http://www.misalpav.com/node/5614
आंजर्ले - केळशी च्या या धागावर दिलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. त्याचाच पुढचा भाग आज इथे देत आहे.
दुसर्या दिवशी आम्ही सकाळी लौकरच डॉल्फिन बघायला जाणार होतो.... हर्णे, कर्दे आणि आजुबाजुच्या परिसरात भरपुर डॉल्फिनस बघायला मिळतात. पण त्यासाठी सकाळी लौकर जावं लागतं...आम्ही जिथे थांबलो होतो मुक्कामासाठी त्याच गृहस्थांना आम्ही डॉल्फिन सफारीसाठी बोट ठरवायला सांगितली. सकाळी ७ वाजता आम्हाला हर्णे बंदरावर पोचायचं होतं आणि तिथुन आम्ही पुढे डॉल्फिन सफारीसाठी निघणार होतो.
हर्णे बंदरावरुन काढलेला सुर्योदयाचा फोटो :-
बंदरावरुन काढलेला बोटीचा फोटो : -
आमची बोट आल्यावर आम्ही डॉल्फिन सफारीवर निघालो... काही बोटीतुन काढलेले काही समुद्राचे फोटो :-
हर्णे, कर्दे वगैरे बाजुला भरपुर डॉल्फिनस बघायला मिळतात. समुद्रात बरच आत गेल्यावर आम्हाला डॉल्फिन बघायला मिळाले. त्यांचे खरंतर खुप फोटो काढायची ईच्छा होती पण ते इतके पटकन उड्या मारत पुढे जातात. त्यामुळे खुप प्रयत्न करुनही आम्हाला फक्त एकच फोटो व्यवस्थीत मिळाला.
पुढे आम्ही तिथुन जवळच असलेल्या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर गेलो. या किल्ल्याची खासियत म्हणजे चारही बाजुनी समुद्राचं खारट पाणी असुनही किल्ल्यात ९ गोड्या पाण्याची तळी आहेत. किल्ल्याच्या पुढच्या भागात रॉकी बीच आहे आणि फक्त प्रवेशद्वारापाशी सँड बीच आहे.
किल्ल्यवरुन दिसणार वेव्-कट प्लॅटफॉर्म
किल्ल्यावरुन दिसणारा समुद्र :-
सुवर्ङदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी काढलेला हा फोटो :-
किल्ला बघुन आम्ही हर्णेला यायला निघालो. मार्गावर आम्हाला काही सिगल पक्षी दिसले.
हर्णे बंदरावर काढलेला फोटो :
हर्णे बंदरावरुन आम्ही जिथे मुक्काम केला होता तिथे जाताना काढलेले फोटो. खरंतर असे नारळाच्या झाडांचे फोटो काढल्याशिवाय कोकणवारी पुर्ण नसती झाली.
परतीच्या दिवशी पौर्णिमा होती. आकाशात पुर्ण चंद्र होता. त्यामुळे त्याचा फोटो काढायचा मोह आवरला नाही :-
कोकणाचं सौंदर्य डोळ्यात साठवुन ठेवत आम्ही पुण्याला परत यायला निघालो.
प्रतिक्रिया
12 Feb 2009 - 2:35 pm | आपला अभिजित
सुंदर आहेत फोटो.
शेवटचे नारळी-पोफळींचे जास्त आवडले.
एक सुचवू?? बंदराचे नाव "हर्णै' (दोन मात्रा, एक रफार) असे आहे. "हर्णे' नव्हे.
12 Feb 2009 - 9:04 pm | मन्जिरि
अप्रतिम आताच जावस वा्टतय
12 Feb 2009 - 2:38 pm | आनंदयात्री
दौलत उधळलीये नुसती !! काय काय सुरेख फोटो .. आत्ताच पोचावे वाटतेय तिथे.
खुप खुप सुरेख फोटो.
-
आपलाच
आंद्याथन लिव्हिंगस्टन सीगल
12 Feb 2009 - 2:50 pm | दशानन
हेच म्हणतो !
सुंदर फोटो !
क्या बात है !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
12 Feb 2009 - 9:12 pm | बिपिन कार्यकर्ते
खरंच... पटकन जावंसं वाटतंय... :)
बिपिन कार्यकर्ते
12 Feb 2009 - 3:04 pm | मृगनयनी
मिन्टॅऍऍऍऍऍऍ...
क्लास्स्स्स्स्स्स्स!!!
सिगल पक्षी : अ प्र ति म!!!
ती किल्ल्यापुढची रांगोळी सुपर्ब!!!!!!!
डॉल्फिन, आख्खा / उडता असता, तर क्युट दिसला असता.....
मस्त!!!!!!!! पौर्णिमेचा चंद्र पण छान वाट्टो. अजुन थोडी रात्र होऊ दिली असतीस, तर अधिक तेजस्वी दिसला असता........
बाकी समुद्राचे फोटो लाजवाब!!!!
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
12 Feb 2009 - 3:47 pm | वल्लरी
असेच म्हणते
---वल्लरी
12 Feb 2009 - 3:56 pm | मिंटी
>>डॉल्फिन, आख्खा / उडता असता, तर क्युट दिसला असता.....
