्हणून ओळखतात.
यांनी स्वत:वर एक पुस्तकही लिहिले आहे.
आणखी एक मानाची गोष्ट म्हणजे २०१६ साली नाईके ने "अनलिमीटेड युथ" नामक एक जाहिरात यांच्यावर चित्रीत केली.
अनलिमीटेड युथ - नाईके.
आणखी एक व्हर्जन.
आणखी थोडी माहिती.
या ग्रेट आजीबाईंना आणखी एकदा शिसान. __/\__
********************************
सर्व माहिती व प्रकाशचित्रे अंतर्जालावरून साभार..!!
हा लेख मुद्दाम लहान ठेवला आहे. या आज्जीबाईंची एकंदर कामगिरी आणि त्याचा आवाका वगैरे गोष्टी शब्दांच्या सहाय्याने व्यक्त करणे हे ही अवघडच आहे.
********************************
प्रतिक्रिया
19 Jan 2017 - 9:03 am | एस
शिरसाष्टांग नमस्कार!
19 Jan 2017 - 9:50 am | संजय क्षीरसागर
पोहोण्याची स्टाईल फार आवडली.
19 Jan 2017 - 9:58 am | खेडूत
छान परिचय!
आजीबाईंना मोठ्ठा नमस्कार! __/\__
19 Jan 2017 - 11:07 am | तुषार काळभोर
__/\__
19 Jan 2017 - 11:51 am | गवि
निव्वळ प्रणिपात. आणखी काय बोलावं?
19 Jan 2017 - 12:05 pm | स्वराजित
__/\__
19 Jan 2017 - 12:31 pm | संजय पाटिल
_/\_
19 Jan 2017 - 1:47 pm | शलभ
खतरनाक __/\__
19 Jan 2017 - 2:22 pm | नि३सोलपुरकर
नमस्कार! __/\__,
मोदक राव ,आजीबाईंचा परिचय करून दिल्याबद्दल खूप आभारी आहे
19 Jan 2017 - 3:21 pm | किरण कुमार
हे त्या आजीबाईंचे ४५ वे आयर्नमॅन विजेतेपद होते... ................/\................
छान माहिती
19 Jan 2017 - 4:26 pm | दीपक११७७
__/\__
19 Jan 2017 - 8:52 pm | अरिंजय
@ मोदक दादा -
त्या आयर्न नन वरुन मला "पवार मामा"ची आठवण झाली. सातारा जिल्ह्यातील वल्ली म्हातारा, मॅरेथॉनपटू. मी साधारण ८ वर्षांपुर्वी त्यांना भेटलो तेंव्हा त्यांचे वय ८० वर्षे. त्यांनी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून मेडल्स जिंकलेली. मी त्यांना बघितले त्यावेळी त्यांच्याकडे ६४ मेडल्स होती & चार वेळा पासपोर्ट रिन्यु केलेला होता. मी दिवसभर त्यांचा फोटो शोधत होतो पण सापडला नाही. कदाचित दुसऱ्या मेमरीकार्ड मध्ये असावा.
सर्व मिपाकरांना नम्र विनंती की कोणाला त्यांच्याबद्दल अधिक
माहिती असल्यास कृपया येथे द्यावी.
22 Jan 2017 - 10:09 am | तुषार काळभोर
फोटो नाही मिळाला,पण या बातम्या मिळाल्या :
टाईम्स ऑफ इंडिया : At 89, this athlete’s on a winning spree
सकाळ : नव्वदीतही धावणारे शंकर नाथा पवार
24 Jan 2017 - 11:01 pm | एस
पवारमामांनाही शि. सा. न. _/\_
20 Jan 2017 - 12:01 pm | देशपांडेमामा
_/\_ __/\__ _/\__
देश
20 Jan 2017 - 12:43 pm | अत्रन्गि पाउस
अशक्यप्राय वाटतंय
20 Jan 2017 - 12:51 pm | वरुण मोहिते
केवळ अविश्वसनीय
20 Jan 2017 - 7:15 pm | झेन
मला आपलं मिलिंद सोमण च कौतूक वाटत होत वय वर्षे ५० असताना आयर्न मॅन. इथे तर सुरुवातच ४८ व्या वर्षी बाबो...!
21 Jan 2017 - 6:35 pm | अनिरुद्ध.वैद्य
साष्टांग नमस्कार ...
23 Jan 2017 - 1:20 am | कवितानागेश
छान ओळख!
24 Jan 2017 - 1:17 am | रुपी
छान परिचय. तुमच्या लेखांमुळे वेगळ्याच घटना, व्यक्तींची माहिती मिळते. धन्यवाद!
काही फोटो दिसत नाहीयेत..
24 Jan 2017 - 7:38 pm | लॉरी टांगटूंगकर
जबरदस्त!
26 Jan 2017 - 8:59 pm | मनिमौ
असे लोक पाहिले की स्वताचा फिटनेस वाढवायची गरज वाटते. छान जमला आहे लेख
27 Jan 2017 - 10:31 am | सुमीत भातखंडे
_/\_
साष्टांग नमस्कार!
31 Jan 2017 - 1:08 pm | मोदक
फोटोचा नक्की काय प्रॉब्लेम होत आहे कळत नाहीये. अल्बमच्या परमिशन्स वगैरे बदलल्या नाहीयेत तरी ३ फोटो दिसत नाहीयेत.
31 Jan 2017 - 1:11 pm | पैसा
भारी!