पिंपरी अशी उंच टेकडीवर उभी राहून पुण्याला साद घालत होती. दुपार टळटळत होती. गिधाडे उडत होती.
पुणं आपलं आभाळाला देणगी देत निवांतपणे पहुडलं होतं. यावेळी कोथरुड जरी दारात आलं असतं तरी पुण्यानं त्याला हुंगलं नसतं. मुळा मुठा नावाच्या समुद्राला भरती आली होती. पाखरे उडत होती.
दूरवरची साद ऐकल्यावर पुण्यानं कूस बदलली. च्यायला काय कटकट आहे. मागं एकदा भोसरी अशीच साद घालायची. त्यावेळीसुद्धा पुणं असंच वैतागलं होतं. मग त्यानं भोसरीची वाटच लावून टाकली.
पण पिंपरीची कथा थोडी वेगळी होती. दम दमा दम रापून निघालेलं ते एक अवखळ सौदर्य होतं. तिचा नाद करायला कुणी एकजण आला होता. तेव्हा तिनं हाडं मोकळी करुन त्याला लांबवर पसरवला होता. तेव्हापासून पिंपरीचा नाद करायला कोणी गेलं तर लोकं त्याला 'हाडपसर' म्हणतात.
भोसरीनं आपलं तोंड काळं करुन घेतलं. जोगतीनी सारखी तिची तऱ्हा. चिंचवडनं सुद्धा तिला आपलं म्हणनं सोडून दिलं. निगडीवर टाकलेला डाव फसल्यावर त्यानं पिंपरीवर आपला मोर्चा वळवला. त्यात पुण्याची साथ लाभेना म्हणून पिंपरी एकटी पडलेली.
आणि अशा कुवेळी पिंपरीवर नजर पडली ती बारामतीची.
बारामती ही बाराची होती. ती कायम बार भरायची. चिंचवडला तिनं नादी लावलं. मग पिंपरीबरोबर त्याचं वाजवून दिलं. भोसरीबरोबर दोस्ती काय केली. हिंजवडीपण येऊन मिळाली. आणि अशाप्रकारे पुण्याला ढुसन्या द्यायला सुरवात झाली.
वेळ काय सांगून येत नाही म्हणतात. पण ती अशी आली की सजली सवरली नटली मुरडली पिंपरी बऱ्याच दिवसांनी त्या टेकडीवर गेली. आभाळाला देणगी देत पुणं निवांतपणे पहुडलं होतं. यावेळी कोथरुड जरी दारात आलं असतं तरी पुण्यानं त्याला हुंगलं नसतं.
पिंपरीनं ते बघितलं आणि तिला अश्रू अनावर झाले.
प्रतिक्रिया
11 Dec 2016 - 2:49 pm | ज्ञानोबाचे पैजार
दुपारी १ ते ४ आम्ही कोणालाही विचारत नाही.
ती आमची हक्काची विश्रांतीची वेळ आहे.
पैजारबुवा,
11 Dec 2016 - 4:00 pm | चांदणे संदीप
पण परिस्थिती याच्या अगदी उलट आहे! शिवाय हिंजवडी पिंचिंत येत नाही! :)
आ. ण.
Sandy
11 Dec 2016 - 6:38 pm | रातराणी
=))
11 Dec 2016 - 7:19 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
बारामतीचा एक गडी येतो आणि कोंदट पेठांत वसलेल्या पुण्याची वाट लावतो यातच पुणेकरांची अक्कल कीती चालते ते कळते.