खरंचं गं ...... पण ते इतक्या पटकन वर येतात आनि इतक्या पटकन उडी मारुन परत आत जातात ना की ते दिसुन कॅमेर्याचा अअँगल सेट करेपर्यंत वेळच नसतो.
12 Feb 2009 - 3:49 pm | अभिष्टा
मला का फोटो दिसत नाहियेत? त्याजागी फुल्ली दिसतेय :-(
---------------------------------
जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित
हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा
12 Feb 2009 - 4:36 pm | ढ
इथे पहा.
फोटो क्र. १
फोटो क्र २
फोटो क्र ३
फोटो क्र ४
फोटो क्र ५
फोटो क्र ६
फोटो क्र ७
फोटो क्र ८
फोटो क्र ९
फोटो क्र १०
फोटो क्र ११
फोटो क्र १२
फोटो क्र १३
फोटो क्र १४
दिसतात का पहा बरं...
12 Feb 2009 - 3:51 pm | वीपशा
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!
12 Feb 2009 - 4:16 pm | ढ
सर्वच फोटो मस्त आलेत. २-३ दिवस सुट्टी मिळाली की नक्की जाणार!
12 Feb 2009 - 8:21 pm | रेवती
अमृता,
तू नेहमीच सुंदर फोटोंचा खजिना भेत देतेस, त्याबद्दल धन्यवाद!
हे फोटोही झकास !
रेवती
25 Feb 2009 - 11:17 am | मिंटी
धन्यवाद :)
12 Feb 2009 - 8:34 pm | टारझन
झकास ... डॉल्फिण पण .. लै भारी मिंटे ... समदे फोटू एक से एक :)
12 Feb 2009 - 8:43 pm | प्राजु
जबरदस्त फोटो.
हे बघून भारतात जाण्याची इच्छा प्रबळ होते आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Feb 2009 - 8:52 pm | लिखाळ
वा ! फोटो मस्तच आहेत.
गलबताचा छानच आहे..सोनेरी ऊन मस्त दिसतंय.. नरळींचा फोटो सुद्धा मस्त :)
-- लिखाळ.
12 Feb 2009 - 9:26 pm | सूर्य
मस्तच आलेत फोटो. लाटांचा फोटो आणि नारळाच्या झाडांचे फोटो विशेष आवडले.
मग आता पुढची ट्रिप कुठे ?
- सूर्य.
12 Feb 2009 - 11:24 pm | संदीप चित्रे
अमृता...
तुझा तिसरा डोळा चांगला आहे :)
13 Feb 2009 - 2:16 am | विसोबा खेचर
अमृता,
सुंदर कोकणयात्रा घडवलीस! सर्व फोटू सुरेख..!
तात्या.
13 Feb 2009 - 3:43 am | शंकरराव
फोटो मस्त आलेत आमची कोकण वारी झाली.. मजा आली, .
: : सध्या माझां बोड जाग्यावर नाय असां... मधेच उर्दूचां भूत मनांत घुसलांसा...
मी कोकणी माणूस आसंय, वेंगुर्लां माझो गाव...
माका खराटो विकत घेवचो आंसा, ह्या उर्दूचो झाडू बांधूक.....
मराठीचा उतारा पाहीजे असा....
शंकरराव देसाई (५,सावेंची वाडी, वेंगुर्ले)
13 Feb 2009 - 8:10 am | अभिष्टा
ढ, लिंक्स बद्दल धन्यवाद. पण मला त्या घरुनच उघडाव्या लागतील असे दिसते. कारण लिंक्स ना ऑफिसने फिल्टर लावलाय :-(
आणि म्हणूनच मला एकटीला ते दिसले नाहियेत.
---------------------------------
जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित
हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा
13 Feb 2009 - 11:23 am | परिकथेतील राजकुमार
सगळेच फोटु अ प्र ती म !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
23 Feb 2009 - 6:40 pm | चैत्राली
अतिशय सुन्दर फोटोझ् आहेत. मी जाउन आले आहे परत एकदा जावेसे वाटत होते. हे फोटोझ् पाहून दुधावरची तहान ताकावर भागवण्याचा अनुभव घेतला."कोकण आहेच प्रेमात पडण्यासारखे."
25 Feb 2009 - 11:24 am | सालोमालो
मी काही दिवसांपूर्वीच येथे जाउन आलो. अविस्मरणीय आहे दापोली परिसर. पुन्हा जाल तेव्हा कर्द्याला जाऊन या. फार सुंदर आहे.
आता एवढंच म्हणतो.
मर्मबंधातली ठेव ही, प्रेममय
ठेवी जपोनी, सुखानें दुखविं जीव ॥
हृदयांबुजी लीन लोभी अली हा
मकरंद ठेवा लुटण्यासि आला रे
बांधी जिवाला सुखाशा मनीं ॥
सालो
25 Feb 2009 - 11:31 am | मिंटी
धन्यवाद :)
आम्ही कर्दे बीचवर गेलो होतो पण तिथे खुप गर्दी असल्यामुळे जास्त थांबलो नाही .... त्याएवजी मग आम्ही केळशीच्या शांत बीचवर गेलो होतो जिथे आमच्याव्यतिरिक्त कोणीच नव्हतं.... पण निश्चितच कर्देचा बीच फारच सुंदर आणि स्वच्छ आहे. :)